Friday, October 26, 2018

ANALYSE YOURSELF स्वत:ला शोधा आणि घडवा!!

आपल्यापैकी प्रत्येकाला देवाने काहीना काहीतरी वेगळंपण दिल आहे. जगात असा कोणीच नाही की ज्याच्याकडे काही वेगळ नाही. कोणी उत्तम गाण गात, कोणी सुंदर चित्र काढत, तबला वाजवत, तर कोणी उत्तम फुटबॉल खेळत, कोणाला स्वयंपाकाची आवड असते, कोण उत्तम वक्ता असतो......अशी बरीच उदाहरणे आपण घेऊ शकतो.

  पण आपल्यातल वेगळेपण , कला आपल्याला दिसतच नाही.आपण स्वत:ला काय आवडत यापेक्षा दुसरा काय करतो त्याकडे लक्ष देतो. आणि तेथूनच आपली अधोगती चालू होते. हीच चूक आजचे बरेच विद्यार्थी करतात आणि नंतर पश्चात्ताप करत बसतात...

   चला तर म एक उदाहरण घेऊ, एका वर्गात अथर्व नावाचा मुलगा असतो , अभ्यासात हुशार , गुणी , प्रामाणिक असा व्यवस्थित मुलगा असतो. त्याला गाण्याची व‌ तबल्याची खूप आवड , पुढे जाऊन हा मोठा कोणीतरी कलाकार होणार. त्याच वर्गात राज नावाचा एक विद्यार्थी होता तोसुद्धा अभ्यासू होता..त्याला क्रिकेट ची खूप आवड , भविष्यात तो नक्कीच एक महान क्रिकेटपटू होईल यात काही शंकाच नव्हती. पण या अथर्व ला नेहमी त्याच्या कलेबद्दल कमीपणा वाटायचा .आपणही क्रिकेट खेळून नाव कमवावे असे त्याला वाटू लागले. तो प्रत्यक्षात मैदानात उतरला खेळायला पण त्याला धड फलंदाजी जमेना ना गोलंदाजी ....निराश होऊन त्याने क्रिकेट चा नाद सोडला. तसेच त्यांच्या वर्गात परेश नावाचा मुलगा होता. तो उत्तम अभिनय करायचा त्याला पाहून अथर्व लाही वाटायचे आपण पण ॲक्टिंग करुन नाट्यक्षेत्रात काम करावे ..म्हणून एका अभिनय स्पर्धेत नाव दिले. स्पर्धेच्या दिवशी स्टेजवर गेला आणि त्याला काहीच बोलता आले नाही, अभिनय तर सोडाच..........अस अथर्व बरेच दिवस करत राहिला ... शेवटी निराश होऊन ,मला काहीच येत नाही अशी खंत मनात ठेवून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला..... सुदैवाने तो नंतर वाचला..

     तर मित्रांनो असे अनेक अथर्व आज आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना गरज आहे समुपदेशनाची.. त्यांना स्वत:ला ओळखण्याची आणि घडविण्याची.त्यामूळे मित्रांनो तुम्हाला जे आवडत तेच करा, दुसऱ्यांच्या यशाशी आपली तूलना करू नका..

       " मेहनत करा,यश तुमचेच आहे" 😀😀😀

  

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...