Tuesday, June 25, 2019

todays technology- curse or gift

                   TODAYS TECHNOLOGY.....

                                      शाप कि वरदान .... ?

आजच्या २१ व्य शतकात तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली. संपूर्ण जग जवळ आणले. वेळेची बचत केली . काही सेकंदामध्ये आपण संपूर्ण जगात कुठेही पोहचू शकलो . या तंत्रज्ञानाचे चे जाळे संपूर्ण जगात , प्रत्येक देशात , शहरा-शहरात , तसेच प्रत्येक गावा गावात पसरले आहे. औद्योगिक क्षेत्र , पर्यटन क्षेत्र , आरोग्य विभाग , शिक्षण , राजकारण , सरकारी विभाग , मनोरंजन , क्रीडा  इ. सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतोय . पण हे तंत्रज्ञान खरच एक वरदान आहे कि एक शाप ............... ???    

आज मोबाइल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांकडे मोबाइल असतो. लहान मुले E-learning  च्या नावाखाली मोबाइलचा गैरवापर करतात. सतत मोबाइल गेम खेळून , चित्रपट पाहून स्वतःच्या डोळ्यांची वाट लावून घेतात. आता मोबाइलचा  चा वापर कसा व किती करायचा याचे भान आपल्याला असले पाहिजे. त्यामुळे मोबाइल हे व्यवस्थित , पुरेसा वापरला तर ते वरदान ठरू शकतो  नाहीतर तो पण एक शाप ठरू शकतो. 

आपल्या स्वयंपाक घरात अनेक अशा नवीन गोष्टी आहेत ज्याचा उपयोग करून माणसे सुस्तावली आहेत . जसे कि रोटी मेकर , भाज्या कापण्याच्या मशीन , वेगवेगळे कटर , साहित्य एकत्र मिक्स करायचे साधन , अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत . ज्यामुळे आपला वेळ वाचतो आहे पण आपल्या हाताची जी चव असते त्याच काय . शारीरिक कष्ट  कमी पडल्यामुळे बायका आजारी पडू लागल्या आहेत जेवण बनवताना हाताचे , मनगटाचे व्यायाम होत असत पहिले पण आता ते कमी  झाल्यासारखे वाटत आहेत व हाडांच्या दुखणीच्या समस्या वाढत आहेत.  तसेच घरात वॉशिंग मशीन , टाईल्स क्लिनर ब्रश  यांसारख्या नवनवीन उपकरणांमुळे शरीराची हालचाल होत नाहीय साहजिकच त्यामुळे लठ्ठपणा , मधुमेह यांसारखे आजार बळावत चालले आहेत . 

तसेच सध्याच्या युगात आणि भविष्यात Machine learning and Artificial intelligence  हे नवीन क्षेत्र उदयास येत आहेत . ज्यामध्ये आपणच मशीनला शिकवतो कि कोणत्या समस्या आल्यावर काय करायचे किंवा ते कसे सोडवायचे . म्हणजे एकप्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता  आपण निर्माण करायच्या मार्गावर आहोत . ज्याने आजची पिढी आहे त्यापेक्षा  अधिक जलद होईल , वेळ वाचेल . पण हे सर्व होत असताना  माणसाची शारीरिक ताकद आणि परिश्रम कमी होतील , माणूस सुस्त  होईल , अंगी मरगळ येईल , त्याला कोणतेच काम करावेसे  वाटणार नाही , परावलंबी बनेल तो . मग असे झाले तर माणसाची भौतिक  प्रगती होईल पण शारीरिक व मानसिक प्रगतीच काय याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे . 

तंत्रज्ञान तर आजच्या युगात गरजेचे आहेत पण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुद्धा गरजेचे आहे . तंत्रज्ञानाचा वापर माणसाने योग्य तेवढा ,गरजेपुरताच करावा , त्याचे व्यसन लागेल इतका वापर करू नये तरच आपली प्रगती  होईल . म्हणूनच हे तंत्रज्ञान एका मर्यादेपर्यंत वरदान आहे पण त्यापलीकडे गेले तर तो मोठा शाप सुद्धा ठरू शकतो .... 

                                            धन्यवाद ...!!                    

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...