Saturday, November 17, 2018

ADDICTED YOUTH

                             व्यसनाधीन झालेली तरुण पिढी



drugs

चल रे आज रात्री बसुया ..... आज खूपच कामाचा ताण आहे रे , आज रात्री घ्यावी लागेल नाहीतर झोप लागणार नाही , ए भाऊ इकड ये कि  एक झुरका मारू की ,अरे काही नाही होत ,अरे लय मज्जा येते , भावा आज स्टॉक आणलाय का पावडर चा ,आज खूप गरज आहे यार ... ..... ही अशी वाक्ये आपल्या कानावर पडतच असतील . घरी, शाळेच्या आवारात नाहीतर कॉलेज आवारात   तर नक्कीच .... हि वाक्ये नुसतीच तरुणांच्या तोंडी नाहीत तर लहान लहान मुलांच्या तोंडात पण आहेत . stop this

या व्यसनाधीनतेच प्रमुख कारण आहे ते म्हणजे नैराश्य . आणि हे नैराश्य कुठून येत तर वाढती स्पर्धा , वाढता ताणतणाव इ.  तशी अजून बरीच कारणे आहेत . एकदा एखादा माणूस  नैराश्यात गेला  कि तो संपूर्ण खचून जातो ,तो एकटा पडतो ,त्याला काय करू हे समजत नाही , सारखी चिडचिड होत असते त्याची . किंवा तो एकटक पाहत शांत बसलेला  असतो . अशा प्रकारचे लक्षण आढळल्यास तो  माणूस व्यसनाच्या जाळ्यात अडकला हे समजून जावे .

काही तरुण पोरांना तर खूप मज्जाच वाटते , नुसत्या क्षणिक आनंदासाठी आणि दिखाव्यासाठी ,लोकांना आकर्षित करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतात . तर काही लहान मूल मोठयांचं अनुकरण  करून या वाईट वळणाला लागतात . आणि यात फक्त मुलचं नाही हा तर तरुण तरुण मुली पण अडकल्या आहेत. अनेक उदाहरण आपण स्वतः बघितली                                देखील   असतील.टीव्ही ,मोबाइल ,इंटरनेट ,सिनेमा ,जाहिराती या सर्वांचा परिणाम होतो तो वेगळाच . हल्ली पालकांनाही मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि बहुतांश याच कारणामुळे मुले व्यसनाकडे जातात आणि आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात .

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  या व्यसनाचे दुष्परिणाम माहित असून सुद्धा मुलांना त्याच काही पडलेल नसत . बिचारे आई वडील काळजीने रडत असतात , मुलांना कष्टाने मोठं करतात पण मूल नुसती मज्जा  मारत असतात . आज अक्षरशः ७-८ वर्षांपासूनच्या पोरांना व्यसन लागली आहेत ,ज्यांना व्यसनातला व पण कळत नाही त्यांच्या हातात पानमसाला , सिगारेट दिसतायत. खूप गंभीर बाब आहे ही . २०-२१ वर्षांच्या तरुण पोरी सुद्धा बिनधास्तपणे सिगारेट पिताना , दारूच्या नशेत दिसतात . हे सर्व बघितल्यावर काळजात कसतरीच होत. मनात विचार येतो ..... अरेरे ...!!! काय चाललंय या तरुण पिढीचं , हे असच जर चालू राहील तर भारताचं भविष्य  धोक्यात आहे .

आज भारतात सर्वात जास्त तरुण वर्ग आहे ,आणि हा तरुण वर्ग ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे . आणि जर हीच तरुण पिढी अश्या व्यसनांमध्ये वाया गेली तर भविष्य अंधारात आहे सर्वांच. त्यामुळे वेळीच सावध व्हा .वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व समुपदेशन घ्या .

दारू पिण्यापेक्षा ताक,दूध ,लिंबू ,कोकम ,आवळा सरबत प्या. निदान बुद्धी तरी वाढेल . नशाच करायची असेल तर कोणतही एका गाण्यावर बिनधास्त अर्धा तास नाचा , उडती उडती गाणी ऐका . ज्यामुळे तुम्ह्लालाच वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटेल . आणि त्याचे सकारात्मक ,चांगले परिणाम तुम्ह्लाच जाणवतील .

आज भारतात हृदयविकार, मधुमेह ,कर्करोग यांसारखे भयंकर आजार वाढत चालले आहेत . आणि याचे प्रमुख कारण ही व्यसने आहेत . त्यामुळे तुम्हला तुमच भविष्य सुदृढ व निरोगी ठेवायचं असेल तर आजच कोणताही व्यसन असेल तर  सोडा . तुम्हीही करू नका आणि इतरांना पण करू देऊ नका . तरच भविष्यात एक निरोगी आणि सशक्त भारत निर्माण होईल .

                                धन्यवाद!!!!



  




quite addiction

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...