Saturday, November 24, 2018

BODY IS BECOMING WEAK HEALTHCARE

                               शरीर कमजोर होत चाललंय ...

मित्रांनो आपण जर निरीक्षण केल तर आजची तरुण पिढी , किंवा ३०-४० वयातली माणस हि शारीरिक दृष्ट्या कमजोर पडत चालली आहेत .आणि याउलट ज्यांनी ७० गाठली आहे किंवा खूप वृद्ध माणस हि त्यामानाने खूप तंदरुस्त आहेत . काय असेल हो याचे कारण ... चला तर मग जाणून घेउया .

मित्रानो पूर्वीच्या काळी कोणते तंत्रज्ञान नव्हते, मोबाईल नव्हते . गाडी घोड्याची व्यवस्था नव्हती . सगळी कामे माणसाला स्वतःहून करावी लागत होती . शारीरिक कष्ट खूप होते . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचं प्रमाण व्यवस्थित होते. शरीराला आवश्यक , पौष्टिक , आणि गरजेपुरतच ते खात होते. त्यांच्या खाण्यामध्ये साधारणतः फळे , ताज्या भाज्या , कडधान्ये , अंडी ,दूध, सुका मेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ होते. हे सर्व पदार्थ आजही आपल्याला उपलब्ध आहेत . परंतु फरक एवढाच आहे तो म्हणजे शुद्धतेचा . त्यावेळी सगळे पदार्थ हे नैसर्गिक , ताजे, बिना प्रोसेस केलेले मिळत होते . पण आजच्या काळात तसे मिळताना दिसत नाही . सर्व खाण्याची उत्पादने ,पदार्थ हे कृत्रिम रित्या तयार केलेले असतात . फळं , भाज्या हे रसायनांचा वापर करून पिकवलेले असतात .  तसेच ज्या खूप काळ टिकणाऱ्या गोष्टी आहेत त्यात रसायने टाकलेली असतात  जी कि आरोग्यास हानिकारक असतात ,आणि याचा नकळत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो व तो आपल्यला कळत देखील नाही .

मित्रानो पहिल्या काळी कर्करोग,हृदयविकार, मधुमेह, टीबी , यांसारख्या रोगांचं प्रमाण किती होत ? किती लोक या आजारांनी मरत होती? आणि आज बघा  किती लोक या भयंकर आजारांनी पीडित आहेत. हे सर्व कशामुळे होत आहे ते म्हणजे भेसळयुक्त व रासायनिक  खाण . जसा जसा काळ बदलत गेला  तसतशी  मानवाची जीवनशैली बदलत गेली . माणूस आळशी व स्वार्थी बनू लागला आहे .

दिवसेंदिवस वाढत्या  स्पर्धेमुळे माणूस स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी झटत आहे . पण हे करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे तो दुर्लक्ष करत आहे . आणि मग तिने नाही मिळालं कि रस्त्यावरचा वडापाव, कांदा भजी तेलकट तुपकट खातो आणि तेच नंतर त्याला महागात पडत . रस्त्यावरच जळालेले तेल , आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वरून बनवलेले पदार्थ खाऊन मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार बळावले आहेत .

लहान मुलांमध्ये तसेच तरुण पिढी मध्ये पिझ्झा ,बर्गर ,फ्रॅन्की यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त उत्सुकता असते . तसेच त्यांना रंगीबेरंगी , चटपटीत , अशा गोष्टी जास्त आवडतात पण त्याच त्यांना नंतर घातक ठरतात . त्यामुळे लहान मुलांमध्येच आजकाल आपण बघतो कि मधुमेह, लठ्ठपणा , यांसारखे आजार वाढले आहेत . तसेच मोबाइल इंटरनेट , गेमिंग यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होत आहे . परिणामी वाढते वजन, उच्च रक्तदाब यांचे प्रमाण वाढत आहे . सगळ्या गोष्टी जागेवर बसून खायची सवयच लागली आहे.

त्यामुळे आपल्याला आपले शरीर तंदरुस्त ठेवायचे असेल तर शक्य तितके नैसर्गिक, पौष्टिक अन्न ग्रहण करावे . पुरेसा व्यायाम करावा . तणावमुक्त राहावे . शेवटी आरोग्य चांगल असेल तर सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो . कारण कोणीतरी म्हटलंच आहे ...... "HEALTH IS WEALTH".






 

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...