Saturday, May 23, 2020

ARTS

                                      

                                      Being Artistic!!!

कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य घटक आहे. या जगात अनेक कला आहेत. आपल्याकडे एकूण ६४ प्रकारच्या कला आहेत असा मानल जात. मग ती चित्रकला असो , नृत्य , संगीत , अभिनय, शिल्पकला असो किंवा अजून काही . आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कलेचा आस्वाद घेत असतो. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतही आपण कला पाहतो. प्रत्येक मानवाच्या अंगी एकतरी कला अवगत असणे आवश्यक आहे. 

अनेक कलांमधील एक कला म्हणजे  चित्रकला . या कलेला अगदी पहिल्या शतकापासूनचा वारसा आहे . त्यामुळे हि कला अभिजात मानली जाते. एखादी पेन्सिल किंवा ब्रश हातात घायचा आणि आपल्या मनाला जे दिसेल ,रुचेल ते पंढरीकोर्या कागदावर रेखाटायचे . त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.  आता तो आनंद प्रत्येकाच्या आवडीनिवडी वर अवलंबून आहे. 

आता या चित्रकलेमध्ये सुद्धा अनेक प्रकार येतात . तसेच अनेक विविध कला यात जोडल्या जातात त्यामुळे त्या कलाकृतीची शोभा आणखीन वाढते. प्रत्येक कलाकाराला नेहमीच आपल्या प्रेक्षकांना नवीन द्यायला आवडते ,त्यामुळे प्रत्येक कलेतून आपल्याला नवीन काही देता येईल याचा तो विचार करत असतो. काही कलाकृती तर अक्षरशः काळजाला भिडणाऱ्या असतात. तर काही कलाकृती तर जगण काय असत ते शिकवतात . 

अश्याच काही कलाकृती आपण खाली पाहू शकतो . घरातल्या अतिशय साध्या साध्या गोष्टींचा उपयोग करून सुद्धा खूप चांगली कलाकृती तयार करता येते.

bag                                  boat

a letter   
flowers

                           
                                                                                               
creation                             plane

design flower             star


   
तसेच अशी काही चित्र असतात ती आपल्याला खरी वाटतात . अक्षरश: त्यांना हातात घ्यावेसे वाटते . त्यातूनच ती खाण्याविषयक किंवा पदार्थ असतील तर मी बघायलाच नको. ते चित्र पाहूनच तोंडाला पाणी सूटत. अशीच काही चित्रे आपण खाली पाहू 





                             fruit

                                                                                          foody                                  glass

                                   

number                    softdrink

                              sweet home         

                                 Thank you!!



   
                                









x

Monday, December 2, 2019

खरच भारत देश सुरक्षित आहे का ??

                   खरच भारत देश सुरक्षित आहे का ??

आपला भारत देश आज अनेक गोष्टीत प्रगती करतोय . तंत्रज्ञान , शेती, उद्योगधंदे, शिक्षण ,खेळ , आणि बरच काही. पण आपल्या देशात सध्या असे काही प्रकार घडत आहेत जे कि आपल्या देशाच्या प्रतिष्ठेस काळिमा फासत आहेत. ज्यामुळे आपल्या देशातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . महिलांना , स्त्रियांना रस्यावर फिरणे असुरक्षित वाटू लागले आहे.त्यामुळे खर्च आपला देश सुरक्षित आहे का असा वाटू लागला आहे .

हल्ली रोज वर्तमानपत्र उघडून पाहिलं कि बलात्कार , महिलेला मारहाण , लैंगिक किंवा मानसिक छळ अशा अनेक घटना पाहावयास वा वाचायला मिळतात . दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. तरी अजून आपल्याकडे  याच्याबद्दल कठोर कायदे नाहीत याचेच वाईट वाटते . दिल्ली मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणापासून ते आजच्या डॉ. प्रियांका यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी मी घराबाहेर पडू कि नको ..माझ्यासोबत वाईट काही झाले तर.. कोणी त्रास दिला तर .... असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात जागे होतात . त्यामुळे भीतीने घाबरून काही स्त्रिया व मुली घरातच बसून राहतात .पण असच किती दिवस घरात बसून राहणार .. काही महिलांना पोटापाण्यासाठी बाहेर पडावच लागत. मग काय देवाचं नाव घेऊन त् जीव मुठीत घेऊन त्या बिचार्या रात्रीच्या वेळी प्रवास करतात. पण ही भीती , असुरक्षितता अजून किती दिवस घेऊन जगणार आहेत आपल्या देशातील महिला . आपण गुन्हेगारांना असेच सोडून देत राहिलो तर ही प्रकरणे वाढतच जातील ..गुन्हेगारांना कसली भीतीच उरणार नाही. मुलींना जगणं मुश्किल होऊन बसेल. समाजात अंधाधुंदी कारभार माजेल. गुन्ह्यांचं राज्य निर्माण होईल .रात्रीच सोडा ..आजकाल दिवसाढवळ्या हि हे प्रकार वाढत चालले आहेत. या गुन्हेगारांची ,नालायकांची मस्ती एवढी  वाढत चालली आहे. यांना वेळीच आवार नाही घातला तर  यांची मस्ती अजूनच वाढेल आणि मग खूप भयंकर परिणाम भोगावे लागतील .

