Thursday, June 20, 2019

INTERNATIONAL YOGA DAY

                              "रोज करा योग दूर करा सर्व रोग "

योग दिवस 
                                              

आज २१ जून , आंतरराष्ट्रीय योग दिवस. २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मा. नरेंद्र मोदींनी  योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता व १९३ देशांपैकी १७५ देशांनी याला पाठींबा दिला . २१जुन २०१५ हा पहिला आंतरराष्टीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात आला.                                   

सूर्यनमस्कार 

आजचे आपले जीवन इतके धकाधकीचे , धावपळीचे झाले आहेत कि आपल्याला आपल्यासाठी वेळच देता येत नाहीय. जो तो माणूस आपल्या सुखसोयींनसाठी झटतोय . पैशांच्या मागे पळतोय. भौतिक सुखांच्या मागे तो वेडा  झालाय. त्याच स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नाही . मानसिकदृष्ट्या  तो अस्वस्थ आहे.  शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो अजिबात स्थिर नाही . त्याला एवढही समजत कि आपल्याला आराम करायला हवा थोडा , व्यायाम केला पाहिजे , योगासन केली पाहिजे पण त्याला हे कळतंय पण वळत नाहीय आणि इथंच तो चुकतोय आणि आपल्या तब्येतीची अवहेलना करतोय . 

योगासने म्हणजे आपल्या पूर्वजांनी ,ऋषीमुनींनी दिलेले सर्वात मोठे वरदान आहे . आपल्या भारतात याचे उगमस्थान आहे.  या योगामधली  ताकद पाहून पाश्चिमात्य देशांनीसुद्धा योगाचा अभ्यास करायला सुरवात केली आहे. त्यांनी योगाचे महत्व जाणले आहे . त्यांनी योगाभ्यास करून त्याचा फायदा अनुभवला आहे.  व संपूर्ण जगाला योगाची साथ धरण्याचे आवाहन केले आहे. आज जगभरात योगाच्या मोठमोठ्या शाखा सुरु झाल्या आहेत . अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण याचा फायदा घेतात . लहान मुले कमी वयातच येथे गेल्यामुळे त्यांचे शरीर लवचिक बनत चालले आहे . व अनेक रोगांपासून त्यांना मुक्ती मिळत आहे.  तसेच वृद्ध मंडळींनासुद्धा योगाचा खूप फायदा होताना दिसत आहे . काहींना आपले जीवनच बदलल्यासारखे वाटले . इतकी ताकद ह्या योगाने सर्वाना दिली आहे .

                                   

योगाचे आपल्याला असंख्य फायदे दिसून येत आहेत. योगाच्या खूप पद्धती , आसने आहेत. फक्त आपण ती योग्य पद्धतीने केली पाहिजेत तरच त्याचा उपयोग आहे . प्रत्येक आसनाचा  काहीनाकाही फायदा आहे.  आणि आपल्याकडे शरीराच्या प्रत्येक व्याधींवर योग उपलब्ध  आहेत . त्या सर्वांची माहिती करून घेणे आपले काम आहे .इंटरनेट वर सर्व आसनांची प्रात्यक्षिके दिली आहेत ,ते पाहून सुद्धा आपण योग करू शकतो. योगासनांमुळे आपले रक्ताभिसरण सुधारते . हृदयाची धडधड व्यवस्थित होते. 

 शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा नीट होतो , मुख्यतः मेंदूला रक्ताचा पुरवठा झाल्याने आपण ताजेतवाने  राहतो . शरीर लवचिक बनते . नवीन काम करण्यास आपल्यला ताकद मिळते . झोप चांगली लागते. व्यायामामुळे भूक चांगली लागून सकस आहार , दूध , फळे आपल्या पोटात जाऊन भरपूर पोषक तत्व शरीरास मिळतात . म्हणजेच एकंदर शारीरिक स्वास्था बरोबरच मानसिक स्वास्थ्यही आपल्याला मिळते . 

म्हणून जर आपण सुरवात केली नसेल तर आजपासून या योगाभ्यासाला सुरवात करा . योगा हि सुखी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे . आणि आज आपल्या सर्वाना याची नितांत गरज आहे. कारण कोणीतरी म्हटलेच आहे ..... कि आरोग्य हीच संपत्ती .. 

                                     

                                               धन्यवाद ...   













No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...