मुंबई आणि मराठी
भाषा
पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचे मिळून सौराष्ट्र असे राज्य होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मराठी नेत्यांनी सयुंक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला आणि १ मे १९६० रोजी मराठी भाषिक राज्य म्ह्नणून मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . तेव्हा लोकांमध्ये खूप उत्साह होता .मराठी लोकांनी खूप जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले. त्यावेळी मुंबईत ९० ते ९५% मराठी माणूस होता . सगळीकडे मराठी वातावरण होते .सॅन उत्सव साजरे केले जायचे . पण नंतर हळूहळू काळ बदलत गेला . सर्व सुखसुविधा मुंबईत असल्यामुळे बाहेरील लोकांची मुंबईत गर्दी वाढायला लागली . मोठमोठ्या नामांकित शिक्षणसंस्था , महाविद्यालये, दवाखाने , इस्पितळ,
यामुळे मुंबईत लोकसंख्या वाढायला लागली. पण असे असले तरीही सर्व गुण्यागोविंदाने राहत होते. कोणताही मतभेद नव्हता . सगळे मिळूनमिसळून राहत असत .
पण गेल्या काही वर्षांपासून परिस्थती बदललीय . जसा जसा काळ बदलत गेला , तंत्रज्ञान प्रगत झाले, माणसाच्या गरजा वाढल्या , जो तो आपापली स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे धावू लागला , आणि हे सगळं करण्यासाठी ,गरज पुरवण्यासाठी होती ती आपली मुंबई म्हणजे आपली मायानगरी . कारण इकडे आलेला माणूस कधीच उपाशी मारत नाही .तो काहीनाकाही कमवून,काम करून पोटाची भूक भागवत असतो . मुंबईत काय नाही आहे ...सगळं काही आहे मोठमोठ्या गगनचुंबी इमारती .कॉर्पोरेट ऑफिसेस , शाळा ,महाविद्यालये,
फिल्म इंडस्ट्री,आधुनिक सोयींनीयुक्त मोठोमोठे दवाखाने , समुद्रकिनारे ,गार्डेनस आणि बरच काही .
पण याच आपल्या जन्मभूमीत ,कर्मभूमीत आपणच कोठेतरी हरविल्यासारखे वाटतो आहे . आपल्यालाच आपला मराठी माणूस शोधावा लागतोय . आपलाच माणूस आपल्या आईपासून दूर चालला आहे असे वाटत आहे. आपली मराठी संस्कृती ,परंपरा या सर्वाचा कुठेतरी नाश होतोय असे वाटतंय . जिथे आपण आपल्या पूर्ण हक्काने राह्यला पाहिजे तिकडे दुसरे लोक येऊन राहतायत .आणि आपण हळूहळू जातोय मुंबई बाहेर . तरी अनेक राजकीय पक्ष सांगत असतात ''वाचावा मराठीला ,मराठी माणसाला" पण कोणी त्यांचं ऐकत नाही .
तसच हल्ली इंग्लिश आणि हिंदी च फॅड च झालाय ,इंग्लिश मधून बोलला तर खूप हुशार ,त्याला सगळं काही येत आणि तेच जर मराठीतून बोलला तर गावठीपणाचं वाटत (असं काही आपल्याच मराठी लोकांना वाटत ).
मान्य आहे काळानुसार बदलावं लागत ,इंग्लिश येण खूप गरजेचं आहे .पण यासाठी तुम्ही मराठीची गळचेपी का करताय , ती सुद्धा एक भाषाच आहेना . भाषा हे काही एखाद्याच्या हुशारीच मोजमाप करण्याचं साधन नाहीय ,ते फक्त सवांद साधण्याचं माध्यम आहे . शेवटी काही मुलांवर लहानपणापासूनच हिंदी आणि इंग्लिश मधून संस्कार झालेले असतात कारण सगळे कार्टून्स हे या दोनच भाषेत असतात . मराठी संस्कार हे फक्त घरी आणि पुस्तकातच राहतात . आणि त्यात पालकांचा इंग्लिश शाळांकडे ओढा जास्त , म्हणे इंग्लिश शाळेत गेला की पोरगा हुशार होईल,त्याला सगळं काही येईल (सर्वात मोठा गैरसमज). अहो मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण हे विज्ञानाने देखील सिद्ध केलाय. असो .......
आपल्यला एखादा माणूस भेटला कि त्याच्याशी हिंदीत बोलणं सुरु करण हि आपल्या लोकांची खूप घाण सवय
हीच सवय त्याचा सर्वनाश करेल बहुतेक असं वाटतंय . आपल्याच मायभूमीत राहून आपण का दुसऱ्या भाषेत बोलायचं आणि बहुतेक वेळा असं होत कि खूप वेळाने समजत समोरचा माणूस मराठीच आहे तेव्हा आपण स्वतःलाच शिव्या घालतो .असं केल तर कशी टिकणार मराठी भाषा , मराठी संस्कृती .
माझा अन्य भाषेवर राग नाही ,किंवा परकीय लोकांवरही नाही कारण ती सुद्धा माणसच आहेत ना त्यांना पण आपल्यासारखे शरीर ,मन आहे . पण आपण जिथे राहतो ,खातो ,पितो खेळतो त्या ठिकाणाची भाषा , संस्कृती यांच्याशी बंध जुळवून घेता आले पाहिजेत . मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे , ती सर्वांचीच आहे . सर्वानी मुंबईत या ,राहा,मज्जा करा ,शेवटी घटनेने तो अधिकार दिला आहे .पण इकडे राहून इथल्या स्थानिक लोकांना ,त्याच्या भाषेला ,परंपरेला धक्का पोहचणार नाही याची काळजी घ्या हीच विनंती......
कोणताही मतभेद न करत स्थानिक लोकांशी समरस व्हा ,एकत्र राहा . मग नक्कीच मराठी भाषा आणि संस्कृती भविष्यात टिकेल .
No comments:
Post a Comment