तो पावसाळा ...... !!
साधारणतः आपल्याकडे ३ मुख्य ऋतू आहेत .त्यापैकी एक पावसाळा ... पण हल्ली मुख्य तीन ऋतू राहिलेच नाही कारण कधीही गरम होत , कधीपण पाऊस पडतो, कधीही थंडी वाजते . पण त्यातल्या त्यात पावसाळ्याची मज्जा काही वेगळी असते. आपल्याकडे लोकांना पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आणि नाही पडला तरी प्रॉब्लेम ... बिचारा पाऊस तरी काय करेल . खूप वर्षांपूर्वी निसर्गाचं चक्र एकदम सुरळीत चालू होत . ४ महिने पाऊस , ४ महिने थन्डी , आणि ४ महिने उन्हाळा असं चित्र असायचं . पण हल्ली काही वर्षांपासून निसर्गाचं चक्रच बदललं आहे . जसे मी वरती म्हणालो कि कधीही पाऊस पडतो .
हरिच्चंद्र गड |
माणसाने तंत्रज्ञान ,शिक्षण , आरोग्य सर्व क्षेत्रात प्रगती केली पण हे करत असताना त्याने निसर्गाकडे दुर्लक्ष केलं . त्याचाच परिणाम आज आपल्याला भोगावा लागत आहे . हा पावसाळा कधी आपल्याला सुखाचे क्षण देतो , तर कधी आपल्याला भयानक रूप दाखवतो . त्यामुळे पावसाळा हा कोणाच्या आवडीचा तर कोणाच्या नावडीचा विषय असतो .
पावसाळा म्हटलं कि आठवतात ते काळे काळे ढग , विजांचा कडकडाट , मातीचा सुगंध सगळीकडे प्रसन्न वातावरण , आणि त्यात गरमागरम भजी किंवा उकडलेली कणसे आणि चहा हे असेल तर म काही बघायलाच नको .अगदी दुग्धशरकारयुक्त योगच . तसेच लोकांची पाऊले वळतात ती म्हणजे धबधबे , किल्ले , नद्या यांच्याकडे . वातावरणच इतके भारी असतें ना कि पाहतच राहावेसे वाटते . काही किल्य्यांवरून इतके विलोभनीय दृश्य पाहावयास मिळते ना कि आपली नजरच हटत नाही. हरिश्चंद्र गड , राजमाची , रतनगड ,हरिहर यांसारखे किल्ले पावसाळ्यात फिरण्याची मज्जा काही औरच तसेच लोणावळा , खण्डाळा , कर्जत ,भीवपुरी , नेरळ माथेरान ही स्थळे पर्यटकांना आवर्जून साद घालतात . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्या , आंबोली घाट , कोकणातील अन्य घाट यांचे दृश्य लोकांच्या मनात घर करून बसतात . पावसाळ्यातील हि दृश्य एकदा पाहिली ना कि डोळ्यात साठून राहतात कि ती दीर्घकाळ विसरता येत नाहीत .
मुंबई लोकल |
No comments:
Post a Comment