Friday, October 12, 2018

EXPLORING GOA TRAVEL वास्को द गामा....

from top view(japanese garden)
भौगोलिक स्थान 

                                                                                                                                                                   वास्को-द-गामा (गोवा ) 


                                                                                   गोवा म्हणजे देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण .लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आनंद देणारे असे हे गोवा  राज्य. या भागात जाणून घेउया गोव्या मधील वास्को द गामा या ठिकाणाची पार्श्वभूमी . दाबोलिं विमानतळापासून ८ ते १०किमी अंतरावर वास्को द गामा हे शहर वसल आहे. तर मडगाव स्थानकापासून  २८-३०किमी अंतरावर आहे. या शहराच्या आजूबाजूला जवळपास ३ते ४ समुद्रकिनारे आहेत. त्यातील निवडक किनाऱ्यांची काही छायाचित्रे खाली दाखवली आहेत . या किनाऱ्यांवर जास्त पर्यटकांची गर्दी वर्दळ नसते . खूप शांत ,सुंदर असे हे किनारे आहेत. यातील काही समुद्रकिनारे हे मुख्य शहराच्या भूमीपासून खालच्या बाजूला आहेत . पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येथे संरक्षक नेमण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर जाताना उंच उंच कड्यावरून समुद्राचे मनमोहक असे दृश्य पाहावयास मिळते.समुद्राची अथांगता अनुभवता येते. सूर्यास्ताच्या वेळी तर तर एक टक पाहतच राहावेसे वाटते . येथे जाताना काही मंदिरे तर काही चर्च वाटेत लागतात .

grandmothers hole beach

वरील काही चित्रांत आपण ग्रॅन्डमदरस होल बीच पाहू शकतो. अतिशय सुंदर असा हा बीच आहे . येथे जाताना आपल्याला एक गार्डन लागते त्याचे नाव जापनीस गार्डन आहे . येथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले,वेली आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मस्त जागा आहे. वरील सर्व परिसर हा मुख्यतः हेडलँड (सडा )या शहरात येतो हा भाग बऱ्यापैकी विकसित झाला आहे . अनेक शाळा ,संस्था येथे आहे.त्यामुळे लोकांची वस्ती येथे वाढली आहे.



No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...