Thursday, August 29, 2019

GANESH FESTIVAL

                                 गणपती बाप्पा मोरया !!


जस मी मागच्या लेखात बोललो आहे कि भारत हा उत्सवप्रिय देश आहे . अनेक उत्सव मोठ्या प्रमाणावर  येथे साजरे केले जातात . विशेष करून महाराष्ट्रात तसेच गोव्यात तसेच जवळपासच्या प्रदेशात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो . गणपती हे सर्वांचं आराद्य दैवत ,कलेचं दैवत . कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात गणपतीच्या प्रार्थनेने होते .

लोकमान्य टिळकांनी समाज प्रभोधन व्हावे , लोकांनी एकत्र यावे यासाठी गणेशोत्सव चालू केला . पहिले  सगळीकडे सार्वजनिक गणपती बसायचे . त्यामुळे सगळे लोक एका ठिकाणी एकत्र यायचे , आरत्या म्हणायचे , विविध कार्यक्रम सादर करायचे ,खूप छान वातावरण असायचे  पण  आता सगळ रूप बसून गेले आहे . उत्सवातील आनंद हरवून गेला आहे. सगळीकडे नुसता गोंधळ, धांगडधिंगा , नाच गाणी यामुळे उत्सवाचे सर्व रंगच बदलले आहेत. हल्ली प्रत्येक गल्लीत , घराघरात गणपती बसतो त्यामुळे लोक आपापसातच व्यस्त असतात . माणसे पहिल्यासारखी एकत्र येत  नाहीत नुसता मोबाइल वर वेळ फुकट घालवतात .  तुमचा गणपती मोठा कि आमचा मोठा , तुमच्या गणपतीला किती लोक येतात , मी तो नवसाला पावणारा आहे का  वगरे वगरे .... या सर्व गोष्टीत आपली लोक वेळ वाया घालवतात .

मुंबई सारख्या ठिकाणी आज अनेक गल्लोगल्ली , गणपती बसतात . त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्राफिक समस्या उदभवतातत , ध्वनी प्रदूषण होते , काही ठिकाणी फटाक्यांमुळे  वायू प्रदूषण होते . तसेच  आगमन आणि विसर्जन वेळी अनेक समस्या निर्माण करतात . समुद्र किनाऱ्यावर विसर्जनावेळी निर्माल्य , इतर कचरा यामुळे जलप्रदूषण देखील होते , तसेच काही पीओपी च्या मुर्त्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्याला येऊन लागतात , अनेक मासे सुद्धा यामुळे मारून पडतात . त्यामुळे सगळीकडेच समस्याच समस्या असतात .

मी तुम्ही आपण सगळे हे चित्र बदलू शकतो . आपापल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न आपण केले पाहिजे . कोणालाही त्रास होणार नाही , निसर्गाची हानी होणार नाही , असा उत्सव साजरा करू शकतो. पीओपी ची मूर्ती आणण्यापेक्षा शाडूच्या मातीची मूर्ती आणली पाहिजे , निर्माल्य व इतर कचरा यांचे योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .. गणपतीच्या मूर्तींवर बंधने आणली पाहिजेत, डीजे ,स्पीकर यावर बंदी आणली पाहिजे. पारंपारीक खेळ , उत्सव  वाढवले पाहिजेत .

अश्या प्रकारे उत्सव साजरा केला तर नक्कीच पूर्वीसारखा गणपती उत्सव साजरा होऊ शकेल . बाप्पाला सुद्धा आनंद होईल . व तो सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा देईल.

                         आपल्या सर्वाना गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...