मैत्रीवर बोलू काही.... !!
HFSD |
ऑगस्ट महिना जवळ आला कि सर्व तरुणाईला , मुलामुलींना वेध लागतात ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारचे .... कारण पहिला रविवार म्हणजे मैत्री दिन (FRIENDSHIP DAY).
मित्रानो.... मैत्री म्हणजे काय ... मैत्री म्हणजे एक न संपणार वर्तुळ . ज्याला कोणतीही सीमा नाही, मर्यादा नाही ती म्हणजे मैत्री. मैत्री हि कोणाशीही होते ,आपल्या नकळत आपण एखाद्याचे मित्र होऊन जातो आपल्यालाच कळत नाही . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणाशीही आपली मैत्री होऊ शकते . मैत्री साठी फक्त माणूसच पाहिजे असं काही नाही . तर एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाशी , मांजरीशी , सस्याशी सुद्धा आपली मैत्री होऊ शकते . निसर्ग हा तर सर्वात मोठा नि जवळचा मित्र आहे आपला . कधीकधी ट्रेन किंवा बस मध्ये एखाद जण मित्र किंवा मैत्रीण होऊन जात.
पण आजच्या जगात मैत्रीची परिभाषा बदलली आहे. मैत्रीची नवी व्याख्या तयार होत आहे . निर्मल, सुंदर अशी मैत्री संशयाच्या विळख्यात अडकली आहे ,तिच्या नावाला काळिमा फसला जात आहे. जो तो माणूस कामपूर्ती मैत्री ठेवू लागला आहे . स्वार्थी बानू लागला आहे . आपला काम झालं कि तू कोण ?काय नाव तुझं ? असं .. आज लोकांचे फेसबुक वर हजारो मित्र आहेत पण खऱ्या आयुष्यात एक मदत करेल तर शपथ .. जे संकटाच्या वेळी आपल्या मदतीला येऊ नाही शकत त्या वर्तच्युअल मित्रांचा काय उपयोग ..त्यामुळे असे मित्र जोडा जे कधी तुम्हला सोडून जाणार नाहीत आणि तुम्ही त्यांना कधी दगा देणार नाही .
नातं कोणतंही असो पण त्यात मैत्री नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही . त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये आधी मैत्री निर्माण करा न मग नातं . आपल्या आई वडिलांशी सुद्धा मैत्रीपूर्ण सम्बन्ध तयार करा ज्याने तुमच्यातला संवाद पारदर्शक होईल ज्याने तुमच्या समस्या सुटतील . मैत्रीमुळे तुमच्या नात्यात मोकळेपणा येतो ज्याने तुम्हला आनंद मिळतो व मनाला प्रसन्न वाटते .
FRIENDSHIP DAY |
No comments:
Post a Comment