Sunday, March 17, 2019

CHILDHOOD MEMORIES

                                         रम्य  ते  बालपण.....

काल एका मुलाला विचारला चाल रे कांदाफोडी खेळूया , तर तो मुलगा माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता .कदाचित त्याने तो शब्दच कधी ऐकला नव्हता . मग मी त्याला विचारल तुला कोणता खेळ आवडतो खेळायला तर तो म्हणाला PUBG, CANDY CRUSH, मी मनात म्हटलं अरे देवा !!! काय आजची हि पिढी ,काय त्यांच्या आवडीनिवडी , कस होणार त्यांचं पुढे .........

काही वर्षांपूर्वी आम्ही शाळेतून आलो कि दप्तर टाकून खाली खेळायला जायचो , संपूर्ण सोसायटीतील मुले एकत्र खाली जमायचो . खेळता खेळता अक्खी बिल्डिंग दणाणून सोडायचो . नुसत्या काही लोकांच्या तक्रारी, आरडाओरड आणि बराच काही ..नुसती मज्जा असायची . लपाछपी खेळण्याची मज्जा काही औरच . आम्ही मूल मूल लपायला जाताना एकमेकांचे कपडे बदलायचो . आणि ज्याच्यावर राज्य असेल त्याने चूकीचे ओळखले कि 'आटली बाटली फुटली' असं म्हणून ओरडायचो . जिथे जागा मिळेल तिथे फटीत लपायचो . लगोरी ,डब्बा एक्प्रेस , डोंगर का पाणी , पोपटा पोपटा तुझा रंग कोणता , यासारखे खेळ रोजच्या रोज खेळायचो . वेगळेच वातावरण होते त्यावेळी . पण कालांतराने MOBILE नावाचा किडा आपल्या आयुष्यात घुसला आणि त्याने सर्वाना आतुन बाहेरून पोखरून काढले . आयुष्यातला सर्व आनंदच हिरावून घेतला . जो तो माणूस नुसता मोबाइल वरच असतो.  १ मिनट पण त्याच्याकडे वेळ नसतो मन वर काढायला. पालकही आपल्या मुलांना मोबाइल आणून देतात ,बाहेर जाण्यापेक्षा घरी गप तरी बसेल म्हणून मोबाइल खेळायला देतात . त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळायला आवडत नाही . ते बाहेर जाण्यापेक्षा घरातच मोबाइलवर गेम खेळायला ते पसंद करतात .  आणि मग नको त्या आजारांना आमंत्रण तेही अगदी लहान वयात .

टेकनॉलॉजिने आपले जीवन सुसह्य केले आहे पण एक निरागस चेहऱ्यवरचा आनंद पुसला गेला.  आज आपण इतके मोबाइलला शी व्यसनाधीश झालो आहोत ना कि आपल्या जवळच्या लोकांशी बोलायला पण वेळ उरलेला नाही आपल्याकडे , आपल्या बाजूला कोण राहतंय हे सुद्धा आपल्याला माहित नसत इतके आपण व्यस्थ आहोत . तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे पण माणसे दूर केली आहेत . माणसाने तंत्रज्ञांनाचा वापर  जरूर करावा पण एका मर्यादेपर्यंत .

आजच्या लहान मुलांनी तरुणांनी मैदानात उतरायला हवे . क्रिकेट , फुटबॉल , कबबडी यांसारखे खेळ खेळायला हवेत. काहीच जमले नाही तर धावायला हवे थोडा वेळ . जुन्या लोकांनी नव्या लोकांना जुन्या खेळांची ओळख करून देणे आवश्यक आहे ज्याने करून त्यांना त्याची माहिती तरी होईल असे पण खेळ असतात .

PUBG मध्ये शूटिंग ,नेमबाजीचे कौशल्य दाखवण्यापेक्षा लगोरी मध्ये नेम लावून दाखवा , कांदाफोडी खेळून दाखवा त्यातून मिळणारा आनंद हा नक्कीच वेगळा असेल. शारीरिक कष्टाचे खेळ खेळण्यामुळे नुसता शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य हि सुधारते . आणि आज त्याची जास्त गरज आहे .

लहानपणी झाडावरून चिंच ,बोर,आंबे पडून खाण्याची जी मज्जा होती ती आजच्या पिझ्झा ,बर्गर खाण्यात नक्कीच नाही . सायकल च्या टायर ला मागे काठीने मारून गाडी गाडी खेळण्याची मज्जा काही औरच . तसेच रंगीबेरंगी पतंग , चतुर च्या किड्याला मागे दोरा बांधून खेळणं खूपच मजेदार !!!

म्हणून बालपण तो असा एक अविस्मरणीय काळ होता  जो कोणीच विसरू शकत नाही . आता राहिल्या त्या फक्त आठवणी !!!!

   


No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...