SCUBA DIVING IN MALVAN
मालवण ला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. निसर्गाने मालवणला व आजूबाजूला असलेल्या परिसराला भरभरून काही दिले दिले आहे . मालवण मधील सिंधुदुर्ग असलेले स्कुबा डायविंग आणि वॉटर स्पोर्ट्स हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे . कारण संपूर्ण महाराष्टात प्रथमच इकडे हा प्रकल्प सुरु झाला आणि आज तो यशश्वीरित्या सुरु आहे . या व्यवसायामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे . समुद्राखालची दुनिया बघण्याचा अविस्मरणीय अनुभव पर्यटकांना घेता येतो . तर या भागात जाणून घेऊया स्कुबा डायविंग कस करतात, लोकांचा अनुभव कसा असतो...... चला तर मग बघूया
TRAINING....
|
स्कुबा डायविंग करायचे असेल तर आपल्याला मालवण येथील किनाऱ्यावर यावे लागेल किंवा दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर आले तरी चालेल .तिकडून बोटीने आपल्याला किल्ल्यावर नेवून सोडतात . किल्ला फिरून झाल्यावर आपल्याला परत बोटीने स्कुबा च्या स्पॉट वरती घेऊन जातात . तिकडे आपल्याला दुसऱ्या बोटीत उतरवतात
LETS GO..... |
त्या बोटीवर आपल्याला योग्य तो पोशाख चढवतात . आपले नाक आणि डोळे झाकले जावेत यासाठी मास्क लावतात . तसेच ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्या मागे सिलेंडर असतो. पाण्याच्या आत जाण्याअगोदर आपल्याला थोडा वेळ ट्रेनिंग देतात . प्रत्येक माणसाबरोबर एक गाईड असतो . एकदा का आपण श्वासावर नियंत्रण मिळवले कि आपल्याला हळूहळू खाली घेऊन जातात . पाण्यात खाली गेल्यावर जर आपल्याला बार वाटत नसेल तर आपण हातांच्या खुणांनी गाईड चे लक्ष वेधू शकतो . आपल्या क्षमतेप्रमाणे आपण पाण्याच्या खाली राहू शकतो . जर आपल्याला पाण्याखालच्या दुनियेचा व आपला फोटो किंवा विडिओ हवा असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था येथे आहे . खाली दाखवलेल्या चित्रांप्रमाणे आपल्याला अविस्मरणीय अनुभव घेता येतो .येथील गाईड आपली व्यवस्थित काळजी घेतात. त्यामुळे बिनधास्त इकडे या व मज्जा करा .
समुद्राच्या तळाशी सफर करताना
WATER SPORTS
BUMPER RIDING |
स्कुबा डायविंग करून झाल्यावर लोकांची पाऊले वळतात ती म्हणजे वॉटर स्पोर्ट करायला . यामध्ये आपण विविध ४ ते ५ प्रकारचे खेळ खेळू शकतो . जसे कि बंपर रिडींग, बनाना रिडींग, जेटस्की आणि बरच काही ..
BANANA RIDING
JETSKI RIDE |
PARASAILING.....
|
त्यामुळे नक्की इकडे या , मालवणी जेवणाच्या च्या आस्वादासोबत थरार अनुभव व जीवनाचा आनंद घ्या . आणि अशाच मजेदार माहितीसाठी फोलो करा https://www.explorepro.in
YOUTUBE वर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/KrZkheVXpoA
No comments:
Post a Comment