गुढीपाडवा आणि डोंबिवली....
सर्वप्रथम तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त आहेत ना आपले मराठी 12 महिने : १) चैत्र नेसतो सतरा साड्या. २) वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या. ३) जेष्ठ बसतो पेरित शेती. ४) आषाढ धरतो वरती छत्री. ५) श्रावण लोळे गवतावरती. ६) भाद्रपद गातो गणेश महती. ७) आश्विन कापतो आडवे भात. ८) कार्तिक बसतो दिवाळी खात. ९) मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे.१०) पौषाच्या अंगात उबदार कपडे.११) माघ करतो झाडी गोळा.१२) फाल्गुन फिरतो जत्रा सोळा. वर्षा चे महिने असतात बारा, प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा.
गुढीपाडवा म्हणजे हिंदू -मराठी नाव वर्षाचा पहिला दिवस . या नववर्षाची सुरवात चैत्र महिन्यानी होते. हा वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी अनेक जणांच्या घरात दारासमोर गुढ्या उभारल्या जातात . त्यांना सजवले जाते . प्रत्येक घरात गोढधोडाचा बेत असतो . श्रीखंड पुरी , आमरस . बासुंदी, खीर यांची मेजवानीच असते . काही घरात कडुनिंबाचे वाटप केले जाते . प्रत्येक घर हे आंब्याच्या पानांच्या तोरणाने, झेंडूच्या फुलांनी सजले जाते . काही लोक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घर , वाहन, किंवा एखादी वस्तू खरेदी करतात . सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते .
|
गणपती मंदिर , डोंबिवली |
हे झालं घरच ... आता बघूया घराबाहेर गुढी पाडवा कसा साजरा होतो . नव वर्षाचे स्वागत लोक कसे करतात . आजच्या दिवशी मुंबई, ठाणे, नाशिक ,पुणे , आणि खासकरून डोंबिवली या ठिकाणी जल्लोषाचे वातावरण असते . सगळीकडे ढोल ताशा पथक , लेझीम , कवायती , तसेच साहसी खेळ, मल्लखांब यांची प्रात्यक्षिके असतात .त्यात महिलांचा एक पारंपरिक लुक व बाईक रॅली बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमते . काही ठिकाणी टीव्ही मालिका , चित्रपटाचे कलाकार हजेरी लावून लोकांचा आनंद द्विगुणित करतात .
|
बाईक रॅली |
|
भव्य रांगोळी |
डोंबिवलीत म्हणायचे झाले तर इकडे काही वेगळेच वातावरण असते . गुढीपाडवा आणि दिवाळी पाहत या दोन्ही दिवशी इकडे तरुणाईची तुडुंब गर्दी पाहावयास मिळते . डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड या सर्वाना प्रिय व प्रसिद्ध आहे. या फडके रोड वर विविध कार्यक्रमाची मज्जाच असते .
|
ढोलपथक |
कुठे संगीत , कुठे लोकनृत्य , कुठे पोवाडे , अतिशय सुंदर वातावरण असते . सर्वप्रथम लोक फडके रोड वरील गणपती मंदिरात येतात तिकडच्या गणपतीचे दर्शन घेतात आणि पुढच्या वाटेस निघतात . हे गणपती मंदिर डोंबिवलीची एक शान आहे . अनेक विविध शैक्षणिक संस्था , अनेक संघ सकाळी शोभायात्रेत सहभागी होतात व समाजाला एक संदेश देऊन जातात . अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व लोक या शोभायात्रेत सहभागी होतात . या फडके रोड वर मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात . डोंबिवलीच्या ढोलपथकात तर काही वेगळाच उत्साह असतो . सकाळी ७ वाजल्या पासून ह्या उत्सवाला सुरवात होते ते दुपारपर्यंत संपते .
तुम्हला व तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . हे नवीन वर्ष तुम्हला सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!!
https://www.explorepro.in/?m=1
No comments:
Post a Comment