मी मराठी भाषा बोलतेय .....!!!
नमस्कार मित्रानो ,ओळखलंत का मला ,मी तुमची मराठी भाषा बोलतेय . काय सांगायचं तुम्हला ,आता तर अगदी जीव जाण्याची पाळी आली आहे माझ्यावर . अमृताशी हि पैजा जिंकणारी मी , आज माझी अवस्था काय झाली आहे .
पाहिलं किती सुंदर होत मित्रानो , महिन्याच्या प्रत्येक दिवसात माझा वापर व्हायचा , सकाळी उठताना वक्रतुंड महाकाय, प्रार्थना , दुपारी जेवणावरचा श्लोक , संध्यकाळी शुभंकरोती अगदी नित्यनियमाने मुले करत होती . चंपक ची पुस्तके वाचत होती , अलीबाबा आणि चाळिशीतले चोर , विक्रम वेताळ च्या गोष्टी वाचत, ऐकत असत . काही नाही तरी आपल्या पालकांना आई -बाबा तरी म्हणत असत खूप वेगळा काळ होता तो ,खूप सुंदर होता .मलासुद्धा खूप छान वाटत होते .सगळं काही सुरळीत चालू होत .... पण अचानक 'इंग्रजी भाषेमुळेच आपला मुलगा आयुष्यात खूप पुढे जाईल आणि प्रगती करेल 'हा गैरसमजाचा किडा पालकांच्या डोक्यात घुसला आणि माझ्या ऱ्हासास सुरवात झाली ती आजतागायत चालूच आहे . ....
मराठी घरातील मुलांना सुद्धा हिंदी, इंग्रजी कार्टून याची चटक लागली . साहजिकच त्यांच्या वागण्या बोलण्यात सुद्धा ते उतरू लागल. रामायण ,महाभारत यापेक्षा स्पायडरमॅन ,बॅटमॅन ,डोरेमॉन यागोष्टी मुलांना आवडू लागल्या . शुभम करोति म्हणणारी मूल तर बोटावर मोजण्यासारखी असतील आजच्या जगात . अ आ ई पेक्षा A B C D आवडायला लागलाय मुलांना . श्लोक, पारायण, यापेक्षा हिंदी, इंग्लिश रॅप सॉंग्स ते गाऊ लागलेत . जिकडे तिकडे माझा विसर पडू लागलाय माझा . अतिशय गरीब अवस्था झालीय माझी . दुःख याच होत कि माझ्याच मायभूमीत राहून माझ्याच लोकांनी माझी अवहेलना केली आहे .
कॉलेज च्या पोरां मध्ये तर अजून वेगळच , हिंदी ,इंग्लिश मधून बोलणं म्हणजे त्यांना स्टायलिश वाटते आणि मराठीतून बोलला कि कमीपणा वाटतो. (अक्षरशः गावठी )असं बोलल तरी वावगं ठरणार नाही . सगळीकडे माझा अपमान करतात , मराठी च नाव काढली कि नाक मुरडतात . असं वाटतंय कि मलाच माझ्याच घरात वाळीत टाकलय . लोकांनी सुप्रभात ची जागा good morning ने घेतली, नमस्कार ची जागा hello नि घेतली , हल्ली तर ट्रेन, बस मध्ये सुद्धा मराठी बायका इंग्लिश मधून भांडतात ,हा तर नवीनच ट्रेंड म्हणावा लागेल .
आज काही अमराठी लोक महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करतात , बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा निदान समजून तरी घेण्याचा प्रयत्न करतात . आणि आपलेच काही मूर्ख लोक आहेत त्यांना स्वतःच्या भाषेची लाज वाटते . कुंपणच शेत खातंय असं बोललं तरी चुकीचं ठरणार नाही. आज अनेक भाषेतील मोठं मोठे दिग्दर्शक मराठीत काहीतरी नवीन साहित्य निर्माण करण्याचं प्रयत्न करतायत , मराठी सिनेमा त्यांना आवडतो आणि आपले मराठी प्रेषक इंग्लिश आणि हिंदी सिनेमा पाहायला जातात . अहो मी म्हणते आपल्या भाषेला , सिनेमाला,साहित्याला आपण नाही मोठं करणार तर मग कोण करणार . आपणच आपल्या भाषेला ,माणसांना ,संस्कृतीला मोठं केलं पाहिजे तरच मी टीकेन भविष्यात ......
बघा मित्रानो माझं भविष्य तुमच्या हातात आहे , तुम्ही मला जगवल तर मी जगेन अन्यथा माझा अंत काही दूर नाही . माझा वेगळा दिवस साजरा करावा लागतोय हि एक वेगळी शरमेची बाब ...असो तर या २७ फेब्रुवारी पासून मला जपण्याचा , माझा जातीत जास्त वापर होईल याचा प्रयत्न करा नाहीतर माझा उल्लेख भविष्यातील पुस्तकात असा केला जाईल कि 'एक मराठी नावाची भाषा होती ,एके काळी ती बोलली जायची कालानुरूप ती बदलत गेली व आता ती कोणीच बोलत नाही मुळात ती कोणाला माहीतच नाही '
- तुमची लाडकी मराठी भाषा
No comments:
Post a Comment