आपल्या देशातील संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे . इकडे नेहमीच स्त्रीचा आदर केला जातो. तिला योग्य तो मान दिला जातो . पण अश्या काही घटना घडतात कि आपल्यालाच प्रश्न पडतो कि हाच का आपला भारत देश , हीच आपली संस्कृती , हेच शिकवलं का आपल्या पूर्वजांनी आपल्याला .. !!आजही अनेक ठिकाणी अशाच अमानुष चालीरीती , परंपरा , महिलांवर अत्याचार यांसारख्या घटना होत असतील ,त्या आपल्या समोर जरी नसतील आल्या तरी छोट्या छोट्या खेड्यात , गावात त्या चालू असतात . आपण अनेक जण शहरी भागात राहतो त्यामुळे अशा घटनांचा अंदाज आपल्याला येत नसतो .

मित्रानो आपणसुद्धा हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो ..नुसत्या मेणबत्या जाळून काही होणार नाही. आपल्याला माणसाच्या मनातली ती वाईट प्रवूत्ती आणि वाईट नजर जाळून टाकायची आहे . त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . प्रत्येक माणसाने स्वता:पासून सुरवात केली पाहिजे व नंतर दुसरयाला शिकवले पाहिजे . कारण जोपर्यंत माणसाचे मानसिक वृत्ती साफ होत नाही ना तोपर्यंत हे चालूच राहणार . आपल्यासोबतच सरकारने सुद्धा या गुन्ह्याविरोधात कठोरात कठोर शिक्षा व कायदा तयार केला पाहिजे . जेणेकरून परत कोणाची मुलीकडे वाकडी नजर पडणार नाही . कस आहे ना आपली देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही त्यामुळे ते जास्त शेफ़ारले आहेत . जेव्हा एखाद्याला जरी फासावर लट्कवतील ना तेव्हाच ह्या गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल नक्कीच...

जेव्हा देशातील या अमानुष गोष्टी , अत्याचार थांबतील तेव्हाच आपल्या देशाच्या संस्कृतीला योग्य न्याय मिळेल . व त्याचा आपल्यालाच अभिमान वाटेल ..

                                           जय हिंद !!!          


  

Thursday, November 14, 2019

HUMANITY..

                       जात पात --देशाच्या प्रगतीला लागलेली कीड

आपला भारत देश हा जगात आपल्या वैविध्यामुळे ओळखला जातो . आपल्या लोकशाहीचे सम्पूर्ण जगात कौतुक होत असते . आपल्या देशात अनेक धर्म , भाषा , जाती परंपरा , संस्कृती पाहावयास मिळते . दार काही मैलांवर आपल्यला वेगवेगळी संस्कृती पाहावयास मिळते . ठोकठिकाणची भाषा वेगळी , लोकांचे राहणीमान वेगळे , सर्वच वेगळं. सर्व जण अगदी गुण्यागोविंदाने राहतात . कोणताही सण असो , कार्यक्रम असो सगळे जण एकत्र येऊन तो सण साजरा करतात. मग हल्ली असे काय होत आहे कि ज्याच्यामुळे जाती जातींमध्ये , धर्म-धर्मामध्ये  तेढ निर्माण होत आहे, वाद होत आहेत .

खूप वर्षापासून चालेला अयोध्येचा प्रश्न तो काही दिवसांआधी सुटला . ते पण मंदिर आणि मशिदी वरून . प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या धर्माबद्दल भावना , आदर प्रेम असतो , सर्व मान्य आहे. परंतु कोणती गोष्ट किती  ताणायची ते आपल्याला समजायला हवं. उगाच आपण वातावरण गरम करतो आणि संघर्ष करत असतो . नुकसान शेवटी आपलच होत. उगाच ते तोडफोड , माऱ्यामाऱ्या , दंगली ...... कशाला उगाच सगळे ते . त्यापेक्षा काहीच मार्ग निघत नसेल तर एखादी शैक्षणिक संस्था स्थापित केली असती तर खूप मुलांचे शिक्षण झाले असते . देशाच्या प्रगतीत थोडी भर पडली असती . असो ... न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो आपण मान्य करायचा . त्यांनी पण शेवटी योग्य विचार करूनच निर्णय दिला असेल ना.. त्यावर आपण न बोललेच बरं ...

आज आपण महाराष्ट्रात बघितल तर किती जाती जमाती आहेत. जो तो स्वतःला आरक्षण मागतोय. स्वतःला मागासवर्गीय समजतोय . तसेच एकाला आरक्षण मिळाल कि दुसरा समाज नाराज होतोय . त्यातून उगाच संघर्ष निर्माण होतोय. शिक्षणात सुद्धा जातीपातीच राजकारण चालूय .. प्रवेश मिळवताना पहिले गुणांऐवजी जात विचारली जातेय . त्यामुळे एखादा हुशार पण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर तो बाजूला राहतो . आणि एखादा कमी गुणांवाला विद्यार्थी प्रवेश मिळवतो . सरकारी नोकरी मध्ये सुद्धा तसेच , एखाद्याची पात्राता नसताना त्याला एखाद्या पदावर बसवले जाते. आपल्या महाराष्टात हे जातींचं राजकारण जास्त चालूय .. हा ब्राम्हण , हा कोळी , हा क्षत्रिय , हा आगरी , हा धनगर , हा मराठा .. हेच चालूय जे कि आपल्याला , आपल्या राज्याला आणि देशाला महागात पडतंय . आपणच आपापसात भांडत बसलो तर दुसरे त्याचा फायदा घेतात हि गोष्ट लोकांना समजत नाहीय .. आणि आपले राजकारणी फक्त मज्जा बघतात. फक्त आश्वासन देतात .. आम्ही हे करू , ते करू ...बस्स्स .. बाकी काही नाही .

