Wednesday, August 14, 2019

INDEPENDENCE DAY

                                    बलसागर भारत होवो.... !!!


आज आपल्या भारताचा ७३ वा  स्वातंत्र्यदिन . सगळीकडे सकाळी ध्वजारोहणाचे , कवायतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. देशभक्तिपर गीतांची मैफिल , शूर जवानांच्या कथा हे सर्व ऐकून आपल्यातपण एक देशभक्ती जागी होते . आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष झाली पण खरंच आपला देश सुजलाम सुफलाम झाला आहे का ..खऱ्या अर्थाने आपला देश स्वातंत्र्य झाला आहे कि नाही.... ?

भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे . प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे . तसे हक्क अधिकार आपल्याला लोकशाहीने दिले आहेत. पण त्याचा आपण खरच योग्य उपयोग करतोय का ?आपल्या देशात कोणी काही चांगल करत असेल तर त्याला खाली खेचलं जात .त्याच्या प्रगतीस अडथळा आणतात.

आज आपण अनेक गावात बघायला गेलो तर अनेक ठिकाणी अनिष्ट परंपरा , रूढी ,चालीरीती चालू आहेत . स्त्रियांवर अत्याचार होत आहेत . त्यांचे शोषण होत आहेत म्हणजेच स्वातंत्र्यात असूनही ते पारतंत्र्यात असल्यासारखे जगत आहे .     अनेक ठिकाणी लहान मुलांना मजूर बनवून त्यांचे अमानुष पणे शोषण केले जात आहे . हाच का आपला सुजलाम भारत ..

तसेच  भारतात अनेक धर्म ,जाती, समाज एकत्र राहतात . मुळात तीच आपल्या भारताची ख्याती आहे. एक वेगळे वैशिष्ठ आहे ज्याने आपण अख्या जगात ओळखलो जातो .  आणि भारतात आपण सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहतो . पण उगाच कोणताही एक समाज दहशत निर्माण करण्याचा दृष्टीने दुसऱ्या दोन समाजात गैरसमज निर्माण करतो ज्यामुळे कधीकधी देशात तणावाचे वातावरण निर्माण होते . जे कि देशाच्या लोकशाहीस घातक ठरू शकते. तसेच आपल्याइथे शिक्षण , कामधंदा ,नोकरी येथे पहिले एखाद्याची जात पहिली जाते . मग त्याला ४०% असले तरी चालतील .आपल्याकडे काही ठिकाणी गुणवत्तेपेक्षा जातीला महत्व दिले जाते . त्यामुळे खुल्या प्रवर्गातील मेहनती माणूस आपला देश सोडून उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो ज्याचा उपयोग तिकडच्या देशाच्या विकासासाठी होतो . असे झाले तर आपला देश कसा विकसित होणार ? किती दिवस आपण विकसनशील राहणार ... हे चित्र कुठेतरी बदलले पाहिजे . आपल्या भारतातील तरुण खूप हुशार आहेत फक्त त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले कि ते खूप पुढे जातील  व देशाचे नाव मोठे करतील यात काही शंकाच नाही . 

त्यानंतर आपल्या देशाला लागली सर्वात मोठी कीड ती म्हणजे भ्रष्टाचार . जी कि खूप घातक आहे . ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन उध्वस्त झालीत . प्रामाणिक ,खरा माणूस उगाच अडकला जातो आणि लपंगा , खोटा माणूस सहीसलामत बाहेर फिरतो . अनेक उदाहरण देता येतील आपल्या देशातील ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार झाला आहे. 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक गावागावात शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो व त्यावर उदरनिर्वाह केला जातो. पण आजही काही भागात शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीयत त्यामुळे आत्महत्येच प्रमाण वाढत आहे . त्याकडेही   लक्ष  दिले पाहिजे सरकारने ,त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे .

आज आपला देश जवळपास क्षेत्रात प्रगती केली आहे. खेळ , कला , संस्कृती, तंत्रज्ञान , शेती , तेलवायु उद्योग , माहिती प्रसारण .ही प्रगती  अशीच वाढत जाऊन भारत एक दिवस विकसित देश होईल नक्कीच .. तरुण पिढी ही भारताचे आधारस्थंभ आहेत . त्यानी आजवर बसून न राहता , खूप मेहनत करून  देशाचं नाव मोठं केला पाहिजे . 

जेव्हा या देशात कोणतीही जात उरणार नाही , भ्रष्टाचार होणार नाही , सर्वाना सामान कायदा होईल , कोणावर अन्याय होणार नाही , प्रत्येकाला मोकळेपणा मिळेल तेव्हा आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल ..

    आपल्याला ७३ व्या स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!    

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...