Sunday, October 20, 2019

निवडणुकीची रणधुमाळी

                          मतदान करा ,लोकशाही बळकट करा !!

Image result for all parties SYMBOL in maharashtra
प्रमुख पक्ष आणि चिन्ह
                                             
उद्या २१ ऑक्टोबर , लोकशाही बळकट करण्याचा दिवस.  लोकशाही बळकट करणे म्हणजे काय ओ , तर लोकांनी लोकांसाठी राज्य बनवणे म्हणजेच लोकांनी आपल्यातूनच  एखाद्या उमेदवाराला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ,त्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवडून देण आणि तोच दिवस म्हणजे मतदानाचा  दिवस . त्यामुळे सर्वानी  या दिवशी  घराबाहेर  पडून मतदान केले पाहिजे , भले तुम्ही कोणालाही मत द्या पण तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.

सध्या महाराष्ट्रात ४-५ प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जसे कि भारतीय जनता पक्ष (भा.ज पा.) , राष्टीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे ), आणि शिवसेना . आणि तसेच इतर मित्रपक्ष जसे कि (MIM) , बहुजन समाज आघाडी , समाजवादी पक्ष वगरे वगरे . प्रत्येक पक्षाची धोरणे , विचार , कार्य पद्धती हे वेगवेगळे आहेत . प्रत्येकालाच प्रत्येक पक्षाची कार्यपद्धत आवडेलच अस नाही. २०१४ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मोदी लाट होती , सगळीकडे भाजपाची सत्ता होती , त्यांच्या नेत्यांनी खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या  , आम्ही हे करू ते करू , त्याप्रमाणे काही गोष्टी केल्याही परंतु ज्या मूलभूत गोष्टी महाराष्ट्राला हव्या आहेत त्या  गोष्टी दे लोकांना देण्यात ते सरकार काहीस कमी पडला आहे असा वाटतंय , नुसत हेच सरकार नाही तर त्याआधीच सरकार सुद्धा असच होत त्यांच्या कार्याला लोकांनी नापसंती दर्शवली म्हणून  लोकांनी भाजपाला निवडून दिले परंतु काही गोष्टींबाबत लोकांचा भ्रमनिरास झाला .

तसेच मनसे सारखे जे पक्ष आहेत जे कि मराठी भाषा , संस्कृती , अस्मिता  टिकवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु आपलीच मराठी माणस त्याच्याकडे पाठ फिरवतात . काही लोक त्यांच्या पक्षाच्या सभा , भाषण ऐकण्यासाठी खूप गर्दी करतात पण मतदान करताना काहीसे नाराज असतात . तर काही शिवसेनेसारखे पक्ष आहेत ज्यांचा उगम मराठी माणसांसाठी झालेला परंतु तोसुद्धा आता हिंदुत्वाकडे वळला आहे. त्यांचा  शहरातील प्रत्येक समाजानुसार प्रचार चालू आहे. काही पक्ष तर भर पावसात ,भिजत भिजत प्रचार करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत व समाजाला उत्साह देत आहेत ,एकंदरच काय जो तो पक्ष जिवाच्या आकांताने निवडून येण्यासाठी प्रचार
करतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्याचा ते विचार करत आहे .

तर आपण कोणाला मतदान करावे ??? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे . पक्षाला बघून मत द्यावं कि स्थानिक उमेदवाराचं काम बघून मत द्यावं यावर विचारविनिमय सध्या चालू आहे . तर मित्रांनो जो माणूस आपल्या समस्या सोडवण्यासाठी झटतो , ज्याच्या मनात आपल्यासाठी आपुलकी आहे , उच्च शिक्षित आहे, ज्याला समाजाची उत्तम जाण आहे , त्याला आपण मतदान करावं . कारण कोणताही पक्ष आपला काम करायला पुढे येणार नाहीय , कोणी आपले रस्ते बांधून देणार नाहीय ,नोकरी धंद्याच्या समस्या सोडवणार नाहीय पण स्थानिक उमेदवार जो निवडून येणार आहे तो आपली कामे करणार आहे . त्यामुळे जो उमेदवार विश्वासाने आपली कामे करेल किंवा अगोदर केलेली असतील त्यालाच आपण मतदान केल पाहिजे मग तो अपक्ष म्हणून उभा असेल तरी चालेल .
 
सध्या देशात अनेक उद्योगधंदे बंद होत चालले आहेत , काहींचे खासगीकरण करायचा डाव आखला जात आहे , शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्या  आहेत , महागाई वाढली आहे  ज्याच्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत . काही ठिकाणी लोक खोट्या आश्वासनाना बळी पडली आहेत . तसेच आरे कॉलनी तील वृक्षतोड हा चर्च मुद्दा बनला होता त्यावरून सुद्धा मोठं राजकारण झालं . यांसारख्या अनेक प्रकारामुळे लोकांमध्ये सध्याच्या सरकारसाठी नाराजी दिसून येत आहेत . कोणाचा विजय होईल कोण हरेल हे सांगता येत नाहीय . कारण वातावरण बदलल आहे . लोकांचा कौल कोणाला असेल ते येत्या २४ तारखेला समजेलंच ,,

तुम्हाला फक्त मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून तुमचा मतदानाचा हक्क बजावायचा आहे. मग कोणाचही सरकार येउदे , तुमचं मत उपयोगास येउदे किंवा फुकट जाऊदे . तुमचं एक एक मत  खूप महत्वाचं आहे हि लोकशाही बळकट करण्यासाठी ... !!
                                            
                                                           जय हिंद , जय महाराष्ट्र !! 
    


No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...