हे जातीपातीच राजकारण आपल्या सर्वानाच खूप संकटात आणू शकत. वेळीच त्याला आवर घातला पाहिजे. उद्या एखाद्या माणसाला जगायला रक्ताची गरज भासली तर आपण असे नाही विचारत कि अहो तुमची जात काय ... मला याच जातीचं रक्त हवंय ..मला दुसरं रक्त नको.. असं तर नाहीना करत आपण .. शेवटी माणूसच मदतीला येतो. माणुसकीच आपल्याला वाचवते . त्यामुळे सर्वानी एकत्र आनंदित राहा. सर्व धर्मांचा , भाषेचा , संस्कृतीचा आदर करायला शिका . आपण भले असू धर्माने जातीने वेगळे पण आधी आपण माणूस आहोत आणि आपल्याला माणुसकी टिकवायचीय आणि वाढवायचीय सुद्धा .

HUMANITY के लिए छवि परिणाम
HUMANITY

                                        

Monday, November 4, 2019

सावधान ... निसर्ग कोपतोय .....

                                                           

आज २१व्या शतकात वाटचाल करत असताना माणसाने सर्व गोष्टीत खूप प्रगती केली . त्याने खूप विकास साधला . तंत्रज्ञान , शेती , उद्योगधंदे , शिक्षणात अगदी सर्व क्षेत्रात प्रगती केली. पण हे सर्व करताना त्याने निसर्गाकडे लक्ष दिले आहे का खरच .. त्याचा विचार केलेला का त्याने कि ज्याचे परिणाम आपल्याला आज भोगावे लागत आहेत . काय झालाय निसर्गाला . तो हल्ली का असे भयानक संकेत देत असतो निसर्ग....

लहानपणी शाळेत आपण पुस्तकात वाचले होते कि आपल्या हवामानात मुख्यतः तीन ऋतू आहेत , आणि त्याचे प्रत्येकाचे चार चार महिने आहेत . म्हणजेच पावसाळा जुन ते सप्टेंबर , हिवाळा ऑक्टोबर ते जानेवारी  आणि उन्हाळा फेब्रुवारी ते मे असे साधारणतः होते . पण आजकाल च्या वातावरणावरून हे चित्र बदललय असं नाही का वाटत . कारण हल्ली पाऊस कधीही पडतो , कधीही थन्डी वाजते आणि गरम तर सतत होत असत. एकंदर हवामानाच चक्रच बदलून गेलय . कधी अचानक मध्येच चक्रीवादळ येत , समुद्रात उंच उंच लाटा उसळतात. का होती हे सगळे . पुढे काही वर्षात काही अघटित होण्याचे संकेत तर नाहीत ना हे. 

आज माणसाने त्याच्या फायद्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली , हल्लीच उदाहरण घ्याना .. आरे वसाहतीतील वृक्षतोड , किती झाडे कापली गेली , किती प्राणी , पक्ष्यांचे निवारे उध्वस्त झाले, शेवटी त्यांनापण मानवी वस्तीत शिरण्यावाचून काही पर्याय नव्हता . जी झाडे,वृक्ष आपल्याला एवढं काही भरभरून देतात त्यांनाच आपण नष्ट करून टाकलय. ज्यांच्यामुळे आपल्याला सावली मिळते , फळ फुल मिळतात , लाकूड मिळते , आणि सर्वात मुख्य म्हणजे प्राणवायू मिळतो . एवढे सगळे फायदे असताना देखील आपण त्यांच्या जीवावर उठलोय . वरून आपणच ओरडतो पाऊस नीट पडत नाही , गर्मी वाढलीय ...आहो हे वृक्षतोड अशीच चालू राहिली तर एकदिवस वाळवंट होईल या शहारांचं मी असच तडफडत मरतील सगळे ..पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. 

आज दिल्ली .मुंबई सारख्या शहरात वावरताना जीव अतिशय गुदमरल्यासारखा होतो . हवेचे प्रदूषण इतके वाढलेय कि तोंडाला रुमाल लावूनच चालावे लागते . हल्ली तर खासगी वाहन खरेदी करण्याचा जमाना आला आहे . जो तो आजकाल गाडी घेतोय . म्हणजे १५ घरांमागे ८ ते ९ गाड्या असतातच . शिवाय लोक सरकारी गाड्यांचा वापर कमी करू लागलीय . त्यामुळे खासगी वाहनांवर जास्त भर , सहाजिकच प्रदूषण पण जास्त .  तसेच  प्लास्टिक , थर्मोकॉल यांचा जास्त वापर , दिवाळीतील फटाके यामुळे सुद्धा प्रदूषणात वाढ झाली आहे .

