Saturday, October 26, 2019

HAPPY DIWALI

                                     दीपावली .... !!

Image result for happy diwali
शुभ दीपावली

                       

दिवाळी म्हणजेच दीपोत्सव ... दिव्यांचा सण . सगळीकडे आकर्षक रोषणाई ,सुंदर भव्य रांगोळ्या, खमंग फराळ ,फटाक्यांची आतषबाजी  आणि प्रसन्न वातावरण . खरंच दिवाळीचे ते चार दिवस अतिशय आनंददायी आणि सुखाचे असतात . तसेच वर्षाचे सर्व दिवस आनंदी जावेत असे आपल्याला वाटत असतात .

प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो . कोणाला पैशांच्या अडचणींमुळे थोडी हौस मौज कमी करता येते तर कोणी खूप उत्सहात दिवाळी साजरी करतो. काहीही असला तरी कोणत्याही गोष्ट साजरा करण्याचा आनंद घेता आला पाहिजे . मग ती दहा बाय दहा  च्या खोलीतील दिवाळी असो कि मोठ्या राजवाड्यातली . आनंद हा महत्वाचा असतो. त्या गोष्टीतल सुखसमाधान  महत्वाचं असत.

पण आजकाल सगळ्यावर कसल ना कसल तरी संकट आलेल आहे . ऑक्टोबर महिना संपत आला तरी अजून पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीय .देशातील अनेक भागात अतिवृष्टी होऊन लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . लोकांची घरे डोळ्यासमोर वाहून गेली आहेत . लोक रस्त्यावर आले. तसेच चक्रीवादळामुळे काही दिवसांपासून घबराटीचे वातावरण किनारपट्टीजवळील लोकांमध्ये आहे. तसेच काही लोकांचे रोजगार बंद आल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे . कोणाचे जवळचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च , घरखर्च , आणि इतर किरकोळ खर्च भागवताना लोकांची दमछाक होत आहे . त्यामुळे काही लोकांची दिवाळी तर दूरच राहते.

काही लोक तर हे दिवस कुठंतरी लांबच्या ठिकाणी जाऊन साजरा करतात . ना ते फराळ बनवत , ना खरेदी करत , ना रांगोळ्या , ना रोषणाई . फक्त कुठेतरी जाऊन मज्जा करायची एवढंच दिसत त्यांना. आज आपल्या राज्यात हीच परिस्तिथी दिसून येते ,याला कारण पण तसेच आहे  ते म्हणजे बदलती जीवनशैली , स्पर्धा , ताणतणाव , चढाओढ आणि बरच काही . माणूस आपली संस्कृती सण हळूहळू विसरू लागला आहे . माणसाने कालानुरूप बदलावं पण आपली परंपरा जपली पाहिजे.

आपणसुद्धा आपली दिवाळी अशीच साजरी करूया . फटाके घेण्याऐवजी त्याच पैशांची पुसते घ्या , किंवा एखाद्या गरीब मुलाला मदत करा . एखाद्या अनाथाश्रमाला भेट द्या , तिकडच्या मूलांनसोबत गप्पा मारा , खेळ खेळा ,गोड धोड पदार्थाचे वाटप करा . बघा त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हाला वेगळेच सुख देईल . तसेच आपल्या मित्रपरिवारास भेटा . मातीचे किल्ले बनवा ,त्यातली मज्जा काही वेगळीच असते. वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा . नवनवीन गोष्टी शिका . वेगवेगळे  पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करा . अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आपण आपली दिवाळी उत्तम साजरी करू शकतो .

सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा , हि दिवाळी आपल्याला सर्वाना सुखाची , समृद्धीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

                                     धन्यवाद..!!

       


No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...