Thursday, November 29, 2018

ATTITUDE IS EVERYTHING

      ATTITUDE IS EVERYTHINHG...

कसला ATTITUDE आहे रे त्याला ? किती माज दाखवतो ? याचा माज उतरावलाच पाहिजे . हे असे वाक्य आपण आपल्या आजूबाजूला नेहमी ऐकतो . तर काय असतो हा ATTITUDE ? कुठून येतो तो? चला तर मग बघूया .

तर हा ATTITUDE  म्हणजे मराठीत 'वृत्ती' , एखाद्याचा  वृत्तीवरून तो माणूस  कसा आहे याचा आढावा आपण  घेऊ शकतो.  आपल्या भाषेत आपण त्याला "माज" बोलतो. आता  हा माज बऱ्याच गोष्टींचा असू शकतो . एखाद्याला पैशांचा माज असतो, कोणाला स्वतःच्या ज्ञानाचा माज असतो, कोणाला तर स्वतःच्या  दिसण्याचा  माज असतो . आणि माणूस हाच माज नको तेव्हा नको त्या ठिकाणी दाखवतो , आणि स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत पाडून घेतो.

प्रत्येकाला स्वतःकडे काहीनाकाही वेगळे असण्याचा आनंद होत असतो . पण एख्याद्या गोष्टीचा अभिमान ,आनंद असणे आणि माज असणे यात खूप फरक असतो . एक उदाहरण घेऊया , समीर नावाचा  एक मुलगा असतो . खूप श्रीमंत असतो . खूप मालमत्ता असते त्याच्याकडे ,बिना काम करता सुद्धा तो बसून खाऊ शकतो . त्याला बाईक चालवायचा खूप शोक असतो. रस्त्यावर तो कसाही बाईक चालवायचा . एके दिवशी त्याने  एका मुलीला ठोकल. चुकी त्याचीच होती .उलट तो त्या मुलीशी भांडत बसला. पोलीस आले तर त्यांच्याशी जोरदार भांडत बसला . त्यांनाच पैशानी माज दाखवत होता . तर याला म्हणतात माज . जो कि असू नये . माणसाने पैसे खूप कमवावे , श्रीमंत व्हावं पण त्याचा माज करू नये . नंतर आपल्यालाच भोगावं लागत .

तर एक राजू नावाचा मुलगा असतो . तो उत्तम क्रिकेट खेळायचा . त्याने खूप मोठ्या स्तरावर मोठी कामगिरी केली आहे . मोठं मोठ्या दिग्गजांकडून त्याच कौतुक झालं होत . पण या गोष्टीचा कधी त्याने दिखावा केला नाही . उलट तो नम्रपणे सर्वाना सांगायचा ,मी काही मोठा माणूस , सेलिब्रेटी नाही . मी नेहमी नवीन नवीन शिकत असतो. क्रिकेट खेळण्यातून मला आनंद मिळतो. माझा व्यायाम होतो ,बस्स . मित्रानो याला म्हणतात अभिमान असणे आणि आनंद असणे .

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता , किंवा कोणी आपले कौतुक करावे अशी अपेक्षा मनात न धरता केलेले काम केव्हाही चांगले . आणि तेच जास्त यशस्वी होते.  तुमची वृत्ती ठरवते कि तुम्ही कोण आहेत, आणि पूढे आयष्यात तुम्ही काय मिळवणार आहेत.त्यामुळे तुम्हीच तुमचं परीक्षण करा आणि स्वतःला ओळखा . काय चूक ,काय बरोबर हे समजून घ्या . 

असं म्हणतात कि स्वभावाला औषध नसते . खरंय पण आपण काय योग्य काय अयोग्य हे तरी समजून घेऊ शकतो. कोणत्या गोष्टीने आपल्याला व दुसर्यांना आनंद होईल, किंवा कोणत्या गोष्टीने दुसर्यांचे मन दुखावले जाणार नाही हे तर आपल्यला कळू शकत.

 पण आजकालच्या पिढीला या गोष्टी कुठे समजणार ,या पिढीला चांगल आणि वाईट हे काहीच कळत नाही . काळानुसार माणसाची वृत्ती बदलत चालली आहे . तुमची वृत्ती कशी आहे त्यावर तुम्हाला तुमचे फळ मिळते .