तर आपण हे सर्व कुठेतरी थांबवला पाहिजे .. जेवढं आपण निसर्गाच्या विरोधात जाणार तेवढा जास्ती तो आपल्याला त्रास देणार , हे आपण लक्षात ठेवले पाहिजे . स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाचा बळी देऊन चालणार नाही . तरी निसर्ग आपल्याला वेळोवेळी संकेत देऊन जागरूत करत असतोच पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळीच आपण या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात आपला टिकाव लागणे कठीण आहे . आता जे आहे त्यापेक्षाही कठीण परिस्थिती ओढावेल यात शनकच नाही .त्यामुळे प्रत्येकाने आपापल्यापरीने जेवढे पर्यावरणासाठी कर शकतो तेवढे करावे . त्यामुळे आपलेच अस्तित्व वाढणार आहे . 

                                                                   धन्यवाद....    

Saturday, October 26, 2019

HAPPY DIWALI

                                     दीपावली .... !!

Image result for happy diwali
शुभ दीपावली

                       

दिवाळी म्हणजेच दीपोत्सव ... दिव्यांचा सण . सगळीकडे आकर्षक रोषणाई ,सुंदर भव्य रांगोळ्या, खमंग फराळ ,फटाक्यांची आतषबाजी  आणि प्रसन्न वातावरण . खरंच दिवाळीचे ते चार दिवस अतिशय आनंददायी आणि सुखाचे असतात . तसेच वर्षाचे सर्व दिवस आनंदी जावेत असे आपल्याला वाटत असतात .

प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो . कोणाला पैशांच्या अडचणींमुळे थोडी हौस मौज कमी करता येते तर कोणी खूप उत्सहात दिवाळी साजरी करतो. काहीही असला तरी कोणत्याही गोष्ट साजरा करण्याचा आनंद घेता आला पाहिजे . मग ती दहा बाय दहा  च्या खोलीतील दिवाळी असो कि मोठ्या राजवाड्यातली . आनंद हा महत्वाचा असतो. त्या गोष्टीतल सुखसमाधान  महत्वाचं असत.

पण आजकाल सगळ्यावर कसल ना कसल तरी संकट आलेल आहे . ऑक्टोबर महिना संपत आला तरी अजून पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीय .देशातील अनेक भागात अतिवृष्टी होऊन लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . लोकांची घरे डोळ्यासमोर वाहून गेली आहेत . लोक रस्त्यावर आले. तसेच चक्रीवादळामुळे काही दिवसांपासून घबराटीचे वातावरण किनारपट्टीजवळील लोकांमध्ये आहे. तसेच काही लोकांचे रोजगार बंद आल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे . कोणाचे जवळचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च , घरखर्च , आणि इतर किरकोळ खर्च भागवताना लोकांची दमछाक होत आहे . त्यामुळे काही लोकांची दिवाळी तर दूरच राहते.

काही लोक तर हे दिवस कुठंतरी लांबच्या ठिकाणी जाऊन साजरा करतात . ना ते फराळ बनवत , ना खरेदी करत , ना रांगोळ्या , ना रोषणाई . फक्त कुठेतरी जाऊन मज्जा करायची एवढंच दिसत त्यांना. आज आपल्या राज्यात हीच परिस्तिथी दिसून येते ,याला कारण पण तसेच आहे  ते म्हणजे बदलती जीवनशैली , स्पर्धा , ताणतणाव , चढाओढ आणि बरच काही . माणूस आपली संस्कृती सण हळूहळू विसरू लागला आहे . माणसाने कालानुरूप बदलावं पण आपली परंपरा जपली पाहिजे.

आपणसुद्धा आपली दिवाळी अशीच साजरी करूया . फटाके घेण्याऐवजी त्याच पैशांची पुसते घ्या , किंवा एखाद्या गरीब मुलाला मदत करा . एखाद्या अनाथाश्रमाला भेट द्या , तिकडच्या मूलांनसोबत गप्पा मारा , खेळ खेळा ,गोड धोड पदार्थाचे वाटप करा . बघा त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हाला वेगळेच सुख देईल . तसेच आपल्या मित्रपरिवारास भेटा . मातीचे किल्ले बनवा ,त्यातली मज्जा काही वेगळीच असते. वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा . नवनवीन गोष्टी शिका . वेगवेगळे  पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करा . अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आपण आपली दिवाळी उत्तम साजरी करू शकतो .

सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा , हि दिवाळी आपल्याला सर्वाना सुखाची , समृद्धीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

                                     धन्यवाद..!!

       


Sunday, October 20, 2019

निवडणुकीची रणधुमाळी

                          मतदान करा ,लोकशाही बळकट करा !!

Image result for all parties SYMBOL in maharashtra
प्रमुख पक्ष आणि चिन्ह
                                             
उद्या २१ ऑक्टोबर , लोकशाही बळकट करण्याचा दिवस.  लोकशाही बळकट करणे म्हणजे काय ओ , तर लोकांनी लोकांसाठी राज्य बनवणे म्हणजेच लोकांनी आपल्यातूनच  एखाद्या उमेदवाराला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ,त्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवडून देण आणि तोच दिवस म्हणजे मतदानाचा  दिवस . त्यामुळे सर्वानी  या दिवशी  घराबाहेर  पडून मतदान केले पाहिजे , भले तुम्ही कोणालाही मत द्या पण तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.

