Friday, April 12, 2019

ARTS AND COMMERCE OPPORTUNITIES

                             वाणिज्य आणि कला शाखेतील संधी

मागील लेखात आपण विज्ञान शाखेतील संधी याविषयी जाणून घेतले , या भागात आपण बघूया की वाणिज्य आणि कला शाखेत भविष्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत . विज्ञान शाखेत जायचे नसेल तर शक्यतो मुले हि या दोन पर्यायांकडे वळतात . एकदम जास्त पण अभ्यास नको आणि एकदम कमीपणा नको या मानसिकतेने मुले वाणिज्य शाखेकडे वळतात . म्हणजे काही मुलांना विज्ञान घेतल तर  अभ्यासाची भीती आणि कला विषय घेतलं कि लोक काय म्हणतील विचार मनात येतो . म्हणून यांच्यातला मध्यस्ती मार्ग म्हणजे वाणिज्य शाखा .Image result for commerce

जाणून घेउया वाणिज्य शाखेत कोणत्या संधी उपलब्ध आहेत . वाणिज्य शाखा म्हटलं कि समोर येत ते गणित , मोठमोठे समीकरणे , विविध क्लुप्त्या , अकाऊंट , बँक , पैसे , व्यवसाय , साधारणतः आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी उभ्या राहतात . हो मित्रानो बरोबर या शाखेत आपल्याला साधारणतः याच गोष्टींशी खेळावं लागत . ज्यांचं गणित उत्तम असेल ,मोठमोठ्या अंकांची बेरीज वजाबाकी करण्यास आवडत असेल त्यांनी वाणिज्य शाखेत जायला काही हरकत नाही , त्यांच्यासाठी या शाखेत बरेच पर्याय उपलब्ध आहेत . १० वी नंतर आपण ११-१२ वी साठी  वाणिज्य शाखेला प्रवेश घेऊ शकतो . साधारणतः अर्थशास्र, बुक किपींग , एस पी , यांसारखे विषय आपल्याला शिकायला मिळतात . १२ वी नंतर मुलांना अजून विविध पर्याय उपलब्ध होतात  जसे कि BMS , BAF, BBA  तर काही मुले BCOM करतात . हे कोर्स करता करता आपण  सी ए  च्या अभ्यासक्रमाची तयारी करू शकतो . पण वाणिज्य म्हणजे फक्त सी ए दुसर काही नाही असं काही नसत .  सी ए  शिवाय बरेच कोर्सेस आपण करू शकतो . बऱ्याच कोर्सेस ची आपल्याला माहिती नसते , किंवा ते आपल्यापर्यंत पोहचत नाही . तर आपण त्याची माहिती इंटरनेट वरून मिळवणे गरजेचे आहे . काही विद्यार्थी १२ व नंतर गणित विषय घेऊन त्यात बी ए शुद्ध करतात . वाणिज्य शाखेत तुम्हला वाणिज्य  शाखेचे पर्याय उपलब्ध होतातच शिवाय तुम्ही कला शाखेत सुद्धा उत्तम  करियर करू शकता .

एम बी ए  हा एक नवीन मुलांना आवडणारा अभ्यासक्रम . ज्याची चर्चा , ओढ , उत्सुकता फक्त वाणिज्य शाखेच्या मुलांकडेच नाही तर विज्ञान शाखेतील मुलांकडे सुद्धा खूप आहे . आज अनेक विद्यार्थी इंजिनीरिंग किंवा विज्ञानातील एक डिग्री घेऊन पुढे एम बी ए करायच्या विचारात असतात . त्यासाठी आपल्या CAT हि परीक्षा द्यावी लागते . ही परीक्षा संपूर्ण देशपातळीवर घेतली जाते . त्यामध्ये बेसिक गणित , बुद्धिमता , यांवर जास्त प्रश्न विचारले जातात . या परीक्षेची काठिण्यपातळी खूप जास्त असते . त्यामुळे या परीक्षेत सफल होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते .  या परीक्षेत उत्तम PERCENTILE  आणला कि आपल्याला आय आय एम( INDIAN INSTITUTE OF MANAGEMENT) मधून पुढील प्रवेशासाठी फोन येतो . किंवा आपण सध्या महाविद्यालयातून देखील हा कोर्स करू शकतो .

तर आता आपण जाउया कला शाखेकडे .Image result for ARTS QUOTES ज्यांना १० वीला खूप कमी गुण मिळतात त्यांनी कला शाखेकडे जावं असा साधारणतः आपल्याकडे गैरसमज होता काही दिवसांपूर्वी पण आता तो पुसला गेला आहे . आता ज्याला खरच कलेत काम करायच आहे तो कला शाखा निवडतो . समजा एखाद्याला चित्रकला आवडत असेल तर त्याने विज्ञान किंवा वाणिज्य घेऊन काही उपयोग आहे का , का म्हणून तो त्याचा वेळ आणि पैसे वाया घालावेल.  कला शाखा निवडणं , अभ्यास करणं पण सोपं काम नाही बर का मित्रांनो. Image result for ARTSतुमचं नावीन्य , कौशल्य त्यात दिसल पाहिजे .तसेच परीक्षेमध्ये तुम्ही किती लिहिताय यापेक्षा काय लिहिताय याला जास्त महत्व असते . कला शाखेत तुम्हला तुमचं अस्तित्व निर्माण करायच असत . तुमचं वाचन , निरीक्षणशक्ती  उत्तम असली पाहिजे ,भाषेवर विशष प्रभुत्व असले पाहिजे . तुमच्यात खरच एखादी कला असेल आणि तुम्ही त्यासाठी वेडे असाल तर तुम्ही कला शाखेत जायला हरकत नाही . तुम्ही कलेमध्ये कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकता जसे कि नृत्य , गाणं , चित्रकला , वाद्यवादन , अभिनय , छायाचित्रण , फोटोग्राफी , शिल्पकला , असे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत . गरज आहे फक्त तुमच्यातल्या कलागुणांची . Image result for ARTS QUOTES

शिक्षक हा  समाजातला अत्यंत महत्वाचा घटक मनाला जातो . हल्ली मुलांना शिक्षक मिळणे अवघड झाले आहे .  किंवा मुलांचा शिक्षक होण्याकडे कल देखील कमी झाला आहे . तर मित्रानो कला शाखेत आपण बी ए ची डिग्री घेऊन पुढे बी. एड  ची डिग्री घेऊन शिक्षक बनू शकतो. एक शिक्षक हजारो मुलांचे भविष्य घडवतो त्यामुळे या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही . तुम्ही इतर शाखेतील विषयात डिग्री मिळवून देखील शिक्षक बनू शकता. फक्त तुमची आवड जोपासा .Image result for arts careers    

त्यामुळे मित्रानो आता सुट्टीचे दिवस चालू आहेत . वेळीच आपल्यातील कलागुण ओळखा . त्या दिशेने वाटचाल सुरु करा . सध्या स्पर्धा खूप वाढली आहे . प्रत्येकाने स्वतःला UPDATE ठेवावं . सतत शिकण्याची जिद्द असुद्या. वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा पण स्वतःच्या क्षमता ओळखूनच......

Image result for arts QUOTESImage result for COMMERCE QUOTESImage result for COMMERCE QUOTES

                           पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!!!! 

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...