Friday, August 23, 2019

DAHIHANDI

                                        गोविंदा आला रे ......
नटखट कृष्ण..

भारतात अनेक जातीचे , धर्माचे लोक राहतात . प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या , राहणीमान वेगळे , संस्कृती वेगळी . भारतीय माणूस हा उत्सवप्रिय व संस्कृतीप्रिय असतो.  गणपती , नवरात्र , होळी , दिवाळी , ईद , ख्रिसमस  यांसारखे अनेक सण आपण साजरे करतो . पण त्यातील एक सण सगळ्यांचा आवडता , जुलै -ऑगस्ट महिना आला कि आपल्याला ज्याची आठवण येते तो म्हणजे दहीहंडी . दहीकाला म्हणजेच श्रीकृष्णजन्माष्टमी .

पहिल्या दिवशी गोकुळाष्ठमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो . मथुरेत पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा केला जातो. बाळकृष्ण म्हणजे एक निरागस हास्य . ज्याच्याकडे बघितल्यावर सगळं दुःख विसरायला होत . त्याचा नटखटपणा , गालावरची लाली , खट्याळपणा हे सर्वच मन प्रसन्न करत . असा हा सर्व गोपिकांचा आवडता कृष्ण . त्याचा हा उत्सव .

मुंबई दहीहंडी

दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो . थरावर थर रचून उंच मनोरे रचले जातात . आणि दहीहंडी फोडली जाते . दही चोरून खाणारा म्हणजेच माखनचोर असा कृष्ण आपल्या सवंगड्यांच्या साथीने उंचावर ठेवलेलं मडक्यातलं दही खायचा . अशी आख्यायिका म्हटली जाते . पण आता त्याचे रूपांतर उंच उंच मनोऱ्यात झाले आहे.

अपघात

पण हल्लीच्या काळात उत्सवातील खरा आनंद हरवत चालला आहे. त्याला आक्रमकतेचं ,आणि स्पर्धेचं स्वरूप आलेला आहे. एक जीवघेणी स्पर्धा होत आहे. कोण उंच उंच थर लावून हंड्या फोडतात आणि पैसा कमावतात याकडे सर्वांचं लक्ष असते. बिचारया लहान लहान कोवळ्या वयातल्या मुलांना ७व्य ते ८व्या थरावर चढवतात आणि चुकून दुर्दैवाने अपघात झाला तर बिचारया लहान मुलांचा बळी जातो. तर हे कुठेतरी थांबयला हवं . त्यासाठी समाजात जन जागृती करण्याची गरज आहे .

स्पेन गोविंदा पथक

आज मुंबई , ठाणे ,कल्याण डोंबिवली यांसारख्या प्रमुख शहरात दहिहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी होते . मोठमोठ्या हंड्या , सेलेब्रिटीस , नाच गाणी .एकदम जल्लोषाचे वातावरण असते . काही ठिकाणी डीजे चा वापर मोठ्या प्रमाणावर होते त्याला काहीसा अटकाव झाला पाहिजे . मुंबईत काही ठिकाणी परदेशावरून सुद्धा लोक दहीहंडीसाठी येतात. तेसुद्धा हा सण उत्साहात साजरा करतात .

कोणताही सण असला तरी त्यातला आनंद घेता आला पाहिजे . कोणतीही स्पर्धा न करता , पैशांचे अमिश न दाखवता आनंद लुटता आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे अतिसाहस दाखवून आपला जीव धोक्यात घालू नये .

आपल्या सर्वाना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!!   




No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...