महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष .... !!!
जय महाराष्ट्र |
१ मे , महाराष्ट्र दिन , ज्यासाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी कठोर लढा दिला व मराठी माणसाला , मराठी अस्मितेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी एक मराठी भाषिक राज्य स्थापन करून दिले .
सौराष्ट्र |
फार पूर्वीपासून हा लढा सुरु होता , देशामध्ये भाषावार प्रांतरचना करायची हा ठराव मंजूर झाला असला तरी काहींना मुंबई महाराष्ट्राला मिळवू द्यायची नाही असे वाटत होते . त्यातून एके काळी मुंबई हि केंद्रशासित घोषित झाली आणि त्यानंतर मराठी माणूस पेटून उठला , जागोजागी निदर्शने करू लागला ,खूप मोठा संघर्ष झाला , आणि शेवटी आपल्या १०६ हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आणि सौराष्ट्रातून गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन वेगळी राज्ये निर्माण होऊन १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली . या गोष्टीचा राग आजही अनेक लोकांच्या मनात अजूनही आहे आणि त्यासाठीही लढा चालू आहे.
मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे खरंय ....... पण आज त्या मुंबईत किती महाराष्ट्र दिसतोय आपल्याला ?? ज्या मुंबईत पूर्वी ९०% च्या वर मराठी माणूस होता , त्याच मुंबईत आज मराठी माणूस हरवत चाललेला दिसत आहे , सर्व धंदे गुजराती आणि मारवाड्याच्या हातात , युपी बिहार वरून आलेले लोक इथेच ठाण मांडून बसलेत , कारखाने सिंधी आणि पंजाब्यांच्या हातात ..आणि आपला मराठी माणूस करतोय नोकऱ्या त्यांच्याकडे .... नाही नाही ,मला कोणत्या समाजावर , जातीवर राग नाही , तर राग आहे आपल्याच विकल्या गेलेल्या मराठी माणसाचा , त्याच्या विचारांचा . ज्याप्रमाणे एक गुजराती दुसऱ्या गुजरात्याला वर जाण्यासाठी मदत करतो , एक मारवाडी दुसऱ्या नातेवाईकांना आपला दुकान मांडण्यासाठी मदत करतो , हि गोष्ट आपल्या मराठी माणसात दिसत नाही , आपण बसतो एकमेकांचे पाय ओढत , आणि साहजिकच याचा फायदा दुसऱ्याला होतोय आणि हेच होतय आपल्या मुंबईत ...
जर आपणच आपल्या लोकांना मदत केली , त्यांना वरती आणण्यास पाठबळ दिले तर नाही का होणार , मुळात उद्योगधंद्यात उतरणे म्हणजे खूप मोठं पाप करणे ही चुकीची समजूत सर्वसाधारण मराठी घरात आहे , आणि त्यामुळेच स्वप्न सुरू होण्याआधीच संपतात . खूप शिक आणि नोकरी कर एवढंच शिकवलं जात . हे असच चालू राहील तर कस परवडेल मुंबईत घर घायला किंवा राहायला . कोणीच आपल्या पाल्याना सांगत किंवा विचारात नाही कि बाबा रे तुझ्याकडे काही नवीन आयडिया आहे का , त्यातून कोणता व्यवसाय होऊ शकतो का? आपणच आपला रोजगार निर्माण करू शकतो का ? हे कधीच बोलला जात नाही . उलट यापेक्षा आज कुठे मुलाखत दिली , कुठे नोकरी लागली , पगार झाला का? हे जास्त बोललं जात ..असो हा वेगळाच विषय आहे आपण याला नंतर हात घालू .पण सांगायचं उद्देश कि या कारणांमुळे मराठी माणूस मागे राहतोय .
आणि सर्वात महत्वाचं कारण ते म्णजे भाषा , आपणच आपली भाषा वापरातून कमी करतोय , सरळसरळ आपण हिंदी आणि इंग्लिश मधून बोलायला लागतो. मी मागे सुद्धा एका लेखात याविषयी बोललो आहे . आपल्याच राज्यात ,प्रांतात आपणच का परकीय भाषेत बोलायचे . काय गरज दुसऱ्या भाषेची , इंग्लिश काळाची गरज आहे मान्य ,पण त्यासाठी मराठीची गळचेपी का करताय . तसेच बाहेर फिरताना , ट्रेन ,बस मधून जाताना सुद्धा मराठी बोलला जात नाही तर हिंदी मधुन बोलल जात , क्या भाई ,किदर जायेगी ये बस यापेक्षा काय ओ भाऊ , कुठे जाईल ही बस असा विचारायला काय फरक पडतो . जरा दक्षिणेकडील राज्य बघा , त्यांच्या भाषेसाठी , संस्कृती साठी ते लोक कसे एकत्र येतात , सर्व व्यवहार त्यांच्याच भाषेत करतात , जरी कोणी परप्रांतीय तिकडे आली तरी त्याला तिकडची स्थानिक भाषा शिकावीच लागते त्याशिवाय तो आपले काम करू शकत नाही . अशी सक्ती आहे का आपल्या मुंबई मध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये . की इकडे जर राहायचे असेल, कामधंदा करायचा असेल तर मराठी भाषा येणं अनिवार्य आहे . काय करणार आपणतरी , आपलेच मराठी नेते आणि राजकीय मंडळीच कमकुवत आहेत , भ्रष्ट आहेत , त्यांना यासगळ्याची काहीच पडलेली नाहीय .
