Thursday, May 23, 2019

WATER IS LIFE

SAVE WATER

                                               WATER IS LIFE.........

आजकाल आपण बघितल तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे . उष्णतेने उच्चांक गाठला आहे . जसजशी गरमी वाढत आहे तशी पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत हि आटत चालले आहेत. नद्या, तळी , ओढे , यांसारखे पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे भविष्यातील पाण्यासंबंधी चिंता लागून राहिली आहे .

जलदुर्भीक्ष

आपण जरी महाराष्ट्राचा विचार केला तरी बऱ्यचश्या दुर्गम , गावाकडील भागात पाण्यासाठी वणवण करवी लागत आहे. एकेका थेंबासाठी लोक कित्येक किलोमीटर पायपीट करत येत आहेत. काही गावात आठ आठ दिवस , तर काही गावात तर महिनोन्महिने पाणी येत नाही . आंघोळ, शौचाच तर सोडाच पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, कित्येक ठिकाणी तर गुरढोर पाण्याविना मरत आहेत. हि स्थिती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही हा तर संपूर्ण देशभरात आहे . अनेक लोकांचे पाण्याविना जीव जात आहेत . जरी आपण किनारपट्टीचा विचार केला तरीसुद्धा काही गावे अशी आहेत जिकडे पाण्याची टंचाई आहे. जरी बाजूला समुद्र असला तरी तेच पाणी आपण सर्व गोष्टींना नाही वापरू शकत ना . त्यामुळे येथील लोकांना सुद्धा पाण्यासाठी पायपीट करावी लागते .

शहरी भागाचा विचार केला तरी जशी काही वर्षांपूर्वी परिस्थिती होती तशी आज राहिलेली नाही. या भागात सुद्धा हल्ली आठवड्यातून काही दिवसच पाणी येत . त्यामुळे लोकांनासुद्धा पाणी जपूनच वापरावे लागते. काहीवेळेला तर अशी परिस्थिती येते कि जे भांड मिळेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवावे लागते. मग त्यात छोटे छोटे पेले , वाट्या ,टोप , बरण्या  इ . काही ठिकाणी तर पाणी विकत घ्यावे लागत आहे . कितीतरी रुपये / लिटर अशा भावाने पाणी विकले जात आहे. खरतर पाणी विकत घ्यायला लागतंय हि खूप गंभीर बाब आहे . पण भविष्यात पाणी वाचवले नाही तर हीच गोष्ट करावी लागणार आहे .

पाण्याचा अपव्यय

पाणी वाचवण्यासाठी आज आपल्याकडे बऱ्याच पद्धती उपलब्ध आहेत . सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतच असते पण आपणसुद्धा आपल्याला जमेल तसे पाणी वाचवायला हवे . अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कमीत कमी पाण्याचा वापर होईल असे ते वापरले पाहिजे . सकाळी शॉवर खाली अंघोळ न करता योग्य त्या बादलीत पाणी घेऊन अंघोळ करणे पसंद केले पाहिजे . कपडे ,भांडी यामध्ये जास्त पाणी वाया घालवू नये , जेवताना सुद्धा आपल्याला हवं असेल तेवढंच पाणी घ्यावे आणि जर उरलच तर ते झाडांना घालावं ज्यानेकरून ते वाया जाणार नाही . वाहन वगरे धुताना ,साफ करताना कमीतकमी पाणी वापरले पाहिजे .पावसाचे पाणी साठवून आपण ते अन्य कामांना वापरू शकतो जसे कि कपडे, भांडी . तसेच काही सण असतात जसे कि होळी , दहीहंडी ,या सणांना भरपूर पाण्याचा अपव्यय केला जातो त्यावेळी आपण जरा जपून पाणी वापरलं पाहिजे . कमीतकमी पाणी वापरले जाईल याची काळजी घ्यावी.

खरतर पाणी हा जीवनाचा अमूल्य भाग आहे . जगण्यासाठी ते नितांत आवश्यक आहे . पाण्याचे आपल्याला बरेच उपयोग माहिती आहेतच . शरीरासाठी पाणी खूप फायदेशीर आहे. पाण्यामुळे बरेचसे आजार नष्ट होतात . त्वचेच्या समस्या दूर राहतात . उन्हाळ्याच्या दिवसात ४-५ लिटर  पाणी आपण रोज प्यायले पाहिजे . उद्योगधंदे , कारखाने यांसाठी सुद्धा पाणी खूप महत्वाचे आहे . त्याचा योग्य वापर करणे आपली जबाबदारी आहे.

RAIN WATER HARVESTING

 आपण काही लोक शहराकडे राहतो ,त्यामुळे आपल्याला तसा पाण्याचा त्रास होत नाही . आपण इकडे खूप मज्जा मारत असतो. हवे तसे पाणी वापरत असतो पण कधी दुष्काळी भागाचा विचार केलाय का , जरा एकदा त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा विचार करा . नेट वर त्याच्या हकीकत ऐका , तुम्हालाच समजेल तूम्ही किती पाणी वाया घालवता . तुम्हाला नसेल काळजी पाण्याची ,पण ते बिचारे लोक एक एका थेंबासाठी जीव पणाला लावतात.

 एक आपल्या आजोबांचा काळ होता त्यांनी पाणी समुद्रात पाहिले , आपल्या आई वडिलांनी नदी विहिरीत पाहिले , आपण ते बाटली मध्ये पाहतोय , पण कधीकधी असं वाटतंय कि नातवंड तेच पाणी कॅप्सूल मध्ये पाहतील , अंघोळीची सुद्धा गोळी येईल बाजारात . या शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणून पाणी अडवा , पाणी जिरवा .

पाणी वाचवा
WATER

                                     

                                     धन्यवाद ....

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...