Wednesday, October 31, 2018

kill your stress and achieve your success......HEALTH CARE

          STRESS IS YOUR BIGGEST ENEMY

                                                .......Kill it and go ahead!!!

आजच्या  या स्पर्धेच्या युगात प्रत्येक माणूस हा स्वतःला दुसर्यापेक्षा एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी नेहमीच झटत असतो . हि लढाई करताना त्याला खाण्यापिण्याचे, झोपेचे, वेळेचे, घरच्यांचे कशाचेही भान नसते . त्याला फक्त डोळ्यासमोर त्याचे ध्येय दिसत असत . आणि हि स्पर्धा इतकी वाढली आहे  की आपल्याला आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा कुठे आपण अपयशी झालो तर तो माणूस नैराश्यात जातो. आणि मग मानसिक ताणतणाव,चिडचिड, उच्च रक्तदाब यांसारख्या गोष्टींना वाढण्यास वाव मिळतो . यातून मार्ग काढण्यासाठी मग तो माणूस हळूहळू व्यसनांच्या आहारी जायला लागतो आणि थेथूनच त्याच्या अधोगतीची सुरवात होते. म्हणूनच या लेखात आपण काही उपाय पाहूया ज्याने आपण आपला ताण कमी करू शकतो.

1.DEEP BREATHE( दीर्घ श्वसन )

दीर्घ श्वसन हा ताण -तणावावरील एक उत्तम उपाय आहे .जर आपण कधीही काळजीमध्ये असाल तर काही वेळ (५ मिनिट ) बाजूला काढून हे करू शकतो .याने आपल्याला खूप फरक पडतो. रक्ताभिसरण चांगले होते.

2.STRETCH(शरीरास ताण )

हा एक शारीरिक व्यायाम प्रकार आहे. यामध्ये आपल्यला शरीराला एक ताण द्यायचा  असतो ,ज्यामध्ये आपल्या स्नायूंना पुरेसा व्यायाम मिळतो . शरीरातील सर्व अवयवांना रक्त पोहचते .साधारणतः १५ मिनिटे हा व्यायाम करावा .

3. HOBBY(छंद जोपासा )

जस मी मागील एका लेखक सांगितलं कि देवाने प्रत्येकाला काहीनाकाही वेगळेपण दिले आहे , त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने एकतरी छंद जोपासला पाहिजे ज्याने त्याच मन त्या गोष्टीत रमेल .जस की एखाद वाद्य वाजवा, गाणी ऐका ,नृत्य करा ,चित्र काढा .जे करून आपल्यला आनंद मिळेल असे काहीपण करा . यामुळे नक्कीच तुम्हला तणावापासून मुक्तता मिळेल .

4. POSITIVE THINKING(सकारात्मक विचार )

 नेहमी सकारात्मक विचार करा जे विचार तुम्हला स्फूर्ती देतील असे .माझे नेहमी चांगलेच होणार अश्या विचाराने स्वतःला प्रेरित करा .जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते . लोकांच्या बोलण्याकडे किंवा नकारात्मक गोष्टींना तुमच्या आयुष्यात अजिबात जागा ठेवू नका .

5. SUFFICIENT SLEEP(पुरेशी झोप )

पुरेशी झोप आपल्या शरीरासाठी व मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे . आपण कमीतकमी ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे . ज्याने करून आपलं शरीर आराम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन काम करायला जोमाने तयार होईल .

6. BALANCED DIET(चौकस आहार )

मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण खाण्यापिण्याकडेही लक्ष दिले पाहिजे . आपल्या आहारात ताजी फळे ,पालेभाज्या ,मोड आलेली कडधान्ये यांचा वापर असला पाहिजे . सकाळचा नाश्ता तर खूप महत्वाचा आहे . तेलकट,तुपकट,जास्त रासायनिक असे पदार्थ खाऊ नये . शीतपेयांपेक्षा लिंबू सरबत,कोकम किंवा आवळा सरबत प्यावे .

7.BE BUSSY WITH SOME WORK(कामात गुंतवा स्वतःला )

सतत कोणत्यातरी कामात स्वतः ला गुंतवून ठेवा जेणेकरून नको ते वाईट अथवा नकारात्मक विचार मनात येणार नाही. नुसतेच झोपून अथवा पडून राहू नका .चिंतन किंवा मनन करा ज्याने तुम्हला मनशांती मिळेल .

         if we follow these above seven rules then i hope you will get relaxation in your life. your stress will reduce. you will enjoy your beauty of life........






No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...