Thursday, July 11, 2019

AASHADHI EKADASHI

                            "पाऊले चालती पंढरीची वाट ......... "

                                   VITTHAL

शीर्षक वाचूनच आपल्या लक्षात आल असेलच कि आपण कशाविषयी बोलतोय ते ...हो मित्रानो आपण बोलणार आहोत पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी म्हणजेच आषाढी एकादशी निम्मित .. जुलै महिना आला कि सगळ्याना वेध लागतात ते म्हणजे वारीचे .. जवळपास एक महिना आधी या वारिला सुरवात होते. अनेक टप्पे पार करत करत ती वारी पंढरपूर ला पोहचते. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे , आणि त्याला खूप मोठी परंपरा आहे . आणि या वरील महाराष्ट्रात विशेष महत्व आहे.. 
लहान मुले वारीत गुंग 


रिंगण 
 या वारीमध्ये वारकरी संप्रदायाचे लोक तर असतातच शिवाय अन्य जातीधर्माचे लोक पण असतात . इकडे कोणी छोटा मोठा  , श्रीमंत गरीब नसतो तर सर्व सामान असतात . सर्व जण आनंदाने एकमेकांत मिसळून विठ्ठलाच्या भक्तीत गुंग होतात . 

हि वारी सर्वाना एकात्मतेचा संदेश देते, बंधुभाव देते, माणसाने आयुष्य  कस जगावं आणि का जगावं हे शिकवते .आपण आयुष्यात कधी घेतले नसतील असे अनुभव आपल्याला वारी देते . आणि तेच आपल्याला खूप काही शिकवून जातात . सर्वांच्या तोंडात फक्त हरिनामाचा  गजर असतो.  आपला दुःख , काळजी , निराशा , ताण सगळं  विसरुन लोक या वारीत सहभागी होतात आणि एक वेगळाच आनंद मिळवतात . प्रत्येकजण एकमेकांना "माउली" या नावानेच सम्बोधतो मी तो कोणीही असो . देव हा प्रत्येकात आहे , आणि आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे हेच वरी आपल्याला शिकवते.

पालखी सोहळा 
  

या वारीची सुरवात देहू गावापासून होते. त्यानंतर अङ्गडशाह बाबा , चिंचोली पादुका  दर्शन करत करत निगडी ला जेवणासाठी विश्रांती घेतात. त्यानंतर आकुर्डी विठ्ठल मंदिरला रात्रीची विश्रांती घेतात . त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंपरी विठ्ठल मंदिर , दापोडी ला जेवण ,नंतर शिवाजीनगर ला तुकाराम महाराज पादुका दर्शन , नाणेपेठ ,हडपसर लोणी काळभोर विठ्ठल मंदिर , कुंजीरवानी फाटा , भैरवनाथ मंदिर ,केडगाव मंदिर  , वरवंड विठ्ठल मंदिर ,उंडवाडी पठार ,बऱ्हाणपूर , मोरेवाडी  ,बारामती ,बेलवाडी  करत करत पुढे संसार मारुती मंदिर , निमगाव ,तरंगवाडी ,इंदापूर ,सराटी ,अकलूज ,माळीनगर ,बोरगांव ,पिराची कुरोली , शेगाव  असं करत करत शेवटी आषाढी एकादशी ला पंढरपुरात  पोहचते . विठ्ठलाच्या भक्तीत विसरून जाऊन लोक वेळ  कसा गेला हे विसरून जातात आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होतात.

या वारीमध्ये आपल्याला वेगवेगळे साहसी खेळ पाहावयास मिळतात  विविध वेषभूशा पाहावयास मिळतात . रिंगण हा त्यातलाच एक आकर्षक खेळ  पाहावयास लोकांची गर्दी जमते . टाळ मृदूंगाच्या गजरात  "ग्यानबा तुकाराम" असा गजर करीत करीत लोक वारीचा आनंद घेतात. 

अश्या या वारीचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी आपण या वारीत सहभागी झाले पाहिजे व विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाले पाहिजे .
                            "विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ... ..... "

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...