किल्ले सिंधुदुर्ग ....
मालवण बस स्टॅन्ड पासून सुमारे १.५ किमी अंतरावर मालवण चौपाटी आहे. तेथून बोटीने आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजापाशी जाता येते.किंवा आपण दांडी या समुद्रकिनारीवरून सुद्धा किल्ल्यावर जाऊ शकतो .बोटीने साधारणतः १०-१५ मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो . किल्ल्यावर पोहचल्यावर आपल्या माहितीसाठी आपण एखादा गाईड घेऊ शकतो . किल्ल्यावर चहा.,कॉफी , नाश्ता यांची उत्तम सोय आहे . तसेच इकडचे कोकम सरबत, सोलकढी प्रसिद्ध आहे. तसेच किल्ल्यावर टोपी, गॉगल, हॅट या वस्तुसुद्धा विकायला उपलब्ध आहेत. किल्ल्यावर लोकांची वस्ती आहे. अनेक मंदिरे सुद्धा किल्ल्यावर आहेत . पाऊस, वादळ,वारा, समुद्राच्या लाटा याना तोंड देत हा सिंधुदुर्ग किल्ला जोमात उभा आहे. किल्ल्यावर भेट देण्यासाठी नोव्हेंबर,डिसेंबर हा काळ उत्तम समजला जातो . तसेच १५ मे नंतर किल्ल्यावर प्रवासी वाहतूक पूर्ण बंद होते. कारण नंतर वाऱ्यात बदल होतो व पाऊस सुरु होतो . चला तर म आपण आजून माहिती घेऊया किल्ल्याबद्दल .........
किल्ल्यावर जाताना बोटीतून टिपलेले किल्य्याचे छायाचित्र
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
किल्ल्याचा मुख्य बुरुज
महादेव मंदिर
दूधबाव,दहीबाव,साखरबाव विहिरी
या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत .
किल्य्याची दक्षिण बाजू आणि तट
टेहळणी बुरुजावरून दिसलेले दृश्य
किल्य्याच्या एका बाजूने टिपलेली किल्ल्याची पाण्यातली भिंत
बुरुज ,आतल्या बाजूने
शिवाजी महाराजांचे मंदिर
शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे
अशाप्रकारे समुद्रात शिवाजी महाराजांनी १६०० च्या सालात कुरटे बेटावर हा किल्ला बांधला . किल्ल्याच्या बांधणीला जवळपास २ ते ३ वर्ष लागली . किल्ल्याचे बांधकाम पाहून महाराजांची दूरदृष्टी चा आपल्यला अंदाज येतोच . तसेच या किल्ल्यावर काही वर्षांपूर्वी एक नारळाचे झाड होते,ज्याला एक फांदी होती. ते एक आश्चर्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. पण काही वर्षांपूर्वी त्या झाडावर वीज पडून ते झाड जमीनदोस्त झाले.
त्यामुळे तुम्हलाही या किल्य्याची सफर करायची असेल तर तर नक्की मालवण ला या ,इकडे बरच हॉटेल्स, सुविधा उपलब्ध आहेत . त्यांच्या मार्फत तुम्ही किल्ला सफर करू शकता .
।।जय भवानी ,जय शिवाजी ।।
हेलिकॉप्टर मधून टिपलेले किल्ल्याचे विहंगम दृश्य
all about scuba diving in next blog
No comments:
Post a Comment