Wednesday, June 5, 2019

environmental day



 पर्यावरण दिन..... 

                                              

आज ५ जून , म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन . एक दिवस आपल्या वसुंधरेसाठी असच म्हणाव लागेल. खरतर एखादा दिवस साजरा करून काही फरक पडणार नाही तर वर्षातले प्रत्येक दिवस आपण छोटी का होईना मदत आपल्या वसुंधरेसाठी केली पाहिजे. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक  करू शकतो ज्याने आपल्या पृथ्वीवरील प्रदूषण कमी होईल आणि आपली पृथ्वी ताजीतवानी राहील . 

आजच्या जगात आपण बघितल तर ग्लोबल वॉर्मिंग मुले प्रदूषण खूप वाढले आहे. जिकडे पाहावं तिकडे इमारती उभ्या राहत आहेत . मोकळी मैदाने कमी होत चालली आहेत. मुलांना खेळायला जागा नाही. जागा रिकामी दिसली रे दिसली कि बिल्डर लोक लगेच इमारती बांधायला घेतात . या सगळ्यामुळे झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली . बेसुमार वृक्षतोड होयला लागली. झाडे कमी झाली साहजिकच हवेतला प्राणवायू कमी झाला . त्याचा परिणाम पावसावर झाला ,तो अनियमितपणे पडू लागला . आपण सर्व माणसे उगाच पावसाला नाव ठेवतो पण खरतर चूक सगळी आपलीच आहे. 

                                                      

तसेच आपण आजकाल बघितले तर खासगी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणात देखील वाढ होत आहे .अतिशय घातक ,विषारी वायू हवेत मिसळून लोकांच्या आरोग्यवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त ,शक्य होईल तसे सरकारी वाहनच वापर करावा . तसेच खासगी CNGगॅस च्या गाड्या वापराव्यात .त्यामुळे बऱ्यापैकी प्रदूषण आटोक्यात येईल . 

तसेच आपल्याकडे सणांच्या वेळी , विविध कार्यक्रमांच्या वेळी थर्मोकॉल , प्लास्टिक यांचा भरपूर वापर करतो . त्यापासून विविध शोभेच्या वस्तू बनवतो . आणि त्याची गरज संपली  की टाकून देतो. त्यामुळे अशा वस्तूंचे विघटन होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ते तसेच पडून राहतात . त्यामुळेच मातीचे व अन्य प्रदूषण होते. पावसाळ्यात याच प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी साचून राहते व पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो . २६जुलै मुंबईचा महापूर हा त्यातीलच एक भाग आहे. आपण  घरी सुद्धा प्लास्टिक किंवा थर्मोकॉल पेक्षा  कागदी ,किंवा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या पाहिजेत. किंवा प्लास्टिक वगरे वापरले तर त्याचा पुनरुपयोग करा लगेच टाकून देऊ नका . 

त्यामुळे एकंदर आपण बघितल तर आपणच निसर्गाच्या जीवावर उठलो आहोत . आपला स्वार्थ साधता साधता माणूस निसर्गाचाच बळी देत आहेत . आणि निसर्गही आपल्याला  त्सुनामी , पूर , वादळ ,भुकंप याद्व्यारे धोक्याची सूचना देत असतो , आपण माणसांनी वेळीच सुधारले पहिजे नाहीतर हा निसर्ग एकदाच सगळ्यांना जमीनदोस्त करेल ना कोणालाच  कळणार नाही. 

                                                                    

त्यामुळे आजच निश्चय करा आपल्या भविष्यासाठी ,या वसुंधरेला वाचविण्यासाठी प्रयत्न करा . प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसादिवशी एक झाड लावा आणि ते जगवा . एक झाड देखील तुमच्या भविष्यातील  प्राणवायूची उत्तम सोय करू शकते. 

                                         

                    धन्यवाद  ....   

  

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...