Monday, November 4, 2019

सावधान ... निसर्ग कोपतोय .....

                                                           

आज २१व्या शतकात वाटचाल करत असताना माणसाने सर्व गोष्टीत खूप प्रगती केली . त्याने खूप विकास साधला . तंत्रज्ञान , शेती , उद्योगधंदे , शिक्षणात अगदी सर्व क्षेत्रात प्रगती केली. पण हे सर्व करताना त्याने निसर्गाकडे लक्ष दिले आहे का खरच .. त्याचा विचार केलेला का त्याने कि ज्याचे परिणाम आपल्याला आज भोगावे लागत आहेत . काय झालाय निसर्गाला . तो हल्ली का असे भयानक संकेत देत असतो निसर्ग....

लहानपणी शाळेत आपण पुस्तकात वाचले होते कि आपल्या हवामानात मुख्यतः तीन ऋतू आहेत , आणि त्याचे प्रत्येकाचे चार चार महिने आहेत . म्हणजेच पावसाळा जुन ते सप्टेंबर , हिवाळा ऑक्टोबर ते जानेवारी  आणि उन्हाळा फेब्रुवारी ते मे असे साधारणतः होते . पण आजकाल च्या वातावरणावरून हे चित्र बदललय असं नाही का वाटत . कारण हल्ली पाऊस कधीही पडतो , कधीही थन्डी वाजते आणि गरम तर सतत होत असत. एकंदर हवामानाच चक्रच बदलून गेलय . कधी अचानक मध्येच चक्रीवादळ येत , समुद्रात उंच उंच लाटा उसळतात. का होती हे सगळे . पुढे काही वर्षात काही अघटित होण्याचे संकेत तर नाहीत ना हे. 

आज माणसाने त्याच्या फायद्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली , हल्लीच उदाहरण घ्याना .. आरे वसाहतीतील वृक्षतोड , किती झाडे कापली गेली , किती प्राणी , पक्ष्यांचे निवारे उध्वस्त झाले, शेवटी त्यांनापण मानवी वस्तीत शिरण्यावाचून काही पर्याय नव्हता . जी झाडे,वृक्ष आपल्याला एवढं काही भरभरून देतात त्यांनाच आपण नष्ट करून टाकलय. ज्यांच्यामुळे आपल्याला सावली मिळते , फळ फुल मिळतात , लाकूड मिळते , आणि सर्वात मुख्य म्हणजे प्राणवायू मिळतो . एवढे सगळे फायदे असताना देखील आपण त्यांच्या जीवावर उठलोय . वरून आपणच ओरडतो पाऊस नीट पडत नाही , गर्मी वाढलीय ...आहो हे वृक्षतोड अशीच चालू राहिली तर एकदिवस वाळवंट होईल या शहारांचं मी असच तडफडत मरतील सगळे ..पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. 

आज दिल्ली .मुंबई सारख्या शहरात वावरताना जीव अतिशय गुदमरल्यासारखा होतो . हवेचे प्रदूषण इतके वाढलेय कि तोंडाला रुमाल लावूनच चालावे लागते . हल्ली तर खासगी वाहन खरेदी करण्याचा जमाना आला आहे . जो तो आजकाल गाडी घेतोय . म्हणजे १५ घरांमागे ८ ते ९ गाड्या असतातच . शिवाय लोक सरकारी गाड्यांचा वापर कमी करू लागलीय . त्यामुळे खासगी वाहनांवर जास्त भर , सहाजिकच प्रदूषण पण जास्त .  तसेच  प्लास्टिक , थर्मोकॉल यांचा जास्त वापर , दिवाळीतील फटाके यामुळे सुद्धा प्रदूषणात वाढ झाली आहे .

तर आपण हे सर्व कुठेतरी थांबवला पाहिजे .. जेवढं आपण निसर्गाच्या विरोधात जाणार तेवढा जास्ती तो आपल्याला त्रास देणार , हे आपण लक्षात ठेवले पाहिजे . स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाचा बळी देऊन चालणार नाही . तरी निसर्ग आपल्याला वेळोवेळी संकेत देऊन जागरूत करत असतोच पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळीच आपण या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात आपला टिकाव लागणे कठीण आहे . आता जे आहे त्यापेक्षाही कठीण परिस्थिती ओढावेल यात शनकच नाही .त्यामुळे प्रत्येकाने आपापल्यापरीने जेवढे पर्यावरणासाठी कर शकतो तेवढे करावे . त्यामुळे आपलेच अस्तित्व वाढणार आहे . 

                                                                   धन्यवाद....    

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...