सध्या महाराष्ट्रात ४-५ प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जसे कि भारतीय जनता पक्ष (भा.ज पा.) , राष्टीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे ), आणि शिवसेना . आणि तसेच इतर मित्रपक्ष जसे कि (MIM) , बहुजन समाज आघाडी , समाजवादी पक्ष वगरे वगरे . प्रत्येक पक्षाची धोरणे , विचार , कार्य पद्धती हे वेगवेगळे आहेत . प्रत्येकालाच प्रत्येक पक्षाची कार्यपद्धत आवडेलच अस नाही. २०१४ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मोदी लाट होती , सगळीकडे भाजपाची सत्ता होती , त्यांच्या नेत्यांनी खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या  , आम्ही हे करू ते करू , त्याप्रमाणे काही गोष्टी केल्याही परंतु ज्या मूलभूत गोष्टी महाराष्ट्राला हव्या आहेत त्या  गोष्टी दे लोकांना देण्यात ते सरकार काहीस कमी पडला आहे असा वाटतंय , नुसत हेच सरकार नाही तर त्याआधीच सरकार सुद्धा असच होत त्यांच्या कार्याला लोकांनी नापसंती दर्शवली म्हणून  लोकांनी भाजपाला निवडून दिले परंतु काही गोष्टींबाबत लोकांचा भ्रमनिरास झाला .

तसेच मनसे सारखे जे पक्ष आहेत जे कि मराठी भाषा , संस्कृती , अस्मिता  टिकवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु आपलीच मराठी माणस त्याच्याकडे पाठ फिरवतात . काही लोक त्यांच्या पक्षाच्या सभा , भाषण ऐकण्यासाठी खूप गर्दी करतात पण मतदान करताना काहीसे नाराज असतात . तर काही शिवसेनेसारखे पक्ष आहेत ज्यांचा उगम मराठी माणसांसाठी झालेला परंतु तोसुद्धा आता हिंदुत्वाकडे वळला आहे. त्यांचा  शहरातील प्रत्येक समाजानुसार प्रचार चालू आहे. काही पक्ष तर भर पावसात ,भिजत भिजत प्रचार करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत व समाजाला उत्साह देत आहेत ,एकंदरच काय जो तो पक्ष जिवाच्या आकांताने निवडून येण्यासाठी प्रचार
करतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्याचा ते विचार करत आहे .

तर आपण कोणाला मतदान करावे ??? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे . पक्षाला बघून मत द्यावं कि स्थानिक उमेदवाराचं काम बघून मत द्यावं यावर विचारविनिमय सध्या चालू आहे . तर मित्रांनो जो माणूस आपल्या समस्या सोडवण्यासाठी झटतो , ज्याच्या मनात आपल्यासाठी आपुलकी आहे , उच्च शिक्षित आहे, ज्याला समाजाची उत्तम जाण आहे , त्याला आपण मतदान करावं . कारण कोणताही पक्ष आपला काम करायला पुढे येणार नाहीय , कोणी आपले रस्ते बांधून देणार नाहीय ,नोकरी धंद्याच्या समस्या सोडवणार नाहीय पण स्थानिक उमेदवार जो निवडून येणार आहे तो आपली कामे करणार आहे . त्यामुळे जो उमेदवार विश्वासाने आपली कामे करेल किंवा अगोदर केलेली असतील त्यालाच आपण मतदान केल पाहिजे मग तो अपक्ष म्हणून उभा असेल तरी चालेल .
 
सध्या देशात अनेक उद्योगधंदे बंद होत चालले आहेत , काहींचे खासगीकरण करायचा डाव आखला जात आहे , शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्या  आहेत , महागाई वाढली आहे  ज्याच्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत . काही ठिकाणी लोक खोट्या आश्वासनाना बळी पडली आहेत . तसेच आरे कॉलनी तील वृक्षतोड हा चर्च मुद्दा बनला होता त्यावरून सुद्धा मोठं राजकारण झालं . यांसारख्या अनेक प्रकारामुळे लोकांमध्ये सध्याच्या सरकारसाठी नाराजी दिसून येत आहेत . कोणाचा विजय होईल कोण हरेल हे सांगता येत नाहीय . कारण वातावरण बदलल आहे . लोकांचा कौल कोणाला असेल ते येत्या २४ तारखेला समजेलंच ,,

तुम्हाला फक्त मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून तुमचा मतदानाचा हक्क बजावायचा आहे. मग कोणाचही सरकार येउदे , तुमचं मत उपयोगास येउदे किंवा फुकट जाऊदे . तुमचं एक एक मत  खूप महत्वाचं आहे हि लोकशाही बळकट करण्यासाठी ... !!
                                            
                                                           जय हिंद , जय महाराष्ट्र !! 
    


Sunday, October 6, 2019

नवरात्रीचे नवरंग!!!

                                                    नवरात्री रासरंग ....

Image result for navratri
जय आंबे माँ

                                    

मित्रानो सप्टेंबर महिन्यात गणपती झाल्यानंतर सर्वाना चाहूल लागते ती म्णजे नवरात्रीची . अर्थातच देवीच्या आगमनाची . हा सण प्रामुख्याने गुजरात राज्याचा पण आज भारतात अनेक ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या आणि गरब्याची मज्जाच काही वेगळी .

