गावातील घरे आणि राहणीमान
गावाचे भौगोलिक स्थान जर आपण बघितले तर गावाच्या तीनही बाजूनी खारे पाणी आहे. इकडची हवा सुद्धा खारी आहे . पावसाळ्यात गावातील लोक खूप भीतीखाली वावरत असतात कारण खूप वारा आणि पाऊस असतो .गावातील घरे हि बहुतेक कौलारू आहेत तर काही लोकांनी विविध प्रकारची घरे बांधली आहेत .बहुतेक लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे .अनेक लोकांच्या स्वतःच्या होड्या व मोठ्या ट्रॉलर्स आहेत .गावात सरकारी बसेस ची सेवा उपलब्ध आहे .निसर्गाने या गावाला खूप भरभरून काही दिल आहे परंतु अजून खूप सुधारणा करण्याची गावकऱ्यांची इच्छा आहे .गावात एकत्रित मासेमारी करण्याच्या पद्धतीला रापण असे म्हणतात त्यातून बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो .काही लोक शहाळी व नारळाचा व्यवसाय करतात ..गावातील काही छायाचित्रे
तळाशील जेट्टी |
रापण |
अशी ही घराला घरपण देणारी माणसं
No comments:
Post a Comment