विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण म्हणजे हे संग्रहालय आहे. बेंगलोर स्टेशन पासून जवळच चिन्नास्वामी स्टेडियम येथे हे संग्रहालय आहे. अनेक शाळा,महाविद्यालये याला भेट द्यायला हजारोंच्या संख्येने इकडे येतात . एक विशिष्ठ शुल्क आपल्याला भरावे लागते .
हे संग्रहालय ३ मजल्याचे आहे. त्यामध्ये विविध विभाग आहे . जसे कि FUN SCIENCE, ELECTRICITY, AEROSPACE, अशे बरेच विभाग आहेत. प्रत्येक गोष्ट तिकडे नीट समजून सांगितली आहे . काही प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून सुद्धा दाखवले आहे. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी नीट समजतात .
विज्ञानाच्या प्रत्येक मूलभूत संकल्पनांची माहीती येथे उलगडून दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला येथे आकर्षण वाटते ,नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते .तसेच जे ज्ञान आपण पुस्तकात वाचतो ते प्रत्यक्षात कसे काम करते हे अनुभवायला मिळते . आपण पूर्णपणे तांत्रिक युगात जातो . २-३ तास कसे निघून जातात समजत पण नाही.
No comments:
Post a Comment