इंजिनीअरिंग/मेडिकल /प्लेन सायन्स
बऱ्याच जणांची १२वी ची परीक्षा देऊन झालेली आहे, तसेच सर्वांची प्रवेश परीक्षा देऊन सुद्धा झाल्या आहेत ,आता सर्व वाट पाहत आहेत ते निकालाची . काहींनी आपले करिअर अगोदरच ठरवून ठेवलेसुद्धा आहे तर काही अजून ठरवत आहेत ,काही जण अजून निकालावर अवलंबून आहेत . मित्रानो निकाल काहीही लागला तरी आपल्याला काय करायचं ते आपण ठरवलं पाहिजे आणि तेसुद्धा आताच कारण आता खूप कमी वेळ राहिलेला आहे त्यात आपल्याला सर्व नीट विचार करून ठरवायचं आहे .
आपण जर बघितल तर हे वरील तिन्ही पर्याय तसे खर्चिक आहेत , त्यातल्या त्यात प्लेन सायन्स थोडे कमी खर्चिक आहे. सर्वात जास्त पैसे अर्थातच वैद्यकीय शाखेला द्यावा लागतो, त्यानंतर अभियांत्रिकीला . बऱ्याच लोकांच्या आर्थिक समस्या , कौटुंबिक समस्या असतात त्यामुळे पैशांची चणचण भासते . त्यामुळे मुले सहसा प्लेन सायन्स घेण्याकडे वळतात.
आपण अभियांत्रिकी क्षेत्राकडे बघितला तर ,आज देशभरात असंख्य महाविद्यालये , संस्था आहेत . पण विद्यार्थ्यांचा कल काहीसा कमी झालेला दिसत आहे. ज्यांना या क्षेत्राकडे जायचे आहे ते एक तर चांगल्या महाविद्यालयांची प्रतीक्षा करतात नाही मिळाले तर सरळ दुसरा मार्ग निवडतात . तसेच हल्ली महाविद्यालयांची फी सुद्धा लाखाच्या घरात गेली आहे . तसेच शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे. काही नामांकित संस्था सोडल्या तर इतर संस्थांची दुर्दशा आहे . सध्या तर परिस्थिती उलट आहे. आता जागा भरपूर उरत आहेत पण शिकायला मुलंच नाहीत. जबरदस्तीने मुले खेचून आणावी लागत आहेत महाविद्यलयात . तसेच अभियांत्रिकीच्या परीक्षेत होणारे घोळ, शिक्षकांच्या समस्या , निकाल वेळेवर न लागणे , त्यात होणारे घोळ,अश्या सर्व कारणामुळे अभियांत्रिकी क्षेत्राकडे जाण्याचा काळ कमी होत असताना दिसत आहे.
वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिलं तर त्यातही काही वेगळ नाही . तसेच या क्षेत्रात प्रत्येक कोर्सची फी हि सामान्य माणसाला न परवडण्यासारखी असते . तसेच या क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे , एकेका मार्कांसाठी प्रवेश नाकारला जात आहे . तसेच हे क्षेत्र थोडे तणावाचे पण असते . त्यामुळे मनाने कमजोर असून या क्षेत्रात चालत नाही. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण आहे. तसेच चांगल्या ठिकाणी प्रवेश न मिळाल्यास पदरी निराशा पडते ती वेगळीच .
वरील दोन्ही क्षेत्राकडे न जात काही मूल फार्मसी किंवा वास्तुशास्र (architecture) या पर्यायांकडे वळतात . इथेसुद्धा स्पर्धा आहेच पण त्यातल्या त्यात फी आणि इतर गोष्टी बघता सोपे आहे तसे.
वरील कोणताच पर्याय मान्य नसेल तर प्लेन सायन्स देखील उत्तम पर्याय होऊ शकतो . B.Sc करून मग M.Sc चा पर्याय आपल्याकडे असतो . त्यानंतर वाटलंच तर ph.d सुद्धा करू शकतो . प्लेन सायन्स साठी सुध्या आपलकडे बरेच पर्याय आणि महाविद्यालये उपलब्ध आहेत. नेट वरून योग्य माहिती घेऊन आपण तिकडे प्रवेश घेऊ शकतो .
वरील कोणतेही क्षेत्र निवडले तरी मेहनत , कष्ट ही प्रत्येकालाच करायची आहे . कारण कोणत्याही क्षेत्रात स्थिर होणं ही हल्लीच्या काळात थोडी कठीण होत चाललेली गोष्ट आहे . त्यामुळे तुमची आवड जपा आणि योग्य तोच निर्णय घ्या . अपयशाने खचून जाऊ नका . नेहमी सकारात्मक विचारांनी प्रयत्न करा आणि पुढे जा...
आपणास हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
No comments:
Post a Comment