तर मित्रानो , अजूनही वेळ गेलेली नाही , आपली मराठी भाषा , संस्कृती ,आपल्या राज्याची अस्मिता टिकवणे आपल्या हातात आहे . त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून आपण तिचे जतन करूया.
हुतात्मा चौक , मुंबई |
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली !!!!
- जोसेफ डेव्हिड पेजारकर
- सिताराम बनाजी पवार
- चिमणलाल डी. शेठ
- भास्कर नारायण कामतेकर
- रामचंद्र सेवाराम
- शंकर खोटे
- धर्माजी गंगाराम नागवेकर
- रामचंद्र लक्ष्मण जाधव
- के. जे. झेवियर
- पी. एस. जॉन
- शरद जी. वाणी
- वेदीसिंग
- रामचंद्र भाटीया
- गंगाराम गुणाजी
- गजानन ऊर्फ बंडू गोखले
- निवृत्ती विठोबा मोरे
- आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
- बालप्पा मुतण्णा कामाठी
- धोंडू लक्ष्मण पारडूले
- भाऊ सखाराम कदम
- यशवंत बाबाजी भगत
- गोविंद बाबूराव जोगल
- पांडूरंग धोंडू धाडवे
- गोपाळ चिमाजी कोरडे
- पांडूरंग बाबाजी जाधव
- बाबू हरी दाते
- अनुप माहावीर
- विनायक पांचाळ
- सिताराम गणपत म्हादे
- सुभाष भिवा बोरकर
- गणपत रामा तानकर
- सिताराम गयादीन
- गोरखनाथ रावजी जगताप
- महमद अली
- तुळशीराम पुंजाजी बेलसरे
- देवाजी सखाराम पाटील
- शामलाल जेठानंद
- सदाशिव महादेव भोसले
- भिकाजी पांडूरंग रंगाटे
- वासुदेव सुर्याजी मांजरेकर
- भिकाजी बाबू बांबरकर
- सखाराम श्रीपत ढमाले
- नरेंद्र नारायण प्रधान
- शंकर गोपाल कुष्टे
- दत्ताराम कृष्णा सावंत
- बबन बापू भरगुडे
- विष्णू सखाराम बने
- सिताराम धोंडू राडये
- तुकाराम धोंडू शिंदे
- विठ्ठल गंगाराम मोरे
- रामा लखन विंदा
- एडवीन आमब्रोझ साळवी
- बाबा महादू सावंत
- वसंत द्वारकानाथ कन्याळकर
- विठ्ठल दौलत साळुंखे
- रामनाथ पांडूरंग अमृते
- परशुराम अंबाजी देसाई
- घनश्याम बाबू कोलार
- धोंडू रामकृष्ण सुतार
- मुनीमजी बलदेव पांडे
- मारुती विठोबा म्हस्के
- भाऊ कोंडीबा भास्कर
- धोंडो राघो पुजारी
- ह्रुदयसिंग दारजेसिंग
- पांडू माहादू अवरीरकर
- शंकर विठोबा राणे
- विजयकुमार सदाशिव भडेकर
- कृष्णाजी गणू शिंदे
- रामचंद्र विठ्ठल चौगुले
- धोंडू भागू जाधव
- रघुनाथ सखाराम बीनगुडे
- काशीनाथ गोविंद चिंदरकर
- करपैया किरमल देवेंद्र
- चुलाराम मुंबराज
- बालमोहन
- अनंता
- गंगाराम विष्णू गुरव
- रत्नु गोंदिवरे
- सय्यद कासम
- भिकाजी दाजी
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
- मुनशी वझीऱअली
- दौलतराम मथुरादास
- विठ्ठल नारायण चव्हाण
- देवजी शिवन राठोड
- रावजीभाई डोसाभाई पटेल
- होरमसजी करसेटजी
- गिरधर हेमचंद लोहार
- सत्तू खंडू वाईकर
- गणपत श्रीधर जोशी
- माधव राजाराम तुरे(बेलदार)
- मारुती बेन्नाळकर
- मधूकर बापू बांदेकर
- लक्ष्मण गोविंद गावडे
- महादेव बारीगडी
- कमलाबाई मोहित
- सीताराम दुलाजी घाडीगावकर
No comments:
Post a Comment