Being Artistic!!!
कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य घटक आहे. या जगात अनेक कला आहेत. आपल्याकडे एकूण ६४ प्रकारच्या कला आहेत असा मानल जात. मग ती चित्रकला असो , नृत्य , संगीत , अभिनय, शिल्पकला असो किंवा अजून काही . आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कलेचा आस्वाद घेत असतो. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतही आपण कला पाहतो. प्रत्येक मानवाच्या अंगी एकतरी कला अवगत असणे आवश्यक आहे.
अनेक कलांमधील एक कला म्हणजे चित्रकला . या कलेला अगदी पहिल्या शतकापासूनचा वारसा आहे . त्यामुळे हि कला अभिजात मानली जाते. एखादी पेन्सिल किंवा ब्रश हातात घायचा आणि आपल्या मनाला जे दिसेल ,रुचेल ते पंढरीकोर्या कागदावर रेखाटायचे . त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आता तो आनंद प्रत्येकाच्या आवडीनिवडी वर अवलंबून आहे.
आता या चित्रकलेमध्ये सुद्धा अनेक प्रकार येतात . तसेच अनेक विविध कला यात जोडल्या जातात त्यामुळे त्या कलाकृतीची शोभा आणखीन वाढते. प्रत्येक कलाकाराला नेहमीच आपल्या प्रेक्षकांना नवीन द्यायला आवडते ,त्यामुळे प्रत्येक कलेतून आपल्याला नवीन काही देता येईल याचा तो विचार करत असतो. काही कलाकृती तर अक्षरशः काळजाला भिडणाऱ्या असतात. तर काही कलाकृती तर जगण काय असत ते शिकवतात .
अश्याच काही कलाकृती आपण खाली पाहू शकतो . घरातल्या अतिशय साध्या साध्या गोष्टींचा उपयोग करून सुद्धा खूप चांगली कलाकृती तयार करता येते.
तसेच अशी काही चित्र असतात ती आपल्याला खरी वाटतात . अक्षरश: त्यांना हातात घ्यावेसे वाटते . त्यातूनच ती खाण्याविषयक किंवा पदार्थ असतील तर मी बघायलाच नको. ते चित्र पाहूनच तोंडाला पाणी सूटत. अशीच काही चित्रे आपण खाली पाहू
Thank you!!
x
No comments:
Post a Comment