Sunday, October 6, 2019

नवरात्रीचे नवरंग!!!

                                                    नवरात्री रासरंग ....

Image result for navratri
जय आंबे माँ

                                    

मित्रानो सप्टेंबर महिन्यात गणपती झाल्यानंतर सर्वाना चाहूल लागते ती म्णजे नवरात्रीची . अर्थातच देवीच्या आगमनाची . हा सण प्रामुख्याने गुजरात राज्याचा पण आज भारतात अनेक ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या आणि गरब्याची मज्जाच काही वेगळी .

नवरात्री म्हणजे अर्थातच नऊ रात्रीचा सण , या नऊ दिवसात रात्री देवीचा जागर असतो . रात्रभर देवीची आराधना केली जाते . अनेक ठिकाणी भजने , कीर्तन आयोजित केले जाते . खूपच उत्साहाचे वातावरण असते . नऊ दिवशी देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात . प्रामुख्याने लाल , पिवळा , हिरवा , पांढरा , गुलाबी , केशरी , जांभळा , केशरी , मोरपीसी या रंगाचा सामावेश होतो . प्रत्येक रंगाचे एक वेगळे महत्व आहे . 

मुंबई , ठाण्यासारख्या शहरात  महिला तसेच पुरुष मंडळी नऊ दिवस नऊ रंगाचे पोशाख परीधान करतात . सगळे एकत्र जमतात व एकत्र मिळून फोटो काढतात . त्यातूनच एकात्मतेचा संदेश देतात .तसेच मुंबई ,  मुंबई उपनगर , कल्याण डोंबिवली , ठाणे यांसारख्या शहरात रात्रीचे मोठ्या उत्साहात गरब्याचे आयोजन केले जाते . अनेक मोठं मोठे गुजराती तसेच मराठी गायक  याना आमंत्रित केले जाते . सुमधुर संगीताच्या तालावर लहान मुलांपासून , वृद्धांपर्यत सर्व लोक फेर धरून नाचतात . मात्र वेळेच्या काही मर्यादा असतात त्यामुळे काहीसा लवकर आटपावा लागतो हा गरबा. तरीपण लोक मोठ्या उत्साहाने या रासरंगात सहभागी होतात व आनंद घेतात . गुजरात सारख्या राज्यात गरब्याची धूम काही वेगळीच असते . तिकडे लोकांना नऊ दिवस सुट्ट्या असतात , तसेच रात्रभर गरबा चाललेला असतो . कशाचंही जास्त बंधन नसते . खूपच मज्जा असते नवरात्रीत तिकडे. तुम्ह्लाही हा गरबा अनुभवायचा असेल तर नवरात्रीत गुजरात मध्ये नक्की भेट द्या व आनंद घ्या .

काही  प्रमुख रंग आणि त्यांचे महत्व -

लाल - आवड , उत्साह , रोमांच , साहस .

पिवळा - आनंदी , मैत्रीपूर्ण संबंध ,तेजस्वी ,शक्तिशाली .

हिरवा - प्रगती , निसर्गाचे प्रतीक , सुरक्षितता , धनदौलत ,विरंगुळा , ताजेतवाने .

निळा - शांती ,आत्मविश्वास , एकात्मकता .

पांढरा - आशा ,नीटनेटकेपणा ,साधेपणा , शीतरंग .

गुलाबी - सौन्दर्य , मैत्री , प्रेम , विश्वास , रोमांच .

करडा - सुरक्षितता , व्यक्तिमत्व विकास , समजुदारपणा .

जांभळा - दूरदृष्टी , अद्भुतपणा , निरामयता , मोठेपणा .

                  चला तर मग या रंगात मिसळून आपण आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरुया .

नवरात्रीची काही छायाचित्र

Image result for navratri garba
गरबा खेळताना मग्न झालेले मंडळी

  

Image result for navratri garba
गुजराती रास रंग


धन्यवाद !!!


  

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...