नवरात्री म्हणजे अर्थातच नऊ रात्रीचा सण , या नऊ दिवसात रात्री देवीचा जागर असतो . रात्रभर देवीची आराधना केली जाते . अनेक ठिकाणी भजने , कीर्तन आयोजित केले जाते . खूपच उत्साहाचे वातावरण असते . नऊ दिवशी देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात . प्रामुख्याने लाल , पिवळा , हिरवा , पांढरा , गुलाबी , केशरी , जांभळा , केशरी , मोरपीसी या रंगाचा सामावेश होतो . प्रत्येक रंगाचे एक वेगळे महत्व आहे . 

मुंबई , ठाण्यासारख्या शहरात  महिला तसेच पुरुष मंडळी नऊ दिवस नऊ रंगाचे पोशाख परीधान करतात . सगळे एकत्र जमतात व एकत्र मिळून फोटो काढतात . त्यातूनच एकात्मतेचा संदेश देतात .तसेच मुंबई ,  मुंबई उपनगर , कल्याण डोंबिवली , ठाणे यांसारख्या शहरात रात्रीचे मोठ्या उत्साहात गरब्याचे आयोजन केले जाते . अनेक मोठं मोठे गुजराती तसेच मराठी गायक  याना आमंत्रित केले जाते . सुमधुर संगीताच्या तालावर लहान मुलांपासून , वृद्धांपर्यत सर्व लोक फेर धरून नाचतात . मात्र वेळेच्या काही मर्यादा असतात त्यामुळे काहीसा लवकर आटपावा लागतो हा गरबा. तरीपण लोक मोठ्या उत्साहाने या रासरंगात सहभागी होतात व आनंद घेतात . गुजरात सारख्या राज्यात गरब्याची धूम काही वेगळीच असते . तिकडे लोकांना नऊ दिवस सुट्ट्या असतात , तसेच रात्रभर गरबा चाललेला असतो . कशाचंही जास्त बंधन नसते . खूपच मज्जा असते नवरात्रीत तिकडे. तुम्ह्लाही हा गरबा अनुभवायचा असेल तर नवरात्रीत गुजरात मध्ये नक्की भेट द्या व आनंद घ्या .

काही  प्रमुख रंग आणि त्यांचे महत्व -

लाल - आवड , उत्साह , रोमांच , साहस .

पिवळा - आनंदी , मैत्रीपूर्ण संबंध ,तेजस्वी ,शक्तिशाली .

हिरवा - प्रगती , निसर्गाचे प्रतीक , सुरक्षितता , धनदौलत ,विरंगुळा , ताजेतवाने .

निळा - शांती ,आत्मविश्वास , एकात्मकता .

पांढरा - आशा ,नीटनेटकेपणा ,साधेपणा , शीतरंग .

गुलाबी - सौन्दर्य , मैत्री , प्रेम , विश्वास , रोमांच .

करडा - सुरक्षितता , व्यक्तिमत्व विकास , समजुदारपणा .

जांभळा - दूरदृष्टी , अद्भुतपणा , निरामयता , मोठेपणा .

                  चला तर मग या रंगात मिसळून आपण आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरुया .

नवरात्रीची काही छायाचित्र

Image result for navratri garba
गरबा खेळताना मग्न झालेले मंडळी

  

Image result for navratri garba
गुजराती रास रंग


धन्यवाद !!!


  

Saturday, September 21, 2019

PHOTOGRAPHY

                                     छायाचित्रण ....!!

आपला निसर्ग हा एक सुंदरतेची खाण आहे. अनेक मनमोहक प्रसंग , दृश्य आपण पाहतो . काही चित्र आपल्या मनात घर करून बसतात . तर काही आपण आपल्या कॅमेरात टिपतो व कायमचे आपल्यासोबत ठेवतो . फोटोग्राफी हि सुद्धा एक कला आहे . कोणत्या वेळी कोणता कॅमेरा ,कसा , कुठे वापरायचा याला सुद्धा एक शास्त्र असते. आज ह्याकडे एक व्यवसाय मानून देखील पाहिले जाते. तुमच्यकडे एक विशिष्ट कला आणि तंत्रज्ञान पाहिजे ज्याने तुम्हीसुद्धा हे करू शकता . अनेक जणांनी तर हे एक करिअर मानून देखील निवडले आहे. तर आपण आता असेच काही अप्रतिम छायाचित्र बघूया.

VALLEY RIVER

MORNING SCENE

MAGIC CLOUD

SUNSET PIC

REFLECTION

WONDERFUL FLOWERS



JUHU BEACH











Sunday, September 15, 2019

engineer's day

                                 ENGINEER'S DAY...

engineers day 2019 के लिए छवि परिणाम
engineers day

लहानपणी सगळे विचारत असतात कि कोण होणार मोठेपणी , तर त्यातील ६०-७०% मूल बोलतात मी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आणि अभियंता होणार . मला तंत्रज्ञान खूप आवडते . मी खूप मोठा अभियंता होणार . काहींचं हे स्वप्न खर होत तर काही मुलांचं ते स्वप्न  स्वप्नच राहत . त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात . असो....

