Saturday, June 15, 2019

will never forget this..

                                       आणि ती बॅग मिळाली ...... 

आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात कि जे आपण विसरू शकत नाहीत . काही क्षण दुःखाचे असतात , काही सुखाचे , काही हास्यास्पद , काही खुपच मजेदार , काही नजरेसमोरून न हटणारे, भीतीचे  असे असतात. त्यातीलच एक प्रसंग जो कि मी कधी विसरू शकत नाही .याला कोणत्या प्रकारचं नाव द्यावं मला अजून कळत नाही पण तो प्रसंग माझ्या नजरेसमोरून जात नाही . 

मी दहावीत असतानाची गोष्ट , बोर्डाच्या परीक्षेला काही दिवस शिल्लक होते . मी एका लग्नाला जात होतो . माझ्यासोबत आई-पप्पा होते. डोंबिवलीहून साधारणतः दुपारी १२च्या आसपासची ट्रेन मी पकडली असावी . आम्हला उतरायचे होते दादर स्टेशनला . दुपारची वेळ असल्यामुळे फार काही गर्दी नव्हती . मी माझी बॅग वरच्या रॅक मध्ये ठेवली नेहमीप्रमाणे . आणि मी निवांत बसून होतो . थोडीफार लोक चढत हाती न उतरत होती .  दादर स्टेशन आले . आम्ही तिघे उतरलो आणि चालायला लागलो . आम्ही चालतोय चालतोय ....... नंतर दादर स्टेशनच्या वरती पुलावर पोह्चल्यावर आई मला विचारतेय जरा पाणी दे  रे कारण पाण्याची बाटली मी माझ्या बॅगेत ठेवलेली . मी पाठीवर हात लावतोय तर अरेच्च!!बॅग कुठे गेली . मला वाटलं पप्पांकडे असेल तर त्यांच्याकडे पण नाही . खूपच घाबरलो मी . बॅग ची एवढी काळजी नव्हती मला  पण त्या बॅगेत  माझं १०वीच्या परीक्षेचं हॉलतिकिट , परीक्षेच्या काही नोट्स , काही महत्वाची कागदपत्र , पाण्याची बाटली ,रेशनकार्ड असं सगळं मौल्यवान वस्तू होत्या . काहीही करून ती बॅग मिळवणं गरजेचं होत . 
आमची एकच धावपळ सुरु झाली , लगेच मी आणि पप्पा स्टेशन वर गेलो आणि  CST ला जाणारी जलद लोकल पकडली ती पण नशिबाने तेव्हाच मिळाली . ज्या ट्रेन मदे बॅग ठेवली होती ती धीमी ट्रेन होती . त्यामुळे जलद  लोकल पकडल्यामुळे ती ट्रेन आम्हला पुढच्या स्टेशन ला दिसली पण उतरणार कस ... ट्रेन सुटली तर . म्हणून आम्ही निर्णय घेतला कि आपण सरळ CSTलाच उतरू .  खूप घाबरलेल्या अवस्थेत होतो मी . धडधड वाढत होती. मनात देवाचं नाव घेत होतो. 
शेवटी  CST स्टेशन ला दोन्ही गाड्या जलद आणि धीमी एकत्र स्टेशन वर लागल्या , मी कधी एकदा उतरतोय आणि त्या  ट्रेन मध्ये जाऊन बॅग घेतोय असं झालेलं . मी लगेच त्या ट्रेन मधून उतरलो आणि समोरच्या  बाजूला उभ्या असलेल्या धीम्या लोकलमध्ये धाव घेतली . सगळे  प्रवासी उतरलेले . थोडाफार अंदाज असल्यामुळे  डब्बा लक्षात होता ट्रेनचा . लगेच त्या डब्यात शिरलो आणि वरती बघितले तर माझी बॅग  तिथे ठेवली होती . मी लगेच तिथे गेलो आणि माझी बॅग हातात घेतली आणि माझ्या जीवात जीव आला . मी लगेच सगळ्या गोष्टी चेक केल्या ,सगळ्या व्यवस्थित होत्या . त्या गोष्टीने मला खूपकाही शिकवल सुद्धा , कठीण काळातसुद्धा संयमाने ,आणि शांत डोकं ठेवून काम करायच ते . 

अशाप्रकारे हा ट्रेन मध्ये घडलेला हा प्रसंग माझ्या नजरेसमोरून कधीही जाणार नाही . देवाच्या कृपेने आणि नशिबाने माझी बॅग मला परत मिळवून दिली ......                                                 धन्यवाद ....   

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...