Monday, April 22, 2019

youth and mobile games

                   मोबाइल गॅम्सच्या विळख्यात अडकलेली पिढी  Image result for aadicted mobile youth in india              Image result for aadicted mobile youth in india 

मित्रांनो , साधारणतः ८-१० वर्षांपूर्वी आपल्याला आजूबाजूला मुलांच्या खेळण्याचा आवाज ऐकू येत होता ,Image result for outdoor games before 10 years in village इमारतीखाली , घराशेजारी लहान मुलांपासून ते तरुण मुलांपर्यंतच्या मुलामुलींची वर्दळ असायची . परीक्षा संपली ,शेवटचा पेपर झाला कि लगेच दप्तर टाकून बॅट बॉल घेऊन चला क्रिकेट खेळायला . नुसतंच क्रिकेट नाही हो ,Image result for outdoor games before 10 years in village त्यासोबतच लपाछुपी , लगोरी , डबा एक्सप्रेस , पकडापकडी यांसारखे खेळ खेळायला खूपच मज्जा यायची . लपाछपी खेळताना ते कुठेतरी कोपऱ्यात किंवा कोणाच्या घरात लपून बसणं , एकमेकांचे शर्ट बदलून दुसऱ्यावर राज्य देणं , रात्रीच्या काळोखात शोधणं  खूपच वेगळं वातावरण होत ते .  Image result for gully cricketतसेच क्रिकेट खेळताना  कोणाच्यातरी खिडकीची काच फोडण, काकूंच्या शिव्या खाण , दिवसभर  उन्हात काळ होईपर्यंत खेळणं हे सगळं चित्र आता हरवत चालल आहॆ . कालांतराने ते दिसेनासच होईल कि काय याची भीती वाटत आहे . या सर्वांचं प्रमुख कारण म्हणजे मोबाइल आणि त्यातले ते गेम्स .

४-५ वर्षांपूर्वी POCKEMON GO हा एक Image result for pockmion goमे मोबाइलला वर आला होता . अतिशय खरा वाटणारा , वास्तववादी असा हा गेम . अहो पण या गेम ने किती लहान तसेच तरुण मुलांचे जीव घेतले . मुले हा गेम खेळताना कशाचंही भान न बाळगता खेळात होती . खरंतर ह्या गेम मध्ये शिकण्यासारखं , डोकं लावण्यासारखं काहीच नाही . पण उगाच त्याची क्रेझ मुलांमध्ये पसरली.  त्या नंतरच्या काळात एक भयानक गेम सर्वांसमोर आला तो म्हणजे BLUE WHALE .Image result for blue whale game   अतिशय विक्षिप्त , विचित्र , जीवघेणा असा हा गेम . ज्यामध्ये आपल्याला वेग वेगळे जीवघेणे काम करायला सांगतात आणि जर नाही केलं तर जीवे मारण्याची धमकी देतात . मी शेवटी तरुण मुले किंवा लहान मुले या सर्वाला कंटाळून आत्महत्या करतात . या गेम मुळे सुद्धा भारतात नाही तर जगभरात अनेक मुलांचे मृत्यू झाले आहेत . काही काळाने या गेम वर बंदी करण्यात आली.

आणि आता काही महिन्यांपूर्वी एक नवाकोरा  गेम आपल्या भेटीला आला तो म्हणजे PUBG .Image result for pubg या गेम ने तर सर्वानाच वेड लावला . लहानमुलांपासून, लग्न झालेल्या तरूणांपर्यंत  तसेच मुलीसुद्धा हा गेम खेळण्यात चांगल्याच रमल्या . थोडासा तिने वेळ मोकळा मिळाला , लेक्चर नसलं कि चला रे कंपन कोण येतंय खेळायला , मग ते ग्रुप बनवा , कोणी किती मारले, आणि मग नंतर ते WINNER WINNER CHICKEN DINNER  चे स्टेटस सगळीकडे टाकत सुटायचे . आणि त्यात पण काहीजण इतका आत्मविश्वास आणि अभिमान दाखवतात कि जस कि त्यांनी खरोखरच एखाद्या शत्रूला मारल. मग कधीकधी वाटत यांनी तर सैन्यात दाखल व्हायला पाहिजे . एकदा हा गेम सुरु केला कि फोन खाली ठेवायला नाही मागत कोणी . १-२ तास सलग खेळतच राहतात .

मित्रानो या मार्केट मध्ये असे असंख्य गेम आहेत , काही आपल्याला माहिती नाहीत हेच बरे आहे. कारण एकदा त्याच व्यसन लागलं कि सुटता सुटत नाही मित्रांनो . आयुष्यात थोडा विरंगुळा असावा पण त्याच व्यसन लागेल इतका अतिरेक करू नये . जे लोक हे गेम बनवतात ते हा गेम कधीच जास्त खेळत नाही किंवा त्यांच्या कुटुंबातलेसुद्धा यात आपला वेळ  वाया घालवत नाही .  आपल्या भारतातच हे गेम खेळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे . आजचे तरुण ,लहान मुले आपला अर्ध्याहून जास्त वेळ यामध्ये वाया घालवतात व आपला नुकसान करून घेतायेत .

हे गेम , इंटरनेट , हे सर्व क्षणिक आनंदासाठी असते. हा सर्व तांत्रिक आनंद आहे ,त्यात निरागसता , प्रेम,आपुलकी या गोष्टींची कमतरता आहे . त्यामुळे मित्रांनो या गेम पासून जरा लांबच राहा . मी म्हणत नाही कि बंदच  करा पण त्याचा अतिरेक करू नका . तुम्हला विरंगुळ्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या . घरात बसून गेमी खेळण्यापेक्षा एक तास मैदानात जाऊन खेळा तुम्ह्लाच तुमच्यात झालेला बदल जाणवेल . एक तास जरी आपण खेळलो ना तरी तुमच्या शरीराला पुरेसा व्यायाम मिळतो . मन प्रसन्न राहते , नवीन काम करण्याची ताकद आपल्याला मिळते .

                                

आज अनेक लहान मुलांमध्ये लठ्ठपणा , शुगर , डोळ्यांचे आजार यांसारखे भयावह आजार पाहावयास मिळतात . याच कारण एकच आहे ते म्हणजे मोबाइल , गेम, इंटरनेट . मुलांची शारीरिक हालचाल कमी झाली , एकाच ठिकाणी बसून त्यांना मानेचे , डोक्याचे , डोळ्यांचे आजार व्हायला लागले. पालकाही आपला मुलगा आपल्या नजरेसमोर राहावा यासाठी बिनधास्त मोबाइल मुलांच्या हातात देतात  आणि मुलांचं नुकसान करतात . त्या पालकांना सुद्धा माझी विनंती असेल कि आपल्या मुलासोबत खेळत जा ,१५-२० मिनिटे का होईना त्याला फिरायला घेऊन जा , बघा तुमचे पाल्य नक्कीच आनंदित ,निरागस राहील .

या गेम आणि इंटरनेट च्या विळख्यातून सुटणं आपल्याच हातात आहे . आपण आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत . आपण जर पाळल्या तर इतर जण ,लहान मुले पाळतील अन्यथा या नवीन पिढीचे भविष्य धोक्यात असेल हे मात्र नक्की .... Image result for health and sports quotes

                                      

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...