उद्या तुम्ही कुठल्याही ऑफिस मध्ये जाल कामासाठी तिथे काम महत्वाचे आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे ते म्हणजे तुमची वृत्ती , तुमचा स्वभाव . एक वेळेस माणसाला काम कस करायच, technical गोष्टी  या सर्व गोष्टी शिकवता येतील पण माणसाचा स्वभाव, वृत्ती हे कुठे शिकवल नाही जात ,ते स्वतःच्या रक्तात असाव लागत .

त्यामुळे तुमचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती बदला ,तुम्ही बदलले कि समोरचे बदलतील , असं करत करत संपूर्ण समाजाची वृत्ती बदला . कारण मी वरती म्हटलेच आहे....

                                 "ATTITUDE IS EVERYTHING"




Was ist der ATTITUDE Ray Ray? Wie viel zeigt es? Es muss vergessen werden. Dies ist der Satz, den wir immer um uns herum hören. Was ist das ATTITUDE? Woher kommt es? Mal sehen.

Diese HALTUNG bedeutet also, dass wir in Marathi eine „Haltung“ einnehmen und die Haltung der Person zur eigenen Haltung überprüfen können. In Ihrer Sprache sprechen Sie "maj" mit ihm. In diesem Monat können viele Dinge sein. Jemand hat die Macht des Geldes, jemand ist der Meister seines eigenen Wissens, jemand hat die Macht, sich selbst anzusehen. Und der Mann will die Arbeit nicht machen, er will es an dieser Stelle nicht zeigen und ertränkt sich in den Augen anderer.

Jeder ist froh, etwas anderes als sich selbst zu haben. Es gibt jedoch einen Unterschied zwischen Stolz, Spaß und Spaß. Nehmen Sie ein Beispiel, haben Sie einen Sohn namens Sameer. Sehr reich Er kann viel Reichtum haben, sitzen und essen, ohne zu arbeiten. Er hat großes Glück, ein Fahrrad zu fahren. Er will auf der Straße Fahrrad fahren. Eines Tages schlug er ein Mädchen. Es war seine Schuld. Im Gegensatz dazu geriet er mit dem Mädchen in Streit. Wenn die Polizei kam, wurde sie in einen heftigen Kampf verwickelt. Er zeigte nur Geld. Das heißt also Maj. Das sollte nicht sein. Der Mensch sollte viel Geld verdienen, reich sein, aber es nicht tun. Dann musst du es nehmen.

Es gibt einen Sohn namens Raju. Er hat großartiges Cricket gespielt. Er hat großartige Arbeit geleistet. Es wurde von großen Größen geschätzt. Dies wurde jedoch nie gezeigt. Im Gegenteil, sagte er höflich, ich bin kein großer Mann, Berühmtheit. Ich lerne immer neue. Cricket zu spielen macht mir Freude. Meine Übung, Bass. Freunde heißen Stolz und Glück.

Erwarten Sie niemals Obst oder hoffen Sie, dass jemand Sie schätzen würde, und tun Sie niemals etwas Gutes Und das war erfolgreicher. Ihre Einstellung bestimmt, wer Sie sind und was Sie in Zukunft bekommen werden. Deshalb prüfen Sie sich und identifizieren sich. Verstehe, was falsch ist, was richtig ist.

Es wird gesagt, dass es keine Medizin in der Natur gibt. Tatsächlich können wir verstehen, was richtig oder falsch ist. Lassen Sie uns wissen, was Sie und andere glücklich macht oder was andere nicht verletzt.

Aber die heutige Generation wird wissen, wo diese Dinge sind, und diese Generation ist nicht gut und schlecht. Die Einstellung des Menschen ändert sich mit der Zeit. Sie erhalten das Ergebnis Ihrer Einstellung.

Morgen ist die Arbeit für Sie wichtig, um in jedem Büro zu arbeiten, aber noch wichtiger ist Ihre Haltung, Ihre Natur. Sobald ein Mann arbeiten kann, können technisch alle diese Dinge gelehrt werden, aber wenn keine Einstellung, keine Einstellung eines Mannes gelehrt wird, sollte er in seinem eigenen Blut sein.

Ändern Sie also Ihre Einstellung zu allem, ändern Sie, ändern Sie die Einstellung der gesamten Gesellschaft, indem Sie dies tun. Weil ich oben gesagt habe ...

  

                      

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...