LALBAGH BOTANICAL GARDEN
बेंगलोर शहरातील पर्यटकांचे एक प्रसिद्ध व पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे लालबाघ चे बोटॅनिकल गार्डन . २०० हुन अधिक एकर वर पसरलेले हे गार्डन नेहमीच लोकांना आकर्षित करते . येथे आपल्याला १०००हुन अधिक प्रजातीचे झाड, झुडपे, व विविध रंगीबेरंगी फुले पाहावयास मिळतील. येथील निसर्गाची काही मनमोहक छायाचित्र खाली दाखवली आहेत.
या गार्डन ची निर्मिती १७६० च्या काळात झाली आहे. मुघल सम्राट हैदर अली याच्या काळात हे वसवले गेले आहे . १८५६ पर्यंत या गार्डन ला सायप्रेस्स गार्डन असे ओळखले जात होते. काही वर्षांनी टिपू सुलतान यांनी तिकडे बऱ्याच झाडांची, फुलांची लागवड तेथे केली . सुरवातीला या गार्डेनचा विस्तार खूपच कमी होता ,म्हणजे साधारणतः ३०-४० एकर . नंतर नंतर त्याचा विस्तार होत गेला आणि आज ते जवळपास २४० एकर इतके पसरले आहे .
या गार्डन ला भेट देण्यासाठी जानेवारी आणि ऑगस्ट हे दोन महिने उत्तम आहेत. सकाळी ६ किंवा संध्यकाळी ५-६ च्या दरम्यान भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
या गार्डन मध्ये अनेक छोटी मोठी तळी सुद्धा आहेत. एक सुंदर ,नयनरम्य असा कारंजा सुद्धा आहे. येथील प्रत्येक ठिकाणाची व्यवस्थित देखभाल केली जाते, योग्य ती काळजी घेतली जाते ज्याने करून जास्तीत जास्त पर्यटक
आकर्षित होतील.
तुम्हला जर लेख आवडला असेल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या .
No comments:
Post a Comment