जात पात --देशाच्या प्रगतीला लागलेली कीड
आपला भारत देश हा जगात आपल्या वैविध्यामुळे ओळखला जातो . आपल्या लोकशाहीचे सम्पूर्ण जगात कौतुक होत असते . आपल्या देशात अनेक धर्म , भाषा , जाती परंपरा , संस्कृती पाहावयास मिळते . दार काही मैलांवर आपल्यला वेगवेगळी संस्कृती पाहावयास मिळते . ठोकठिकाणची भाषा वेगळी , लोकांचे राहणीमान वेगळे , सर्वच वेगळं. सर्व जण अगदी गुण्यागोविंदाने राहतात . कोणताही सण असो , कार्यक्रम असो सगळे जण एकत्र येऊन तो सण साजरा करतात. मग हल्ली असे काय होत आहे कि ज्याच्यामुळे जाती जातींमध्ये , धर्म-धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे, वाद होत आहेत .
खूप वर्षापासून चालेला अयोध्येचा प्रश्न तो काही दिवसांआधी सुटला . ते पण मंदिर आणि मशिदी वरून . प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या धर्माबद्दल भावना , आदर प्रेम असतो , सर्व मान्य आहे. परंतु कोणती गोष्ट किती ताणायची ते आपल्याला समजायला हवं. उगाच आपण वातावरण गरम करतो आणि संघर्ष करत असतो . नुकसान शेवटी आपलच होत. उगाच ते तोडफोड , माऱ्यामाऱ्या , दंगली ...... कशाला उगाच सगळे ते . त्यापेक्षा काहीच मार्ग निघत नसेल तर एखादी शैक्षणिक संस्था स्थापित केली असती तर खूप मुलांचे शिक्षण झाले असते . देशाच्या प्रगतीत थोडी भर पडली असती . असो ... न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो आपण मान्य करायचा . त्यांनी पण शेवटी योग्य विचार करूनच निर्णय दिला असेल ना.. त्यावर आपण न बोललेच बरं ...
आज आपण महाराष्ट्रात बघितल तर किती जाती जमाती आहेत. जो तो स्वतःला आरक्षण मागतोय. स्वतःला मागासवर्गीय समजतोय . तसेच एकाला आरक्षण मिळाल कि दुसरा समाज नाराज होतोय . त्यातून उगाच संघर्ष निर्माण होतोय. शिक्षणात सुद्धा जातीपातीच राजकारण चालूय .. प्रवेश मिळवताना पहिले गुणांऐवजी जात विचारली जातेय . त्यामुळे एखादा हुशार पण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर तो बाजूला राहतो . आणि एखादा कमी गुणांवाला विद्यार्थी प्रवेश मिळवतो . सरकारी नोकरी मध्ये सुद्धा तसेच , एखाद्याची पात्राता नसताना त्याला एखाद्या पदावर बसवले जाते. आपल्या महाराष्टात हे जातींचं राजकारण जास्त चालूय .. हा ब्राम्हण , हा कोळी , हा क्षत्रिय , हा आगरी , हा धनगर , हा मराठा .. हेच चालूय जे कि आपल्याला , आपल्या राज्याला आणि देशाला महागात पडतंय . आपणच आपापसात भांडत बसलो तर दुसरे त्याचा फायदा घेतात हि गोष्ट लोकांना समजत नाहीय .. आणि आपले राजकारणी फक्त मज्जा बघतात. फक्त आश्वासन देतात .. आम्ही हे करू , ते करू ...बस्स्स .. बाकी काही नाही .
हे जातीपातीच राजकारण आपल्या सर्वानाच खूप संकटात आणू शकत. वेळीच त्याला आवर घातला पाहिजे. उद्या एखाद्या माणसाला जगायला रक्ताची गरज भासली तर आपण असे नाही विचारत कि अहो तुमची जात काय ... मला याच जातीचं रक्त हवंय ..मला दुसरं रक्त नको.. असं तर नाहीना करत आपण .. शेवटी माणूसच मदतीला येतो. माणुसकीच आपल्याला वाचवते . त्यामुळे सर्वानी एकत्र आनंदित राहा. सर्व धर्मांचा , भाषेचा , संस्कृतीचा आदर करायला शिका . आपण भले असू धर्माने जातीने वेगळे पण आधी आपण माणूस आहोत आणि आपल्याला माणुसकी टिकवायचीय आणि वाढवायचीय सुद्धा .
HUMANITY |
No comments:
Post a Comment