Wednesday, October 24, 2018

EDUCATION शिक्षण आणि करिअर

             
अहो बाबा मला डॉक्टर व्हायचय.....अग आई मला डान्सर व्हायचय....ए ताई मी मोठेपणी ॲक्टर होणार...हे असे संवाद आपण आपल्या आजूबाजूला एकलेच असतील........पण यातली किती मुले आपापल्या आवडत्या गोष्टीत करियर करु शकतात किंवा करु शकली.......

 आज आपण पाहील तर, आजची पिढी खूप हुशार आहे.त्यांना करियरची हजारो दालने उघडी आहेत.पण मुळात त्यांना ज्या गोष्टी करायच्या असतात त्या त्यांना करताच येत नाही.कारण आपल्या घरीच एक विचारपद्धत विकसित केली आहे,ती म्हणजे दहावी पास हो, बारावी उत्तीर्ण हो , पदवी मिळव ... म्हणजे थोडक्यात चांगल शिक आणि नोकरी ला लाग......बस....संपल आयुष्य....
अस केल तर कसे उत्तम डान्सर, उत्कृष्ट अभिनेता, क्रिकेटपटू निर्माण होणार....
बिचारी ती पोर नाईलाजाने पडेल ते काम करुन समाधान मानतात...या गोष्टीला खरच करियर म्हणाव.....की अजून काही??
आजचा काळ खूप बदलला आहे मित्रांनो. आज प्रत्येक क्षेत्रात खूप संधी आहेत.गरज आहे फक्त तूमच्यातल्या गुणवत्तेची आणि क्षमतेची... त्यासाठी तूम्हाला तूमच्यातल लपलेला कलाकार, गायक, खेळाडू शोधावा लागेल.कारण तूम्ही तूमच आवडीच काम करत असाल तर तूम्हाला कधीच कंटाळा नाही येत..उलट तूम्ही त्यात नवनवीन कल्पनांची भर घालता...
त्यामुळे मी एवढच सांगेन की तूमचा आतला आवाज काय सांगतो त्याकडे लक्ष द्या , लोक काय बोलतील याकडे अजिबात लक्ष देऊ नका...शेवटी कोणीतरी म्हटलेलच आहे ' तूच आहे तूझ्या जीवनाचा शिल्पकार'....

                      All the best........

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...