DIWALI........
A FESTIVAL OF LIGHTS AND HAPPINESS
भारत हा एक उत्सवप्रिय देश आहे. भारतात विविध जातीधर्माचे लोक राहतात .त्यांच्या भाषा ,राहणीमान ,खाण्यापिण्याच्या सवयी यामंध्ये बरीच विविधता आढळते. यामुळेच आपल्या देशाचे नाव संस्कृतीप्रधान देश म्हणून घेतले जाते . आपल्याला देशात सर्वात जास्त धूम असते ती म्हणजे दिवाळीची .अर्थात दिपोस्तवाची . दिवाळीचे ते चार दिवस खूप उमेदीचे,चैतन्य देणारे असतात . घराची सजावट, फराळ, फटाके, केल्ले , भाऊबीज या सर्वांमध्ये चारही दिवस चुटकीसरशी निघून जातात . पण आपण हि दिवाळी का साजरी ?
कुठून सुरवात झाली ?याबद्दल काही माहितीय का?.... चला तर म बघूया
पुराणानुसार असं म्हंटलं जात की जेव्हा राम १४ वर्ष वनवास भोगून जेव्हा अयोध्येत परत येतात तसेच महाभयंकर राक्षस रावणाशी युद्ध जिंकून आले म्हणून सगळीकडे खूप आनंदीआनंद झाला. खूप जल्लोश निर्माण झाला . रामाचे अयोध्येत मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. सगळीकडे दिव्यांची रोषणाई करण्यात आली . गोडधोड,मिठाया वाटण्यात आल्या . आणि इथपासूनच दिवाळी साजरी करण्यास सुरवात झाली .
साधारणतः ८-१० वर्षांपूर्वी दिवाळीची खूप जोरदार तयारी केली जायची .शाळेतल्या मुलांच्या परीक्षा १ महिना अगोदर संपून त्यांना सुट्ट्या लागायच्या . मग ती पोर एकत्र जमायची , मातीचे किल्ले बनवायची .खूप मज्जा मस्ती करायची . सगळीकडे एकं उत्साहाचे वातावरण असल्याचे . मुंबई सारख्या ठिकाणी घरोघरी खमंग फराळ केला जायचा तो आजूबाजूच्या घरात वाटलं जायचा . कंदील बनवले जायचे ,घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या व त्यावर सुंदर पणत्यांची आरास केली जायची . खुपच वेगळ वातावरण होत ते . जीवाला जीव देणारी माणस त्यावेळी होती .
पण आता हे चित्र कुठेतरी हरविल्यासारखं वाटत आहे. मानवाने जशी तंत्रज्ञानात प्रगती केली तशी त्याची अंगमेहनत कमी होऊ लागली ,तो आळशी बनू लागला . सगळ्या गोष्टी त्याला जागच्या जागी मिळू लागल्या . या सगळ्याचा परिमाण त्याच्या सण साजरे करण्यावर पण झाला .त्याला साधं आपल्या बाजूला कोण राहतंय हे सुद्धा माहित नसत संपूर्ण सोसायटी सोडाच.... फराळ घरी बनवायची पद्धत तर दुर्मिळच होत चालीय कारण सगळंच बाहेर रेडीमेड मिळतंय . जो तो माणूस आपापला विचार करू लागला स्वार्थी बनू लागला . पूर्वी पोर किल्ला बनवायला खाली जमायचे आता घरी बसून एकत्र मोबाइल वर गेम खेळण्यात मग्न असतात .त्यांना किल्ला ,इतिहास ह्यांबद्दल देखील माहिती नसते . काही लोक तर चार दिवस सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जातात . एकंदरीत बघायला गेलं तर जो तो आपापल्या यशाच्या मागे धावतो आहे त्याला सण ,संस्कृती याची काहीही पडलेली नाही . हे जर असाच चालू राहिल तर आपली संस्कृती ,परंपरा नष्ट होईल . पुढच्या पिढ्याना या गोष्टी समजणारच नाही .
तर मित्रांनो आपण हे चित्र बदलायला हवं ,आपले सण ,संस्कृती जपणे हे आपल्या हातात आहे . तिचे जातं केले पाहिजे तरच ती टिकेल . दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण आपण मनापासून.आनंदाने ,उत्साहात साजरे केले पाहिजे . असे आपण केलं तर जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल.
No comments:
Post a Comment