तर आज १५ सप्टेंबर . हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो .ह्या दिवशी सर मोक्षागुंडम विश्वेश्वराय यांचा जन्मदिवस असतो . त्यांच्या कार्याबद्दल  १९५५ साली त्यांना भारतरत्न पुरस्कराने गौरवण्यात आले . हैद्राबाद मध्ये त्यांच्या पूर संरक्षण  प्रकल्पाला   खूप मोठे नाव मिळाले , ज्याने त्यांचे नाव सर्व देशात पोहचले .त्यांनी एक अभियंता म्हणून अनेक प्रकल्प केले व अनेक मानसन्मान प्रस्थापित केले . तर असा हा अभियंता दिवस ...

आपल्या भारत देशात दरवर्षी लाखोंच्या संख्येने इंजिनियर्स बाहेर  पडतात . त्यातले सर्वच अभियांत्रिकी क्षेत्रात काम नाही करत तर अन्य क्षेत्रात घुसतात जस कि खेळ , कला , राजकारण , व्यवसाय-उद्योग , किंवा बरेच काही .. आजच्या जगात खूप कमी मूल असे पाहायला मिळतील कि जे खर्च उत्साहाने या क्षेत्रात झोकून देऊन काम करतात . कारण आजच्या जगात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत . सर्व क्षेत्रात खूप पैसे आहे. फक्त आजच्या काळात आपली आवड जपणं महत्वाची . अनेक मूल इंजिनीरिंग ची डिग्री घेतात अगदी उत्तम मार्गाने पण ४-५ वर्षानंतर काहीतरी वेगळाच करतात जे कि त्याला पण अगोदर माहित नसत कि आपण नंतर काय करणार आहोत . कोणी खेळात यश मिळवत , कोणी सिने क्षेत्रात जात , कोण मंत्री बनत असं अनेक काही .

इंजिनिरिंग ची चार ते पाच वर्षे मुलांना खूप काही शिकवून जाते . कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा , अगदी काट्यावर अभ्यास करून सुद्धा परीक्षेत चांगल्या मार्गाने पास कसे होयचे हे एका इंजिनीयर कडून शिकावं . त्याने चार वर्षात खूप काही अनुभवलेलं असत.  खूप साऱ्या असाइन्मेंट्स , कंटाळवाणे लेक्टचर् स, शिक्षकांच्या ओरडा ,सबमिशन, कॉलेजचे कार्यक्रम  , परीक्षा या सगळ्या चक्रातून तो चार वर्ष जात असतो . त्यामुळे त्याला चंगळच अनुभव असतो. त्यातूनही एखादा वसतिगृहा मध्ये राहणारा असेल तर त्याची गोष्टच वेगळी , तो अजून बरच काही शिकतो . कपडे धुण्यापासून , जेवण बनविण्यापर्यंत सर्व काही . तर असे काही फायदे पण आहेत इंजिनीयर होण्याचे . तर इंजिनीयर हा एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असते असं म्हणायला हरकत नाही .

तर अश्या ह्या अष्टपैलू इंजिनीयर ची आपल्या देशाला खूप गरज आहे, देशातल्या प्रत्येक समस्येवर त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून उपाय शोधले पाहिजे . लोकांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत . कारण आपण बघितल तर  "   civil engineers build the world , computer engineers build the magic world, extc engineer connect the world , electrical engineers are powers of world , and mechanical engineers move the world"

                                  please believe U.S.A

                   UNDERSTAND ,  STUDY  &  APPLY     

                        " wish you happy engineer's day "

Thursday, August 29, 2019

GANESH FESTIVAL

                                 गणपती बाप्पा मोरया !!


जस मी मागच्या लेखात बोललो आहे कि भारत हा उत्सवप्रिय देश आहे . अनेक उत्सव मोठ्या प्रमाणावर  येथे साजरे केले जातात . विशेष करून महाराष्ट्रात तसेच गोव्यात तसेच जवळपासच्या प्रदेशात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो . गणपती हे सर्वांचं आराद्य दैवत ,कलेचं दैवत . कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात गणपतीच्या प्रार्थनेने होते .

लोकमान्य टिळकांनी समाज प्रभोधन व्हावे , लोकांनी एकत्र यावे यासाठी गणेशोत्सव चालू केला . पहिले  सगळीकडे सार्वजनिक गणपती बसायचे . त्यामुळे सगळे लोक एका ठिकाणी एकत्र यायचे , आरत्या म्हणायचे , विविध कार्यक्रम सादर करायचे ,खूप छान वातावरण असायचे  पण  आता सगळ रूप बसून गेले आहे . उत्सवातील आनंद हरवून गेला आहे. सगळीकडे नुसता गोंधळ, धांगडधिंगा , नाच गाणी यामुळे उत्सवाचे सर्व रंगच बदलले आहेत. हल्ली प्रत्येक गल्लीत , घराघरात गणपती बसतो त्यामुळे लोक आपापसातच व्यस्त असतात . माणसे पहिल्यासारखी एकत्र येत  नाहीत नुसता मोबाइल वर वेळ फुकट घालवतात .  तुमचा गणपती मोठा कि आमचा मोठा , तुमच्या गणपतीला किती लोक येतात , मी तो नवसाला पावणारा आहे का  वगरे वगरे .... या सर्व गोष्टीत आपली लोक वेळ वाया घालवतात .

