Monday, December 2, 2019

खरच भारत देश सुरक्षित आहे का ??

                   खरच भारत देश सुरक्षित आहे का ??

आपला भारत देश आज अनेक गोष्टीत प्रगती करतोय . तंत्रज्ञान , शेती, उद्योगधंदे, शिक्षण ,खेळ , आणि बरच काही. पण आपल्या देशात सध्या असे काही प्रकार घडत आहेत जे कि आपल्या देशाच्या प्रतिष्ठेस काळिमा फासत आहेत. ज्यामुळे आपल्या देशातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . महिलांना , स्त्रियांना रस्यावर फिरणे असुरक्षित वाटू लागले आहे.त्यामुळे खर्च आपला देश सुरक्षित आहे का असा वाटू लागला आहे .

हल्ली रोज वर्तमानपत्र उघडून पाहिलं कि बलात्कार , महिलेला मारहाण , लैंगिक किंवा मानसिक छळ अशा अनेक घटना पाहावयास वा वाचायला मिळतात . दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. तरी अजून आपल्याकडे  याच्याबद्दल कठोर कायदे नाहीत याचेच वाईट वाटते . दिल्ली मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणापासून ते आजच्या डॉ. प्रियांका यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी मी घराबाहेर पडू कि नको ..माझ्यासोबत वाईट काही झाले तर.. कोणी त्रास दिला तर .... असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात जागे होतात . त्यामुळे भीतीने घाबरून काही स्त्रिया व मुली घरातच बसून राहतात .पण असच किती दिवस घरात बसून राहणार .. काही महिलांना पोटापाण्यासाठी बाहेर पडावच लागत. मग काय देवाचं नाव घेऊन त् जीव मुठीत घेऊन त्या बिचार्या रात्रीच्या वेळी प्रवास करतात. पण ही भीती , असुरक्षितता अजून किती दिवस घेऊन जगणार आहेत आपल्या देशातील महिला . आपण गुन्हेगारांना असेच सोडून देत राहिलो तर ही प्रकरणे वाढतच जातील ..गुन्हेगारांना कसली भीतीच उरणार नाही. मुलींना जगणं मुश्किल होऊन बसेल. समाजात अंधाधुंदी कारभार माजेल. गुन्ह्यांचं राज्य निर्माण होईल .रात्रीच सोडा ..आजकाल दिवसाढवळ्या हि हे प्रकार वाढत चालले आहेत. या गुन्हेगारांची ,नालायकांची मस्ती एवढी  वाढत चालली आहे. यांना वेळीच आवार नाही घातला तर  यांची मस्ती अजूनच वाढेल आणि मग खूप भयंकर परिणाम भोगावे लागतील .

आपल्या देशातील संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे . इकडे नेहमीच स्त्रीचा आदर केला जातो. तिला योग्य तो मान दिला जातो . पण अश्या काही घटना घडतात कि आपल्यालाच प्रश्न पडतो कि हाच का आपला भारत देश , हीच आपली संस्कृती , हेच शिकवलं का आपल्या पूर्वजांनी आपल्याला .. !!आजही अनेक ठिकाणी अशाच अमानुष चालीरीती , परंपरा , महिलांवर अत्याचार यांसारख्या घटना होत असतील ,त्या आपल्या समोर जरी नसतील आल्या तरी छोट्या छोट्या खेड्यात , गावात त्या चालू असतात . आपण अनेक जण शहरी भागात राहतो त्यामुळे अशा घटनांचा अंदाज आपल्याला येत नसतो .

मित्रानो आपणसुद्धा हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो ..नुसत्या मेणबत्या जाळून काही होणार नाही. आपल्याला माणसाच्या मनातली ती वाईट प्रवूत्ती आणि वाईट नजर जाळून टाकायची आहे . त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . प्रत्येक माणसाने स्वता:पासून सुरवात केली पाहिजे व नंतर दुसरयाला शिकवले पाहिजे . कारण जोपर्यंत माणसाचे मानसिक वृत्ती साफ होत नाही ना तोपर्यंत हे चालूच राहणार . आपल्यासोबतच सरकारने सुद्धा या गुन्ह्याविरोधात कठोरात कठोर शिक्षा व कायदा तयार केला पाहिजे . जेणेकरून परत कोणाची मुलीकडे वाकडी नजर पडणार नाही . कस आहे ना आपली देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही त्यामुळे ते जास्त शेफ़ारले आहेत . जेव्हा एखाद्याला जरी फासावर लट्कवतील ना तेव्हाच ह्या गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल नक्कीच...

जेव्हा देशातील या अमानुष गोष्टी , अत्याचार थांबतील तेव्हाच आपल्या देशाच्या संस्कृतीला योग्य न्याय मिळेल . व त्याचा आपल्यालाच अभिमान वाटेल ..

                                           जय हिंद !!!          


  

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...