Sunday, October 7, 2018

EXPLORE TRAVEL ENJOY

                             भौगोलिक स्थान (geographical place)

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यापासून सुमारे २२किमी दूर तळाशील हे गाव वसले आहे. या गावच्या पश्चिमेला (मागच्या बाजूला) अरबी समुद्र या पुढच्या बाजूस गंड  नदी आहे .दक्षिणेला गावाचे टोक निमुळते होत गेले आहे .बरेच पर्यटक संगमाचे विहंगम चित्र पाहण्यासाठी येथे येतात . गावापासून काही किमी अंतरावर समुद्रात काही खडक आहेत त्यास (कवडा )असे म्हणतात .काही साहसी लोक तिकडे बोटीतून सफर करून येतात .गावात नारळाची खूप झाडे आहेत तसेच आंबा,फणस,काजू,जांभूळ,करवंद,पपई,केळी ,रातांबे,यांची खूप झाडे आहेत . पावसाळ्यात लाटांच्या तडाख्यामुळे गावाचे मोठे नुकसान होते. गावात काही ठिकाणी लोकांनी बंधारे सुद्धा बांधले आहेत. पण निसर्गाच्या प्रकोपापुढे माणसाला काही करता येत नाही तेही खरेच . अश्या या निसर्गसौन्दर्याने नटलेल्या गावात पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे . अथांग समुद्र,निळेशार नदी,मस्त मालवणी जेवण,सुरुच्या बाग ,होडीची सफर,मनमोहक वातावरण या सर्वांचा पर्यटक मनमुराद आनंद लुटतात . 
अथांग समुद्रकिनारा 
भौगोलिक स्थान 

गंड नदी 
                                                                                मासेमारी 

अथांग समुद्र आणि नदी लाभल्यामुळे येथे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे . नदीत खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात जसे की बोईट ,बांगडा ,खेकडे,कोळंबी ,तारले,पेढवे,इ प्रत्येक माशांसाठी वेगवेगळ्या जाळ्यांच्या वापर केला जातो . तसेच सकाळच्यावेळी व दुपारी नदीचे पाणी सुकते  त्याला भाट असे म्हणतात तेव्हा तिकडे शिंपल्या मोठ्या प्रमाणावर मिळतात .समुद्रात ट्रॉलर्स जातात व  मोठमोठे मासे मिळतात त्यास रापण म्ह्नणतात त्यास खूप मेहनत लागते .गावात बरेच रिसॉर्ट आहेत तिथे खूप मस्त,चमचमीत मालवणी जेवणाचा आस्वाद घेता येतो 
मालवणी जेवण 

  

spicy and nonveg foodlovers you are welcome in talashil.........

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...