मुंबई सारख्या ठिकाणी आज अनेक गल्लोगल्ली , गणपती बसतात . त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्राफिक समस्या उदभवतातत , ध्वनी प्रदूषण होते , काही ठिकाणी फटाक्यांमुळे  वायू प्रदूषण होते . तसेच  आगमन आणि विसर्जन वेळी अनेक समस्या निर्माण करतात . समुद्र किनाऱ्यावर विसर्जनावेळी निर्माल्य , इतर कचरा यामुळे जलप्रदूषण देखील होते , तसेच काही पीओपी च्या मुर्त्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्याला येऊन लागतात , अनेक मासे सुद्धा यामुळे मारून पडतात . त्यामुळे सगळीकडेच समस्याच समस्या असतात .

मी तुम्ही आपण सगळे हे चित्र बदलू शकतो . आपापल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न आपण केले पाहिजे . कोणालाही त्रास होणार नाही , निसर्गाची हानी होणार नाही , असा उत्सव साजरा करू शकतो. पीओपी ची मूर्ती आणण्यापेक्षा शाडूच्या मातीची मूर्ती आणली पाहिजे , निर्माल्य व इतर कचरा यांचे योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .. गणपतीच्या मूर्तींवर बंधने आणली पाहिजेत, डीजे ,स्पीकर यावर बंदी आणली पाहिजे. पारंपारीक खेळ , उत्सव  वाढवले पाहिजेत .

अश्या प्रकारे उत्सव साजरा केला तर नक्कीच पूर्वीसारखा गणपती उत्सव साजरा होऊ शकेल . बाप्पाला सुद्धा आनंद होईल . व तो सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा देईल.

                         आपल्या सर्वाना गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

Friday, August 23, 2019

DAHIHANDI

                                        गोविंदा आला रे ......
नटखट कृष्ण..

भारतात अनेक जातीचे , धर्माचे लोक राहतात . प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या , राहणीमान वेगळे , संस्कृती वेगळी . भारतीय माणूस हा उत्सवप्रिय व संस्कृतीप्रिय असतो.  गणपती , नवरात्र , होळी , दिवाळी , ईद , ख्रिसमस  यांसारखे अनेक सण आपण साजरे करतो . पण त्यातील एक सण सगळ्यांचा आवडता , जुलै -ऑगस्ट महिना आला कि आपल्याला ज्याची आठवण येते तो म्हणजे दहीहंडी . दहीकाला म्हणजेच श्रीकृष्णजन्माष्टमी .

पहिल्या दिवशी गोकुळाष्ठमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो . मथुरेत पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा केला जातो. बाळकृष्ण म्हणजे एक निरागस हास्य . ज्याच्याकडे बघितल्यावर सगळं दुःख विसरायला होत . त्याचा नटखटपणा , गालावरची लाली , खट्याळपणा हे सर्वच मन प्रसन्न करत . असा हा सर्व गोपिकांचा आवडता कृष्ण . त्याचा हा उत्सव .

मुंबई दहीहंडी

दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो . थरावर थर रचून उंच मनोरे रचले जातात . आणि दहीहंडी फोडली जाते . दही चोरून खाणारा म्हणजेच माखनचोर असा कृष्ण आपल्या सवंगड्यांच्या साथीने उंचावर ठेवलेलं मडक्यातलं दही खायचा . अशी आख्यायिका म्हटली जाते . पण आता त्याचे रूपांतर उंच उंच मनोऱ्यात झाले आहे.

अपघात

पण हल्लीच्या काळात उत्सवातील खरा आनंद हरवत चालला आहे. त्याला आक्रमकतेचं ,आणि स्पर्धेचं स्वरूप आलेला आहे. एक जीवघेणी स्पर्धा होत आहे. कोण उंच उंच थर लावून हंड्या फोडतात आणि पैसा कमावतात याकडे सर्वांचं लक्ष असते. बिचारया लहान लहान कोवळ्या वयातल्या मुलांना ७व्य ते ८व्या थरावर चढवतात आणि चुकून दुर्दैवाने अपघात झाला तर बिचारया लहान मुलांचा बळी जातो. तर हे कुठेतरी थांबयला हवं . त्यासाठी समाजात जन जागृती करण्याची गरज आहे .

स्पेन गोविंदा पथक

आज मुंबई , ठाणे ,कल्याण डोंबिवली यांसारख्या प्रमुख शहरात दहिहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी होते . मोठमोठ्या हंड्या , सेलेब्रिटीस , नाच गाणी .एकदम जल्लोषाचे वातावरण असते . काही ठिकाणी डीजे चा वापर मोठ्या प्रमाणावर होते त्याला काहीसा अटकाव झाला पाहिजे . मुंबईत काही ठिकाणी परदेशावरून सुद्धा लोक दहीहंडीसाठी येतात. तेसुद्धा हा सण उत्साहात साजरा करतात .

कोणताही सण असला तरी त्यातला आनंद घेता आला पाहिजे . कोणतीही स्पर्धा न करता , पैशांचे अमिश न दाखवता आनंद लुटता आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे अतिसाहस दाखवून आपला जीव धोक्यात घालू नये .

आपल्या सर्वाना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!!   




ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...