छत्रपती शिवाजी महाराज
एक जाणता राजा ... ... !!!
जगभरात आजवर अनेक मोठे, पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. काही राजांचा इतिहास अभ्यासण्याजोगा आहे. काही राजांचे नाव आजही जगभरात प्रकर्षाने घेतले जाते . या राजांपैकीच एक हुशार , पराक्रमी, दूरदृष्टी असलेला , कणखर, लढवय्या असा राजा ज्याने फक्त मराठी मनावरचं नाही , भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील माणसांच्या हृदयावर ज्याने राज्य केले असे आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
शिवनेरी किल्ला |
शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला .
त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले .आई जिजामाता हिच्या पोटी हा जाणता राजा आपल्या महाराष्टात जन्माला येण हि खूप अभिमानाची बाब आहे. महाराज लहानपणापासूनच शूरवीर होते ,. तलवारीचे ,दानपट्टा चालवण्याचे , साहसी खेळ हे महाराज लहानपणीच शिकले .
शिवाजी महारांच्या पराक्रमाविषयी आपण सर्वानी वाचलेच असेल , जसे की अफझल खानाचा वध
अफझल खान वध |
आग्रा वरून सूटका |
शायिस्तेखान ची बोटे कापणे , पन्हाळा गडाच्या वेढ्यातून सुटका , आग्र्यावरून पळ काढणे असे अनेक पराक्रम महाराजांनी केले . महाराज प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजन करून करत असत . शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या तत्वावर त्यांचा जास्त विश्वास होता. म्हणून मूठभर मावळे का असेना त्यांनी स्वराज्य निर्माण केले . मोगलांच्या बलाढ्य राजे महाराजांना त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.
सिंधुदुर्ग किल्ला |
मुरुड जंजिरा |
प्रतापगड |
शिवाजी महाराजांचे आरमार कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी बांधलेले मुरुड जंजिरा , सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग हे किल्ले सुद्धा पाहण्यासारखे आहे. या किल्ल्याना भेटी देताना त्यावेळेच CIVIL ENGINEERING किती मजबूत होत याची कल्पना येईलच .नाहीतर आजच्या इमारती १० वर्ष झाली कि दुरुस्त कराव्या लागतात . आजच्या बिल्डर्स नी महाराजांच्या अभियांत्रिकेचा अभ्यास करायला हवा . सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पाहून तर बोट तोंडातच जातात . विजयदुर्ग किल्ल्याकडील संरक्षण भिंती ज्याने शत्रूला चकवा लागेल त्या खरंच उल्लेखनीय आहेत . जलदुर्ग च नव्हे तर भुईकोट किल्ल्यावरही महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना येते . किल्ल्यांची रचना , तटबंदी , नगारखाना ,दारुगोळा तोफ , इतर पायाभूत सुविधा या सर्वांकडे विशेष लक्ष देऊन महाराजांनी किल्ले बांधले . महाराजांचा गनीमी कावा तर विशेष वाखाणण्याजोगा आहे .
राज्याभिषेक सोहळा |
महाराज हे जातीपातीच राजकारण कधीच करत नव्हते तसेच धर्मभेद सुद्धा करत नव्हते . त्यांच्या कार्यकारी सेवेसाठी अनेक मुस्लिम बांधव सुद्धा होते . मुस्लिम लोकांवर कधीही अन्याय होऊ नाही दिला त्यांनी . समाजातील स्त्रियांचा ते विशेष आदर करायचे . जो अन्याय करत असे त्याला जशास तसे उत्तर द्यायचे . म्हणून या गुणांमुळेच आज जगभरात महाराजांचं नाव घेतल जात .महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर हनुमानाचे एक तरी मंदिर आहे, यावरून महाराजांचे मारुतीप्रेम व श्रद्धा दिसून येते .
रायगड किल्ला |
अश्या या महान ,अष्टपैलू राजाचा ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर मृत्यू झाला .
महाराजांबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे . कारण महाराजांची महती होतीच तेवढी. पण भविष्यात पुन्हा असा राजा होणे नाही ...
अश्वारूढ महाराजांचा पुतळा |
No comments:
Post a Comment