Friday, July 5, 2019

SOCIAL MEDIA.....

                                SOCIAL MEDIA.....

SOCIAL MEDIA DEFINE

             

TYPES OF

SOCIAL MEDIA हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. एक वेळेस माणसाला कपडे , अन्न , घर मिळाले नाही तरी चालेल पण SOCIAL MEDIA हवच. फेसबुक , व्हाट्सअँप , इंस्टाग्राम ,स्नॅपचॅट यांसारखे अनेक माध्यम आहेत या SOCIAL MEDIA ची . दररोज १०-१० मिनीटांनी मोबाईल चेक नाही केला तर माणसाला कसतरीच होत . त्यामुळे सारखा गरज नसली तरी त्याला मोबाईल चेक करावाच लागतो . या SOCIAL MEDIA चे फायदे पण आहेत तसेच तोटे पण आहे . आपण काही उदाहरण बघूया त्यामध्ये आपल्याला समजेल कि SOCIAL MEDIA काय आणि कसा उपयोग आहे कि दुरुपयोग .... 


एका महाविद्यालयात एक राज नावाचा मुलगा असतो . त्याचा मित्रांचा एक चांगला ग्रुप असतो . त्याच्या मित्रांच्या फोटो ला इंस्टाग्राम ,फेसबुक वर भरपूर लाईक्स ,कंमेंट्स येत असतात .राजला सुद्धा वाटायचे कि आपल्याला  पण असेच लाईक्स मिळावेत .पण ते शक्य होत नव्हतं  .त्यामुळे तो नेहमीच निराश असायचा . आपल खूप कमी  आहोत ,आपण कोणाला नाही आवडत अश्या स्थितीत तो असायचा .त्याच्या  मनात नेहमी भलत्याच कल्पना येत असत कि काहीतरी भन्नाट  करून दाखवावं . म्हणून तो सरळ जातो ते समुद्रकिनाऱ्यावर आणि अतिशय  साहसी ठिकाणी जाऊन तो सेल्फी काढायचा प्रयत्न करतो आणि तो तोल जाऊन पडतो . उगाचच त्या SOCIAL MEDIA मुळे त्या निरागस राज चा मृत्यू झाला . 

तसेच एकदा कॉलेज मध्ये मुख्य परीक्षेचा पेपर असतो . कॉलेज जवळच्या  रद्दीवाल्याकडे कुठूनतरी प्रश्नपत्रिका येते आणि तो ब्लॅक मध्ये विकायचं ठरवतो  . एक मुलगा भरपूर पैसे देऊन विकत घेतो तो पेपर  . आणि नंतर व्हाट्सप्प वर टाकतो ., ज्याने कि पेपर फुटतो . तर असा हा  SOCIAL MEDIA चा दुरुपयोग . 

तसेच एक म्हातारा माणूस साधारण ६५ वर्षाचा असेल . तो एका २० वर्षाच्या मुलीला फेसबुक वर REQUEST  पाठवतो . त्याने स्वतःचा DP सुद्धा एखाद्या तरुण हॅंडसॉम मुलासारखा असतो . जो बघून ती मुलगी भुलून  जाते. व रोज त्याच्याशी बोलायला लागते . हळूहळू त्यांची मैत्री खूप वाढत जाऊन त्याच रूपांतर प्रेमात होत . तो निर्लज्ज माणूस त्या  मुलीला एका अज्ञात स्थळी बोलवतो आणि ती मुलगीही यायला तयार  होते . आणि भेटल्यावर त्याला बघून त्या मुलीला शॉकच  बसतो ,ती खूपच घाबरीघुबरी होते, काय करावे तिला काहीच काळात नाही . तो माणूस तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो बघा .SOCIAL MEDIA मुळे एक VIRTUAL MINDSET तयार झाला आहे . ज्याने माणूस एका वेगळ्याच विश्वात जातो ,त्याला समजत नाही कि आपण काय करतो ,कोणाशी बोलतोय  काय खर आणि काय खोट ... 

तर काहीवेळला आपण असे पहिले आहे कि एखादा मुलगा हरवला कि SOCIAL MEDIA द्वारे आपण त्या मुलाला शोधले आहे . किंवा एखाद्या  गरजू , गरीब माणसाला एखादा आजार झाला असेल तर त्याला  मदत म्हणून सुद्धा SOCIAL MEDIA चा वापर होऊ शकतो . आज आपण SOCIAL MEDIA मुळे एकत्र आलो आहोत . अक्ख जग त्याने जवळ आणले आहे . पण माणसे दुरावली आहेत . काही शुल्लक  चुकांमुळे माणसे एकमेकांच्या जीवावर उठली आहेत . तर हे सगळं  खूप चुकीचं आहे . 

SOCIAL MEDIA  चा आपण चांगल्या ,उपयुक्त कामांसाठी वापर केला पाहिजे . उगाचच आपली दहशत निर्माण करण्यासाठी किंवा दुसर्यांना आकर्षित करण्यासाठीच हे माध्यम नाहीय . त्याचा योग्य तोच उपयोग झाला  पाहिजे..  

फेसबुक वर हजारो मित्र बनवण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात ,संकटावेळी तुम्हाला किती मित्र मदतीला धावून येतात ते जास्त महत्वाचे  आहे . स्नॅपचॅट वर स्वतःचे फोटो काढून दुसर्यांना पाठ्वण्यापेक्षा जरा स्वतःच  आत्मपरीक्षण केलं तर जास्त बर होईल. इंस्टाग्राम वर दुसऱयांना फोल्लो करण्यापेक्षा जरा स्वतःमधील कलागुणांना , क्षमतेला फोलो करा आणि ते वाढवा  त्याने नक्कीच तुम्ह्लाच फायदा  होईल . .. 

                       

                                                     धन्यवाद........ !! 

                                                                        

      


No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...