Friday, November 30, 2018

EXPLORE QUANTITY OR QUALITY

                          


                 QUANTITY SPEAKS MORE BUT QUALITY WORKS MORE............

               

           आज आपण आपल्या देशातल्या शिक्षणपद्धतींविषयी  बोलूया . खरंच आपली शिक्षण पद्धती भक्कम आहे का देश घडवायला . कि त्यात सुधारणा करण्याची गरज आहे . आज भारतात अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत. त्या मधून दरवर्षी लाखो लोक शिकून बाहेर पडतात . आत ती काय आणि कशी शिकून बाहेर पडतात आणि पुढे काय करतात हे देवालाच माहीत . हातात मात्र डिग्री असते दाखवायला लोकांना , पण त्याचा काही उपयोग होतो खरंच ....कि फक्त दिखाव्यापुरती .....?

आजची पिढी ही जलद धावणारी आहे. त्यांचे विचार हे सुद्धा तेजात असतात. एखादी गोष्ट त्यांना लगेच समजते . खूप हुशार पिढी आहे आजची , आणि अशीच हुशार राहिली तर आपल्या देशाचे नाव उज्वल होईल यात शंकाच नाही . पण नुसतं हुशार असून चालत नाही ,हुशारीला जोड लागते ती म्हणजे शिक्षणाची .  पण खरंच आजच्या शिक्षणपद्धती मुळे एखादा विद्यार्थी त्याचा विकास करू शकेल?

खरंतर आज आपण बघितला तर आजच्या शिक्षणात पाठांतरावर भर दिला जातो.  विषय कुठलाही असो पाठांतर पाहिजेच ,मी तुम्हला तो विषय समजो अथवा ना समजो . आणि पुन्हा त्याची परीक्षा घेणार?मग मुलांच्या पोटात अजूनच गोळा येतो. तर हे सगळं असं चाललंय आजच्या जगात..... नुसत घोकंपट्टी करून मार्क मिळवून परीक्षेत पहिला येणारा हुशार  आणि वर्गात एखादा विषय समजून घेऊन अभ्यास करून पण कमी मार्क मिळवलेला ,तो म्हणजे ढ ... ही सध्या शाळेत चाललेली हकीकत आहे . मित्रानो इथेच तर चूक होतेय . तुम्ही एखादा विषय अभ्यास म्हणून नका घेऊ , तर तो विषय जगा ,त्यातली मज्जा घ्या , वास्तविक जीवनाशी त्याची तुलना करा , मग बघा तुम्ह्लाच शिकण्यात किती आनंद वाटतो..

अभियांत्रिकी क्षेत्राशी तसा माझा जास्त संबंध आला आहे, इकडेही तशीच गोष्ट आहे, अभ्यास बदलला आहे ,पण पद्धत मात्र तीच . आणि यांच्या परीक्षा म्हणजे एक प्रकारची "स्मरणशक्ती खेळासारखं" आहे . कोण ३ तासात जास्तीत जास्त लक्षात ठेऊन कोण भरपूर लिहीत ,यावर भर दिला जातो . त्या मुलाला तांत्रिकदृष्ट्या किती ज्ञान समजला आहे ते गेलं तेल लावत ... आणि असे करून भरपूर मार्क्स मिळवतात मुलं , पण त्यांना परीक्षेनंतर एखादा उलटसुलट प्रश्न विचारला कि त्यांचे बारा वाजतात .त्यांना त्याच्यातली अ ,आ ,ई  पण माहित नसत . म्हणजे थोडक्यात घरी भरपूर घोकायचं आणि परीक्षेला जाऊन सगळं ओकायचं ..एवढंच येत मुलांना . बिचारे पोर मार्कांसाठी काहीपण करतात . हे असं जर सुरु राहिला तर हुशार, कौशल्य, निपुण असलेले इंजिनियर कसे मिळणार आपल्याला , वर नंतर आपणच ओरडत बसतो भारतात लाखो इंजिनियर घरी बसलेत ,त्यांना काम ,नोकऱ्या काहीच नाही . अहो घोकंपट्टी करून दुसरा काय होणार ..

आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानावर जरा कमी भर दिला जातो. आणि सैद्धांतिक (माहितीनुरूप) ज्ञानावर जात भर दिला जातो. आणि याच गोष्टीमुळे आपण मागे पडतो. त्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट किती समजल त्याचा अंदाज मिळतो . जर आपल्या देशात प्रात्यक्षित परीक्षांवर जास्त भर देऊन मुलांचे कौशल्य वाढवले तर जास्त प्रगती होईल. आणि याच प्रगतीची देशाला खरी गरज आहे .

त्यामुळे तुम्ही वेळ काम केलं ,किती केलं यापेक्षा कशाप्रकारे केलं ,आणि कस केलं याला जास्त महत्व आहे. जस कि तुम्ही किती वर्ष जगला यापेक्षा कस जगलात याला लोक जास्त विचारतात  म्हणून वरती म्हटलं आहे कि ......

                              " QUANTITY SPEAKS MORE BUT QUALITY WORKS MORE............"       

                                                 जय हिंद !!!!

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...