मालवणच्या किनाऱ्यावर ..
मालवण बस स्टॅन्ड पासून जवळ अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. त्याची अथांगता अनुभवायची असेल तर तुम्ह्लाही इकडे भेट द्यावी लागेल . मालवण पासून जवळच दगडांचे असे बनलेले रॉक गार्डन खूप प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी तिकडचा परिसर विद्युतरोषणाईने सजवला आहे. त्यामुळे पर्यटकांचे आवडते स्थळ बनले आहे. तसेच तिकडून पुढे सुंदर, रमणीय ,शांत असा चिवला बीच सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक येथे फिरायला येतात . येथे अनेक हॉटेल्स, धाबे, खानावळी लोकांच्या सेवेसाठी आहेत. तसेच तळाशील हा अतिशय सुंदर समुद्रकिनारा आपली वाट पाहतो आहे.ज्याची माहिती आपण अगोदरच्या भागात घेतली असेलच. मालवण किनाऱ्यावरचे काही छायाचित्रे खाली दाखवली आहेत.
नैसर्गिक रंगछटा ,तळाशील |
रॉक गार्डन |
चिवला बीच |
तळाशील बीच |
No comments:
Post a Comment